You-Ywc

You यू pron.--- तू, तुम्ही, आपण, कोणीतरी व्यक्ति. The more you earn, the more tax you pay.
Young यंग् a.--- तरुण, ज्वान, अननुभवी. n .--- पिल्लू, पिल्ले, तरुण लोक, नामाच्या पूर्वी त्याच नावाच्या दुसर्‍या माणसापेक्षा भिन्न व लहान हे दाखवण्यासाठी विशेषतः वडील व मुलगा यामधील भेद स्पष्ट करण्यासाठी धाकटा.
Youngster यंग्स्टर् n.--- मूल , तरतरीत मुलगा. मुले-बाळे, पोरे-बाळे.
Younker यूंकर् n.--- तरूण.
Your योर् poss. Pron.--- तुझा, तुमचा.
Yours योर्स् poss. Pron.--- pred. a.--- तुझा, तुमचा.
Yourself योर्सेल्फ pron. Emphat. --- तू स्वतः, तुम्ही स्वतः.
Youth यूथ् n.--- यौवन काळ, तारुण्य, तरुण मनुष्य.(pl.) तरुण लोक.
Youthful यूथफुल् a.--- तरुण, तरणा, तरुणाला शोभणारा, तारुण्याचे सामर्थ्य, जोम व तेज असलेला.
Youthquake यूथक्वेक् n.---तरुण पिढीच्या गतिविधींमुळे किंवा प्रभावामुळे घडलेला सांस्कृतिक, राजनैतिक, व सामाजिक लक्षणीय बदल.
Yowl यॉल् n.--- दुःखद आरोळी. v.i.--- आक्रोश करणे.
Yo-yo यो-यो n.--- यो यो चकती (एक खेळणे) v.--- वर खाली हलणे, चढ उतार होणे.
Yr. abbr. year(s); younger, your.
Yrs.abbr.years, yours.
Ytterbium अटर्बियम् n.--- आवर्तसारणीतील लँथॅनाइड मालिकेतील एक धातूचा घटक.
yttrium इट्रियम् n.--- एक धातूचा घटक.
Yuan युवान् n.--- चीनची आर्थिक एकक.
Yucca यका n.---अमेरिकेतील एक सदाहरित पानांचे (पांढऱ्या फुलांचे) रोप.
Yugoslav युगोस्लाव् a. & n.---युगोस्लाव्हियाचा रहिवाशी.
Yule यूल् n.--- नाताळचा सण. Yule-tide ---नाताळचा मोसम.
Yummy यमी a.---स्वादिष्ट, चवदार.
Yum-yum यम्-यम् int. Expr.--- आनंददायक उदगार (विशेषतः चमचमीत मेजवानी मिळणार या अपेक्षेने काढलेला).
Yup यप् --- Var. of YEP
Yurt यर्ट् n.--- भटक्या मंगोलियन लोकांचा एक प्रकारचा तंबू.
YWCA वाय् डब्ल्यू सी ए abbr.--- Young Women”s Christian Assosiation.