Q.V. --- ‘Quod vide’ या लॅटिन शब्दांचे संक्षिप्त रूप - लेखात अन्यत्र असलेल्या विवरणाकडे लक्ष वेधण्यास वापरले जाणारे.
Quack क्वॅक् v.i.--- बदकासारखे ओरडणे, बढाई. v.t.--- बाडी वैद्यकी करणे. n.--- बदकाचा शब्द, बाडी वैद्य, बढा, वैद्यब्रुव, खोटा, भोंदू.
Quackery क्वॅकरि n.--- विद्येची बढाई.
Quadrangle क्वाड्रँगल् n.--- चतुष्कोण, (Quadrilateral) चौकोन, चौक, चौसोपा.
Quadrant क्वाड्रंट् n.--- त्रिज्या, वर्तुलपाद, सूर्यमंत्र.
Quadrate क्वाड्रेट् a.--- समचतुष्कोण.
Quadrilateral क्वाड्रिलॅटरल् a.--- चतुर्भुज, चौबाजूंचा. n.--- चौकोन, चौकोनी आकृति.
Quadruple क्वाड्रुपल् n.--- चौपट. v.t.--- चौपट करणे. v.i.--- चोपट होणे.
Quaff क्वाफ् v.t. & v.i.--- ढोसणे, गटगट पिणे.
Quaggy क्वागि a.--- लबलबीत, थलथलीत.
Quagmire क्वाग्मायर् n.--- दलदल. अवघड / कठीण / कोंडीची अवस्था.
Quail क्वेल् n.--- लावा, लाहूर. v.i.--- (to, before) खचून जाणे. गलितधैर्य होणे, नांगी टाकणे.
Quaint क्वेन्ट् a.--- तऱ्हेवाईक, विचित्र मौजेचा, गमतीचा.
Quaintness क्वेन्ट्नेस् n.--- विलक्षणपणा, मौज.
Quake क्वेक् v.i.--- कंप सुटणे. n.--- कंप, कांपरे, थरथरी.
Qualification क्वालिफिकेशन् n.--- गुण, लायकी, प्रमाणित ज्ञान / कौशल्य.
Qualified क्वालिफाइड् a.--- गुणी, लायक, योग्य, माफक केलेला.
Qualify क्वालिफाय् v.t.--- लायक करणे, पाहिजे तसा करणे, गुणी करणे, नरम / मर्यादित / नेमस्त करणे
Quality क्वालिटी n.--- बडी पदवी, गुण, धर्म, गुणवत्ता, गुणिता, दर्जा.
Qualm क्वाम् n.--- ओकारी, मळमळ, रुखरुख, अवस्था, एकदम आलेली व्यथा / कळ / घेरी / ओकारी; (पापाची) बोचणी. खेद, खंत, रुखरुख, (चुकीची / दुर्वर्तनाची) चाड / शरम / लाज, शरमिंधेपण.
Quandary क्वॉन्डरी / क्वॉन्ड्री n.--- पंचाईत, विचार, विवंचना, पेच, खोडा, शृंगापत्ति.
Quantity क्वॉन्टिटि n.--- परिमाण, प्रमाण.
Quantum क्वाण्टम् n.--- परिमाण, संख्या. विभाग, तुकडा. ऊर्जेचा अविभाज्य अतिसूक्ष्म कण. (pl. Quanta). Quantum theory --- पुंजवाद.
Quarantine क्वारंटीन् n.--- (रोगाचा फैलाव रोखण्यासाठी इ.) (व्यक्तीस / वस्तूस) वेगळे / स्थानबद्ध करण्याची प्रक्रिया. अशा स्थानबद्धतेची स्थिति अथवा अवधि; विलग्न-/वियुक्त-/विजन -वास. v.t.--- -ला (वरील प्रमाणे) वेगळे / स्थानबद्ध करणे.
Quark क्वार्क् / क्वॉर्क् n.--- अणूमधील घटक द्रव्यांच्याहि कल्पित-घटक-द्रव्यांपैकी एक.
Quarrel क्वॉरल् v.i.--- भांडणे, बिघडणे. n.--- भांडण, कज्जा, बिघाड, तंटा, कलह, तूट, फूट, बखेडा.
Quarrelsome क्वॉरल्सम् a.--- तुसडा, भांडखोर, कज्जेदलाल.
Quarry क्वॉरि n.--- खाण (विशे. दगड, मुरूम, इ. ची). शिकार (म्हणजे शिकाऱ्याचे लक्ष्य / भक्ष्य).
Quart क्वॉर्ट् n.--- चतुर्थांश ग्यालन.
Quartan क्वॉर्टन् n.--- हिंवताप, चातुर्थिक ताप.
Quarter क्वॉर्टर् n.--- चवथा हिस्सा, तिमाही, दिशा, पुरा, शहराची पेठ, जीवदान. v.t.--- चार भाग वाटणे, आश्रय देणे, योगक्षेम चालविणे.
Quarterly क्वॉर्टर्लि n.--- त्रैमासिक, तिमाही. ad.--- तीन तीन महिन्यांनी.
Quarters क्वॉर्टर्स् n.--- बिऱ्हाड, घर, निवासस्थान.
Quarto क्वॉर्टो a.--- चौबंदी. n.--- चार पानी आकार.
Quartz क्वॉर्ट्स् n.--- कांचमणी. Silica रूपांतील / Silica - प्रचुर खनिज.
Quasar क्वेसार् : (Short form of ‘Quasi Stellar Radio Source’) अनेक कोटि प्रकाशवर्षे दूर अवकाशांत (कधी काळी) असलेला (कल्पित) तारकापुंज.
Quash क्वॉश् v.t.--- -ला रद्द करणे / नाहीसा करणे, दाबणे.
Quasi क्वेसाय् … ‘सदृश’, ‘समान’ ‘तुल्य’, ‘वजा’ अशा अर्थाचे, नाम / विशेषणाच्या आधी येणारे पद. eg.--- aquasi judicial officer = न्यायाधीशासमान (काम करणारा) अधिकारी.
Quatrain क्वॉट्रेन् n.--- चार चरणी श्लोक, कडवे, चतुष्पदी.
Quaver क्वेव्हर् v.t.--- कांपणे, गायनात कॅम्प घेणे. n.--- कंप, फिरकी.
Quay क्वे n.--- घाट, धक्का. v.t.--- धक्का बांधणे.