aplomb अप्लाॅम् n.--- लंबस्वरूप, लंबता. आत्मविश्वास, धीटपणा, दृढता.
apnoea ऍप्निअ n.--- श्वासावरोध.
apocalypse अपोकलिप्स् n.--- भावी घटनांचा साक्षात्कार (विशेषतः सेंट जॉनला झालेला (भविष्य-/अदृष्ट -) साक्षात्कार, भविष्यदर्शन.
apocope ऍपोकोप् n.--- अन्त्याक्षरलोप
apocrypha अपाॅक्रिफा n.--- नकली/ भाकड पुराणकथासाहित्य, बनावट इतिहास गाथा.
apocryphal अपाॅक्रिफल् a.---’Apocrypha’ च्या स्वरूपाचा.
apogee ऍपोजी n.--- ग्रहाच्या (चंद्र, सूर्य इ. च्या) कक्षेतील पृथ्वीपासून सर्वात दूरचा बिंदु, सूर्याचे पृथ्वीपासूनचे कमाल अंतर; सर्वोच्च अवस्था, कळस, कमाल अंतर, सर्वात दीर्घ अंतर, दूरतम स्थान.
apologize ऍपाॅलाॅजाइज् v.i.--- क्षमा-माफी मागणे.
apologue ऍपाॅलाॅग् n.--- उपदेशपर कल्पित गोष्ट, रूपकात्मक कथा.
apology ऍपाॅलजि n.--- माफीची विनंती, क्षमा मागणे, समर्थन.
apoplectic ऍपप्लेक्टिक् a.--- ‘Apoplexy’ ने ग्रस्त, घेरी/फेफरे/तिरीप/ झटका आलेला, आघातविष्ट.
apoplexy ऍपप्लेक्सि n.--- सुनबहिरी रोग, गैरशुद्धी, अचानक बेशुद्धि, घेरी, फेफरे, तीव्र झटका, आघात.
apostacy अपाॅस्टसी n.--- apostasy
apostasy अपाॅस्टसी n.--- स्वधर्म त्याग, तत्वभ्रष्टता.
apostate ऍपाॅस्टेट् n.--- स्वधर्मत्यागी, धर्मभ्रष्ट, तत्वभ्रष्ट, व्रतभ्रष्ट (व्यक्ति).
a posteriori ए पोस्टीरिओराय् ad.---/a.--- अवलोकित / अनुभूत गोष्टींपासून कारणाचा तर्क करण्याच्या प्रक्रियेने (ठरविलेला). पहा: ‘A priori’.
apostle ऍपाॅसल् n.--- बायबलाच्या उपदेशासाठी ख्रिस्ताने पाठविलेला मनुष्य. श्रेष्ठ उपदेशक, आचार्य (एखाद्या विशिष्ट प्रणालीचा) पुरस्कर्ता.
apostolate ऍपाॅस्टलेट् / अॅपाॅस्टलिट् n.--- ‘Appostle’ चे कार्य/कर्तव्य/पद. धर्म-/पंथ-/प्रचार मंडळ. (उदा. Neighbourhood apostolate is most important among Hindus and Muslims; it will aonsisit in respect, concern, help, sharing in joys and sorrows.)
apostolic (al) ऍपाॅस्टलिक् ad.--- ‘Apostle’ विषयक / संबंधी.
apostrophe अपाॅस्ट्रफी n.--- परोक्ष संबोधन. (‘) खूण : अक्षरलोप, षष्ठीविभक्तीचा अर्थ, किंव्हा अक्षरांचे वा संख्यांचे अनेकवचन दाखविण्याची.
apothecary ऍपाॅथिकरी n.--- औषधे तयार करून विकणारा.
apotheosis अपाॅथिओसिस् / अॅपोथीओसिस् n.--- दैवीकारण, देवस्वरूपप्रदान. दैवी दर्जा/स्थान. उदात्तीकरण. श्रेष्ठताप्रदान, थोरवीप्रदान, दैवत्व देणे, ईश्वरतुल्य मानणे; गौरवगान, कीर्तिघोष, महात्म्यवर्णन, यशोगाथा.
appall/Appal अपाॅल् v.t.--- दहशत-धाक घालणे, भयभीत करणे, भिवविणे.
appalling अपॉलिंग् a.--- भयानक, थक्क करणारा, धक्कादायक.
apparatus ऍपरेटस् n.--- सरंजाम, संच, साहित्य.
apparatchik अपराचिक् n.--- (plural : Apparatchiks/Apparatchike) (कम्युनिस्ट संघटनेचा) परमनिष्ठावान सदस्य.
apparel ऍपरेल् n.--- पोषाख, वेष, परिधान.
apparent ऍपेरेन्ट a.--- स्पष्ट, उघड, दिखाऊ.
apparently ऍपेरेन्टली ad.--- स्पष्ट, बह्यातकारी.
apparition ऍपरिशन् n.--- नुसते दिसणारे, भूत, दृश्यात्मक गूढ.
appeal ऍपील् v.t.--- वरच्या अधिकाऱ्याकडे फिर्याद नेणे, तिऱ्हाईत पंच नेमणे, अपील करणे. n.--- वरच्या अधिकार्याकडे फिर्याद, विनंती, अपील, पुनरावेदन.
appear ऍपिअर् v.i.--- भासणे, उमगणे, हाजीर होणे.
appearance ऍपिअरन्स् n.--- चेहरा, स्वरूप, रूप, डौल, हजिरी.
appease ऍपीझ् v.t.--- शांतवन करणे, समजूत घालणे, खुशामत.
appellant ऍपेलन्ट् n.--- अपील अर्ज करणारा, पुनरावेदक, पुनरावेदनकर्ता.
appellate ऍपेलेट् a.--- अपील घेण्याच्या अधिकाराचा.
appellation ऍपेलेशन् n.--- नाम, संज्ञा.
append ऍपेन्ड् v.t.--- लटकावणे, पुरवणी जोडणे.
appendage ऍपेन्डेज् n.--- अवयव, दुसऱ्यास जोडले ते.
appendicitis अपेंडिसाय्टिस् n.--- आन्त्रपुच्छाचा दाह/सूज.
appendix अपेंडिक्स् n.--- परिशिष्ट, पुरवणी, उपांग, इंद्रियाच्या पृष्ठभागावर असलेला / उगवलेला उंचवटा / छोट्या बोटा-/शेपटा- सारखी वाढ. मानव व माकड इत्यादि सस्तन प्राण्यांच्या उदरांतील लहान आतडे व मोठे आतडे यांच्या जोडणीजवळ मोठ्या आतड्याच्या बंद टोकावर असणारी अशी वाढ (वैद्याकांतील पूर्ण नाव : vermiform appendix of caecum). ((plural: appendices(.....डिसीज्), appendixes (....डिक्सीज्))
apperceive ऍपर्सीव्ह् v.t./v.i.---जाणिवेची जाण प्राप्त करणे. पूर्वप्राप्त कल्पनांसमवेत नवप्राप्त कल्पना समजणे / अवगत करणे.
apperception ऍपर्सेप्शन् n.--- स्वसंवेदन, जाण, (बुद्धि-) -ग्रहण.
apperceptive ऍपर्सेप्टिव्ह ad.--- चिकित्सायुक्त जाणीवेने प्राप्त / उत्पन्न.
appetite ऍपिटाइट् n.--- भूक, अन्नवासना, बुभुक्षा. इच्छा, वासना, रुचि.
applaud ऍप्लाॅड् v.t.--- शाबासकी देणे, स्तुति करणे.
applause ऍप्लाॅज् n.--- शाबासकी, स्तुति, वाहवा.
apple ऍपल् n.--- एक प्रकारचे विलायती फळ, डोळ्यांतील बाहुली.
applicability ऍप्लिकेबिलिटी n.--- लायकी, लागूपणा.
applicable ऍप्लिकेबल् a.--- लागू पडण्याजोगा, लायक.
applicant ऍप्लिकंट् n.--- अर्जदार, याचक.
application ऍप्लिकेशन् n.--- अर्ज, आवेदन, व्यासंग, योजना.
apply ऍप्लाय् v.t. and v.i.---लागू करणे, अर्ज करणे.
appoint ऍपाॅइन्ट् v.t.--- नेमणे, नेमणूक करणे, वायदा करणे.
appointed ऍपाॅइन्टेड् a.--- (सु)सज्ज.
appointment ऍपाॅइन्ट्मेन्ट् n.--- नेमणूक, जागा.
apposite ऍपोझिट् a.--- योग्य, लायक, समर्पक. (ad.---) ly--- प्रसंगानुसार, यथोचित.
apposition ऍपोझिशन् n.--- दोन नामांची एक ?
appraisal अप्रेझल् n.--- मूल्यमापन.
appreciable ऍप्रीशिएबल् a.--- परिणाम समजण्याजोगा.
apprreciate ऍप्रिशिएट् v.t.---किंमत करणे, दर ठरविणे.
apprehend ऍप्रिहेन्ड् v.t.--- पकडणे, धरून कैद करणे, समाजाने, जाणणे, शंका घेणे (शंकिणे), वाटणे, दिसत/जाणवत असणे.
apprehension ऍप्रिहेन्शन् n.--- पकडणे, अटक, ज्ञान, समज, जाण, काय होणार/वाढून ठेवले आहे याचे/ संभाव्यतेचे/ भवितव्यतेचे भय/चिंता/काळजी, अज्ञात- भय/चिंता/काळजी.
apprehensive ऍप्रिहेन्सिव्ह् a.--- बुद्धिवान, संशयी, काय होणार/झाले असेल/भवितव्यतात काय आहे या चिंतेने/भयाने/काळजीने ग्रस्त/अस्वस्थ.
apprrentice ऍप्रेन्टिस् n.--- करार करून शिकण्यास राहिलेला विद्यार्थी, चेला, शागीर्द, शिकाऊ विद्यार्थी. v.t.--- कराराने शिकविणे.
apprenticeship ऍप्रेन्टिसशिप् n.--- विद्यार्थीपणा.
apprise ऍप्राइझ् v.t.--- कळवणे, सुचवणे, परिचित करणे.
approach ऍप्रोच् v.t.--- पोहोचणे, पावणे, जवळ येणे. n.--- आगमन, मार्ग, वाट. -ed (a)--- जवळ आलेला.
approbate ऍप्रोबेट् v.t.--- पसंत करणे.
approbation ऍप्रो(प्र)बेशन् n.--- (अधिकृत/औपचारिक) पसंती, मंजूरी.
approppriate ऍप्रोप्रिएट् a. योग्य, ठीक. v.t.--- आपलासा करणे, डल्ला मारणे. ---ly(ad.)--- योग्य रीतीने.
appropriation ऍप्रोप्रिएशन् n.--- आपलासा करणे.
approval ऍप्रुव्हल् n.--- पसंति, मंजूरी, मान्यता.
approve ऍप्रूव्ह् v.t.--- मान्य/पसंत/मंजूर करणे.
approved ऍप्रूव्हड् v.t.--- मंजूर/पसंत केलेला.
approver ऍप्रूव्हर् n.--- मान्य करणारा, माफीचा साक्षी(दार), ((ज्याला माफी मिळू शकते असा) स्वतःची गुन्ह्यातील भागीदारी कबूल करून अन्य संशयित गुन्हेगारांविरुद्ध साक्ष देतो)
approximate ऍप्राॅक्झिमेट् a.--- जवळजवळ, समीप, निकट, उणापुरा. v.t.--- जवळ येणे, जाणे, पावणे.
appulse ऍपल्स् n.--- आपटणे, आघात.
appurtenance ऍपर्टिनन्स् n.--- अंगभूत वस्तु.