fle-flo

flea फ्ली n.--- पिसूं, पुशी.
fledge फ्लेज् v.t.--- समक्ष करणे. a.--- पंख फुटलेला.
fledgling/Fledgeling फ्लेज्लिंग् n.--- नुकतेच पंख फुटलेला पक्षी.
flee फ्ली v.t. & v.i.--- पळणे, पळून जाणे, पाठ दाखविणे.p./ p.p.---Fled; pr.p.--- fleeing; v.t.--- -पासून पळून जाणे / पळ काढणे.
fleece फ्लीस् v.t.--- लोकर कातणे, लुबाडणे.
fleer फ्लीर् v.t.--- वेडावणे n.--- थट्टा.
fleet a,--- जलद, चपळ. n.---- लढाऊ जहाजांचा समुदाय, आरमार. v.t.--- झपाट्याने जाणे, घालवणे.
fleeting फ्लीटिंग् a.--- क्षणिक, क्षणभंगुर, चंचल, चपळ.
flesh फ्लेश् n.--- मॉंस, मनुष्य जाति, इंद्रियवशता, विषयवासना.
flesh out v.t.--- /
flesher फ्लेशर् n.--- खाटीक, खाटकाचा सुरा.
fleshless फ्लेश्लेस् a.--- कृश, हडकुळा, वाळलेला.
flewbane फ्ल्यूबेन् n.--- कडूकारळे, काळे जिरे.
lexible फ्लेक्सिबल् a.--- लवचिक,नम्र, ऐकणारा, जुळवून घेणारा.
flexion फ्लेक्शन् n.--- वांक, वाकविण्याची क्रिया, (व्याकरणांत
flexural a.--- ‘flexure’- संबंधित.
flexure फ्लेक्सर् n.--- वाकण्याची प्रक्रीया, बांक, वक्रावस्था.
flibbertigibbet फ्लिबर्टिजिबिट् n.--- संवेदनशील / बडबडी बाई.
flick फ्लिक् n.--- हलका फटका, चुटकी, सौम्य झटका, चित्रफीत, चित्रपट (फिल्म) v.t.--- असा फटका इ. देणे / देऊन झटकून टाकणे / हालविणे.
flicker फ्लिकर् v.i.---- टिटिकणे, लुकलुकणे n.--- दिवा जाता जाता जो प्रकाश होतो तो, धुगधुगी.
flight फ्लाइट् n.--- पलायन, उड्डाण, पळ.
flighty फ्लाइटी a.--- उडाणटप्पू, लहरी, चंचळ, छंदिष्ट.
flim - flam फ्लिम्-फ्लॅम् n.--- अर्थहीन/ खुळचट/ कृत्य/ प्रकार; सवंग/ भिकार चलाखी; थातुर - मातुर, थोतांड. a.--- भिकार, सवंग, बनावटी.
flimsy फ्लिम्झि a.--- फुसका, नादान, कमजोर, निर्जीव, क्षुल्लक. a.--- तकलादू, हिणकस, रद्दी, हलक्या प्रतीचा.
flinch फ्लिन्च् v.i./v.t.--- अंग चोरणे, दचकणे, कचकावणे, मागे हटवणे, कचरणे, माघार घेणे. n.---आश्चर्य किंवा भीती मुळे चेहऱ्यावरील किंवा शरीराची प्रतिक्रिया.
fling फ्लिंग् v.t.--- झोकणे, फेकणे, खाली पाडणे, नाश करणे, आदळ आपट करणे, हातपाय झाडणे. .---- फटका, चुटकी, सौम्य झटका.
flint फ्लिण्ट् n.--- चकमकीचा धोंडा, गारगोटी.
flintiness फ्लिण्टिनेस् n.--- क्रूरता, कठीणपणा.
flip फ्लिप् v.t.--- झटक्याने हलविणे / ढकलणे /उलटणे v.i.--- संतापणे, भडकणे, क्रोधाविष्ट होणे n.---(शरीराचा इ.) झटका, उसळी, झेप, उडी, ढुशी.
flip - flop फ्लिप्-फ्लॉप् n.--- (भूमिका इ. मधील) अचानक केलेला फेर बदल. रबरी सपाता / पादत्राण / चपला.
flippancy फ्लिपन्सी n.--- वाक्चापल्य, वाचाळपणा, उथळपणा.
flippant फ्लिपण्ट् a.--- वाचाळ, वाक्पटु, हलकाफुलका, उथळ.
flip - side फ्लिप् साइड् n.--- ग्रामोफोन रेकॉर्डची दुय्यम / गौण बाजू; दुसरी बाजू / दृष्टिकोण
flirt फ्लर्ट् v.t.--- झिटकारून टाकणे, नखरा करणे, चिरकांडी मारणे, प्रणयाचा खेळ खेळणे, वरकरणी प्रेमाने झुलवणे, भ्रामरी वृत्तीनेे वागणे; भूलथापा देऊन ठकविणे.
flirtatious फ्लर्टेशस् a.--- प्रेमाचे नाटक / सोंग / खेळ करणारा, भूलथापा देणारा, भुलविणारा / झुलविणारा
flisk फ्लिस्क् v.i.--- नाचणे, बागडणे, n.--- लहर.
flit फ्लिट् v.i.--- भरकन उडून जाणे, फडफडणे, घर पालटणे, उड्डाण करणे. a.--- चपळ.
flitch फ्लिच् n.--- मीठासह वाळवलेले डुकराचे मांस.
float फ्लोट् v.t.---तरंगणे, पोहणे, वाहणे. ताफा, तराफा, सांगड, तर.
flock फ्लॉक् v.i.--- जमणे, गोळा होणे. n.--- कळप, झुंड.
flog फ्लॉग् v.t.--- छडी मारणे, फटके मारणे.
flood फ्लड् v.t.--- जलमय करणे. n.--- लोंढा, पूर.
floodgate फ्लड्गेट् n.--- धरणाचा दरवाजा.
floor फ्लोअर् n.--- तक्तपोशी, काडीपाट, पटई, फरसबंदी, भवनाचा भूतल / भूमितल. v.t.--- तक्तपोशी वगैरे करणे. First F.--- दुसरा मजला. Second F.--- तिसरा मजला.
flop फ्लॉप् v.i.--- लटकणे, लोंबणे, टांगून राहणे, कोलमडणे, कोसळणे, कलंडणे,(बेत / उपक्रम) फसणे / फिसकटणे v.t.--- टांगून झुलविणे, लटकावून हलविणे n.--- विचका, ओम्फस, दारुण, अपयश.
flora फ्लॉरा/फ्लोअरा n.--- पुष्पदेवता (विशिष्ट स्थल/काल /स्थित-मधील ) वनस्पतिजीवन, वनस्पतिजात, अशा जीवनावरील ग्रंथ. बहुवचन : Florae/Floras.
floral फ्लॉरल/ फ्लोअरल् a.---फूल/वृक्ष-संबंधी, फुलांचा/ वनस्पतींबाबतचा.
floriculture फ्लोअरिकल्चर n.--- पुष्पवृक्षांची लागवड.
florid फ्लोरिड् a.--- लालभडक, अलंकारिक, सतेज, अति नटविलेला.
florin फ्लोरिन् a.--- एक इंग्रजी नाणे.
florist फ्लोरिस्ट् n.--- नाळी, फुलारी.
flotilla फ्लोटिला n.--- नौदलाचा (लहान) तांडा Flotsam and jetsam फ्लॉटसम् अन् जेट्सम् n.--- बाजारबुणगे, टोळभैरव, फालतू /क्षुल्लक / सटरफटर / वस्तु / गोष्टी.
flounce फ्लाउंस् n.--- धडपड, त्रागा / आदळआपट करीत जाणे(out) /येणे (in). v.t.--- हातपाय आपटणे, तडफडणे.
flounder फ्लाउंडर v.i.--- हडबडून जाणे, गडबडून जाणे; (आग, चिखल, समुद्र, वादळ वगैरे मध्ये) सापडणे / अडकणे / रुतणे.
flour फ्लोर् n.--- पीठ, चणे, कणिक. v.t.--- peeth karne.
flourish फ्लरिश् v.t. & v.i.--- टवटवणे, फोफावणे, परजणे. तेजी असणे, आबादानी असणे, तरतरणे, भरभराटने, उमेदीत असणे.
flow फ्लो v.i.--- वाहणे, भरती लागणे, पाझरणे, प्रवाह चालणे. n.---प्रवाह, ओघ, भरती, जोर.
flowage फ्लोएज् n.---वाहते पाणी.
flower फ्लॉवर् n.--- फूल, पुष्प, मोहर, जवानी, कुसुम, माल्य. v.t. & v.i.--- फुले येणे, विकसणे, बुट्टी काढणे, मोहोर येणे, फुलणे.
flowergarden फ्लॉवरगार्डन् n.--- फुलबाग, पुष्पवाटिका.
flowers फ्लावर्स n.---नहाण, ऋतु.
flowery फ्लॉवरी a.--- फुलांचा, पुष्पमय, अलंकारिक.