Sam-Sap

Samaritan समॅरिटन् (पॅलेस्टाइनमधील) समॅरिया प्रांताचा रहिवासी; धार्मिक, सदाचारी, सत्प्रवृत्त.
Same सेम् a.--- तोच, हाच, सारखा, सदरहू.
Sameness सेम्नेस् n.--- सारखेपणा, साम्य, ऐक्य.
Samiel सॅमिएल् n.--- प्राणघातक, वाऱ्याची झुळूक.
Sample सॅम्पल् n.--- मासला, उदाहरण, नमुना, वानगी. v.t.--- नमुना पाहणे / घेणे / काढणे. a.--- नमुन्याचा.
Sanative सॅनटिव्ह् a.--- रोगहारक, आरोग्यदायक, गुणकारी.
Sanatorium सॅनटोरियम् n.--- आरोग्यभुवन, निरोगी हवेचे ठिकाण. (Pl. ‘Sanatoria’) Sanctification सँक्टिफिकेशन् n.--- पवित्रता, अंतःशुद्धि.
Sanctify सँक्टिफाय् v.t.--- पवित्र करणे, शुद्ध करणे.
Sanctimonious सँक्टिमोनिअस् a.--- दाम्भिक, ढोंगी.
Sanctimony सँक्टिमनि n.--- दांभिकपणा, बकध्यान.
Sanction सँक्शन् v.t.--- पसंत / मंजूर करणे, आधार देणे. n.--- आधार, पसंती, मंजुरी, प्रमाण.
Sanctity सँक्टिटि n.--- पवित्रपणा, शुद्धि.
Sanctuary सँक्चुअरि n.--- पवित्रस्थान, देवळाचा / चर्चचा गाभारा. आश्रयस्थान, आसरा, सुरक्षित जागा, अभयस्थल.
Sanctum सँक्टम् n.--- पवित्रस्थान, खासगी खोली.
Sand सॅन्ड् n.--- वाळू, रेती. v.t.--- वाळू घालणे.
Sandal सॅन्डल् n.--- वहाण, पायतण, चप्पल, पादुक. (विशेषतः बांधायचे पट्टे असलेली).
Sandalwood सॅन्डल्वुड् n.--- श्रीखंड, चंदन.
Sandwich सँड्विज् n.--- सारण घातलेली पावगुंडाळी / पावजोडी. v.t.--- दोन थरांच्या मध्ये दाबणे / बसविणे / घालणे.
Sandy सॅन्डी a.--- वाळूचा, वालुकामय.
Sane सेन् a.--- नारींगी, हुशार, सावध, मनाचा धड.
Sanguinary सँग्विनरि a.--- रक्तपाताचा, खुनी, रक्तरंजित, रक्तपिपासु.
Sanguine सँग्विन् a.--- आरक्त, तांबडा, उत्साही, जोमदार, आस्थेवाईक, उमेदीचा.
Sanguineous सँग्विनिअस् = Sanguine = Sanguinary.
Sanies सेनिइझ् n.--- रक्त, पू.
Sanious सेनिअस् a.--- लसीचा.
Sanitarium सॅनिटेरियम् n.--- = Sanatorium.
Sanitary सॅनिटेरी a.--- आरोग्याचा, स्वच्छतेचा, स्वच्छता-/आरोग्य-संबंधित. Sanitary napkin --- (लहान मूल, रजस्वला इ. च्या वापराचा) शोधनपट, शोध-लंगोट.
Sanitation सॅनिटेशन् n.--- आरोग्य, आरोग्यविद्या, स्वच्छता, सफाई, साफसूफ.
Sanity सॅनिटि n.--- मनाचा धडपणा, शुद्धी.
Sap सॅप् n.--- रस, चीक, द्रव. V.t.--- ढांसळून पाडणे.
Saphena सफीना n.--- घोट्यापासून मांडीपर्यंत आणि पावलांपासून गुढघ्यापर्यंत पसरलेल्या दोन निळ्या धमन्यांपैकी एक (पहिली long किंवा internal saphena; दुसरी short, posterior किंवा external saphena.)
Saphenous सफीनस् a.--- ‘Saphena’ शी संबंधित / जोडलेला.
Sapid सॅपिड् a.--- चवीचा, चवदार.
Sapidity सॅपिडिटि n.--- चव, रुची.
Sapience सॅपिएन्स् n.--- शहाणपणा, चतुराई, सूज्ञता.
Sapient सॅपिएन्ट् a.--- शहाणा, चतुर.
Sapling सॅप्लिंग् n.--- रोपा, मांडा.
Sapphire सॅफायर् n.--- इंद्रनील, नीलकांत, नील(-मणि).
Sappy सॅपि a.--- रसभरित.