Tam-Tar

Tamarind टॅमरिण्ड् n.--- चिंच, आंबली. (‘तमरे - हिंदी’ (हिंदुस्थानचा ‘तमर’ म्हणजे खजूर) या अरबी शब्दसंहतीपासून). चिंचेचे झाड / फळ.
Tamarinds टॅमरिण्ड्स् n.--- चिंचेचा गर. Tamarindus indica --- (भारतीय) चिंचेचे झाड.
Tame टेम् v.t.--- माणसाळविणे, वॉश करणे. a.--- माणसाळलेला, सवयीचा, वश, नामर्द, मवाळ, मंद, नरम. (स्वभावाने / स्वरूपाने) थंड, गरीब, संथ.
Tameable टेमेबल् a.--- वठणीस आणण्याजोगा, माणसाळविण्याजोगा.
Tamp टॅम्प् v.t.--- माती वगैरे घालून बुजविणे.
Tamper टॅम्पर् v.i.--- लुडबुडणे, लांडा कारभार करणे.
Tan टॅन् v.t.--- कमावणे, तयार करणे, काळे करणे, काळवटणे. n.--- पिंगट रंग. a.--- पिंगट. ‘Tangent’ चे संक्षिप्त रूप.
Tang टँङ् n.--- टोक, तीक्ष्ण अग्र, नांगी; (रेंगाळणारी, टिकून राहणारी) तीव्र चव; उग्र वास; लकेर. लकब, अस्पष्ट खूण, वेगळा स्वाद / गंध.
Tangent टॅन्जण्ट् n.--- (भूमितीत) स्पर्शिका. a.--- गोलाकारास एकाच बिंदूत स्पर्शिणारा.
Tangible टॅन्जिबल् a.--- स्पर्श करण्याजोगे, स्पृश्य. मूर्त, भौतिक, वास्तविक.
Tango टँगो n.--- सामूहिक द्वंद्वनृत्याचा एक प्रकार.
Tank टॅन्क् n.--- तळे, तलाव, टांके, टांकी. रणगाडा, कवचयुक्त रणवाहन.
Tanner टॅनर् n.--- कातडे कमावणारा, चांभार.
Tantalize टॅन्टलाइझ् v.t.--- चालवणे, आशा लावणे.
Tantalization टॅन्टलाइझेशन् n.--- झुलवणी.
Tantamount टॅन्टमाउण्ट् a.--- समतोल, बरोबर, तुल्य.
Tantrum टँट्रम् n.--- रागाचा आवेग / भडका, थयथयाट. अकांडतांडव.
Tap टॅप् v.t.--- थोपटणे, -वर टकटक करणे, तोंड पाडणे. n.--- थापट, थाप (हाताची). दट्ट्या, पिठा, गुत्ता, भोंक, तोंड, नळी.
Tape टेप् n.--- फीत, नाडी, नवार.
Taper टेपर् v.t.--- निमुळता करणे. n.--- बारीक मेणबत्ती. a.--- निमुळता.
Tapering टेपरिंग् a.--- निमुळता, चिंचोळा.
Tapestry टॅपेस्ट्रि n.--- बुट्टीदार / वेलबुट्टीचे पडदे.
Tapioca टॅपिओका n.--- खाद्य पिष्टमय द्रव्य (उदा. साबूदाणा) यापासून दूध इ. घालून केलेला मऊ / घट्ट खाऊ.
Taproot टॅप्रूट् n.--- धरणमूळ.
Tar टार् v.t.--- डांबर लावणे. n.--- डांबर, खलाशी.
Tardiness टार्डिनेस् n.--- सुस्तपणा, धिमेपणा.
Tardily टार्डिली ad.--- सुस्तपणाने.
Tardy टार्डि a.--- सुस्त, मंद, नाखूष.
Tare टेअर् n.--- बारदान, आभंड.
Target टार्गेट् n.--- ढाल, निशाण.
Tarnish टार्निश् v.t.--- मळवणे, डाग लावणे, कलंकित करणे, पाडणे, मळणे. डागाळणे. n.--- डाग, कलंक, बट्टा.
Tarot टॅरो n.--- एक प्रकारच्या पत्त्याच्या खेळांतील, चित्रमय, भविष्य सांगणारी पाने.
Tarry टॅरि v.i.--- खोळंबणे, खोटी होणे, राहणे, थांबवणे, थांबणे, दमणे.
Tart टार्ट् a.--- (चव इ.) झणझणीत, चरचरीत. (भाषा, शब्द इ.) तीक्ष्ण, खोचक. n.--- स्वैरणी, स्वैराचारी स्त्री. प्रेयसी, प्रिया. रखेल. वेश्या. n.--- एक प्रकारचा पातळ केक / पाव.
Tartarus टार्टरस् n.--- नरकलोक, यमलोक.