cod कॉड् n.--- शेंग, एक जातीचा मासा.
coda कोडा n.--- संगीताच्या बैठकीतील रचनांहून वेगळ्या प्रकारची उपसंहारात्मक अखेरची रचना.
code कोड् n.--- कायद्याचे पुस्तक, कायदेसंग्रह, विधिसंग्रह, नियमावलि, विशिष्ट प्रसंग, विषय, प्रयोग, व्यवसाय आदीमध्ये पाळावयाच्या शास्त्रीय, रूढिस्वरूप, पारंपरिक, सांकेतिक, प्रक्रियात्मक नियमांचा संग्रह. (संदेशप्रेषणात) विशिष्ट सांकेतिक शब्द/चिन्ह/ध्वनि इ. च्या वापराची पद्धति. v.t.--- -ला ‘code’ मध्ये रूपांतरित करणे.
codicil कॉडिसिल् n.--- मृत्युपत्राची पुरवणी.
codify कोडिफाय् v.t.--- संग्रह/एकत्र करणे.
coefficient कोएफिसंट् n.--- गुणाक, सहकारी.
coequal कोइक्वल् a.--- समान, समतोलाचा.
coerce कोअर्स् v.t.--- बळजबरी/बलात्कार करणे, दंडभयपूर्वक भाग पाडणे.
coercion कोअर्शन् n.--- बळजबरी, जबरदस्ती, बलप्रयोग, दंडभयपूर्वक केलेली सक्ती.
coercive कोअर्सिव्ह् a.--- बलात्काराचा, बलप्रयोग वा दण्डभयावर आधारलेले.
coeval कोइव्हल् a.--- एक वयाचा, समवयस्क.
co-exist को-एक्झिस्ट् v.i.--- एकाच वेळी असणे.
co-existence को-एक्झिस्टन्स् n.--- एककालित्व.
co-existent को-एक्झिस्टन्ट् a.--- एकाकालीन, सहजीवी.
coffee कॉफी n.--- कॉफी, बुंद.
coffer कॉफर् n.--- पेटी, संदूक, तिजोरी, खजिना, धनागाड, द्रव्यसंग्रह, खजिन्याची पेटी, धनकोश.
coffin कॉफिन् n.--- प्रेताची पेटी, शवपेटिका, वाण्याची पुडी.
cog कॉग् n.--- चाकाचा दांता. v.t.---दांतळणे.
cogency कोजन्सि n.--- जोर, बळकटपणा, दृढता.
cogent कोजन्ट् a.--- जोरदार, सयुक्तिक, बुद्धीला/तर्काला पटणारा. सुबुध्दपणाचा.
cogitate कॉजिटेट् v.i.--- चिंतन/मनन/ध्यान करणे.
cogitation कॉजिटेशन् n.--- विचार, मनन, चिंतन.
cognate कॉग्नेट् a.--- बरोबर झालेला, सहजात, सजातीय, सवर्ण बांधव.
cognition कॉग्निशन् n.--- जाणीव, संवेदन, आकलन, समाज, ज्ञान. जाणीव इ. होण्याची प्रक्रिया, प्रमाण-प्रक्रिया.
cognizable कॉग्निझेबल् a.--- चौकशी करण्यासारखा.
cognizance कॉग्निझन्स् n.--- चौकशी, समज, ज्ञान, दखल. (हिंदी: संज्ञान).
cognizant कॉग्निझन्ट् a.--- माहितगार, वाकबगार.
cognomen कॉग्नोमेन् n.--- नाम, उपनाव, (रोमन नागरिकांचे) कुलनाम/आडनाव/तिसरे नाव, टोपण नाव. पहा: ‘agnomen’.
cognoscente कॉनॉशेन्टे n.--- ज्ञाता, तज्ज्ञ, माहितगार, चोखंदळ, मर्मज्ञ. (pl.: cognoscenti).
cohabit कोहॅबिट् v.i.--- एकत्र राहणे, पतिपत्नीसंबंधाने वागणे.
coheir कोएअर् n.--- भागीदार, वतनबंधु.
cohere कोहीअर् v.i.--- लगठून रहाणे, संबंध जुळणे.
coherence कोहिरन्स् n.--- संलग्नता, संयोग, संबंध.
coherent कोहिरन्ट् a.--- लगटून असणारा, संगमाचा, सुसंगत.
cohesion कोहिझन् n.--- संलग्नता, पूर्वापार संगति.
cohesive कोहिझिव्ह् a.--- चिकट, चिकण.
coiff(e)ure कॉफ्यूअर n.--- केशभूषा.
coiffeured कॉफ्यूअर्ड a.--- शृंगारित (केस).
coil कॉइल् n.--- बेंटाळे, गुंडी. v.t.--- गुंडाळणे.
coin कॉइन् n.--- नाणे, शिक्का, मुद्रा. v.t.--- नाणे/शिक्का पाडणे, रचणे.
coinage कॉइनेज् n.---नाणे पाडणे, नाणे; प्रचलित नाणे.
coincide कोइन्साइड् v.i.---मिळणे, मेळ बसणे.
coincidence कोइन्सिडन्स् n.--- मेळ, जम, मिलाफ.
coir कॉयर् n.--- काथ्या.
coital कॉइटल् a.--- ‘coition’/’coitus’ संबंधीचा; मैथुनिक.
coition कॉइशन् n.--- मैथुन, सुरत, रात, रतिक्रिया, संभोग.
coitus कॉइटस् n.---=coition. ‘Coitus interruptus’ = मैथुनभंग, रेतःस्खलनापूर्वी केलेला मैथुनविराम , संभोग-खंड/व्यवधान.
coke कोक् n.--- सातवे (वायुरूप) काढून घेतलेला खाणीतला कोळसा.
cola/Kola(Coke) कोल n.---=cocaine (कोळसा) ‘कोक’मध्ये बदलणे, कोक(coca) ची पाने साखर आदि द्रव्यांनी स्वादिष्ट केलेले सोडा-व-कार्बन-संस्कारित पेय.
colander कोलँडर् n.--- रोवली, चाळण, चाळी.
cold कोल्ड् a.--- थंड, सरद, उदास, अविचल. n.--- थंडी, हींव, हुडहुडी, पडसे, शीत, शैत्य.
coldly कोल्डलि ad.--- थंडाईने, कळकळीवाचून.
cold hearted कोल्ड्हार्टेड् a.--- निर्दय, पाषाणहृदयी.
cold-shoulder कोल्ड्शोल्डर् v.t.--- तुच्छतेने/उपेक्षेने वागविणे, -बद्दल उदासीन/बेफिकीर राहणे.
coldness कोल्ड्नेस् n.--- थंडी, थंडपणा, गारठा, शैत्य.
colic कॉलिक् n.--- उदरगत वेदनेचा झटका/कळ, पोटशूळ.
colicky कॉलिकी a.--- _’colic’ -चा/-च्या स्वरूपाचा.
collaborate कोलॅबरेट् v.i.--- सहकार्य करणे, बरोबरीने काम करणे (विशे. ग्रंथरचना, संशोधन, इ. कार्यांत).
collaboration कोलॅबरेशन् n.--- सहकार्य, (विशिष्ट कार्यातील) भागीदारी/सहाय्य.
collaborationist कोलॅबरेशनिस्ट् n.--- (विशेषतः शत्रूशी देशद्रोहाने) संगनमत करण्याच्या वृत्तीचा/पक्षाचा.
collaborator कोलॅबरेटर् n.--- collaborate करणारा.
collage कोलाज् n.--- विविधप्रकारच्या (परस्पर विसंवादी) तुकड्यांचे मिश्रण. वैवध्यपूर्ण/चित्रविचित्र मेलन/मेळा(वा) आकृति/रचना.
collapse कोलॅप्स् v.i.--- खचणे, शक्तिहीन होणे. n.--- शक्तिपात, नाश.
collar कॉलर् n.--- गळपट्टी, गळेबंद, कपड्याचा गळ्याभोवती येणारा (राहणारा) भाग, गळ्याभोवती बांधायचा पट्टा. v.t.---नरडे धरणे, -ला (गळा पकडून) रोखणे/धरणे.
collate कॉलेट् v.t.--- पडताळून पाहणे, पडोसा लावणे.
collateral कोलॅटरल् a.--- समांतर, बरोबरीचा, सारखे, तुल्य, गौण, अप्रत्यक्ष.
collation कॉलेशन् n.--- पडताळा, फराळ, उपहार.
colleague कलीग् n.--- कामाचा सोबती.
collect कलेक्ट् v.t.---जमा करणे, वसूल करणे. v.i.--- सांचाने, जमा होणे.
collected कलेक्टेड् a.--- स्थिरचित्त, गोळा केलेला, भानावर असलेला.
collection कलेक्शन् n.--- संग्रह, जमाव, उग्राणी.
collective कलेक्टिव्ह् a.--- सामाजिक, सामुदायिक.
collector कलेक्टर् n.--- जमा-उग्राणी करणारा, कमाविसदार, तहशीलदार.
collectorate कलेक्टोरेट् n.--- कलेक्टराच्या ताब्यातला प्रांत.
college कॉलेज् n.--- विद्वज्जनसमूह, महाविद्यालय, पाठशाळा.
collegial कॉलिजियल् a.--- सुसंघटित, व्यवस्थापूर्ण, सहकारयुक्त.
collegien कॉलेजिअन् n.--- छात्र, विद्यार्थी.
collegium कॉलेजियम् n.--- निवडक/विशिष्ट जनांचा समूह/गात/मंडळ/समिति.
collide कोलाइड् v.i.--- एकमेकावर आदळणे.
collier कॉलिअर् n.--- खाणीतून कोळसे काढणारा.
collimate कॉलिमेट् v.t.--- (दुर्बीण इ. तील) दृष्टी(-क्षेप-)रेखा सरळ करून/जुळवून घेणे. (भिंगे इ.) त्यांचे अक्ष एका दिशेत येतील अशा रीतीने बसविणे/ठेवणे. (दुर्बीण इ. तील)(प्रकाशकिरण) समांतर करणे.
collimator कॉलिमेटर् n.--- ‘collimate’ करणारी यंत्ररचना/दुर्बीण.
collision कॉलिझन् n.--- एकमेकांचा धक्का, टक्कर.
collusion कॉल्युझन्
collusive कोल्यूसिव् a.--- कटविषयक, संगनमताचा.
collocate कॉलोकेट् v.t.--- व्यवस्थेने ठेवणे.
colloquial कोलोक्विअल् a.--- संभाषणासंबंधी, बोलण्याच्या परिपाठातला.
colloqium कोलोक्विअम् n.--- सभा, गोष्टी, चर्चासत्र.
colloquy कोलोक्वि n.--- बोलणे, संभाषण, संवाद.
collusion कॉल्युझन् n.--- कट, संगनमत.
collyrium कॉलिरिअम् n.--- डोळ्याचे अंजन.
colocynth कोलोसिन्थ् n.--- कारले, कारल्याचा वेल. (पहा: bitter-gourd).
colon कोलन् n.--- नस, नळ, अपूर्ण विरामचिन्ह (:). विष्ठेतील पाणी शोषून ती शरीराबाहेर ढकलण्याचे मुख्य काम करणारा आतड्याचा अखेरचा रुंद भाग. ‘मोठे आतडे’.
colonel कर्नल् n.--- पलटणीतला एक मुख्य अमलदार.
colonist कॉलनिस्ट् n.--- परक्या देशात वसाहत करणारा.
colonize कॉलनाइझ् v.t.--- नवीन वसाहत करणे.
colonnade कॉलोनेड् n.--- खांबांची रांग, स्तम्भावली.
colony कॉलनि n.--- नवी वसाहत केलेला देश, नवी वसाहत करणारी मंडळी, वसाहत.
colophon कॉलोफॉन्/ कॉलफॉन् / कॉलफन् n.--- ग्रंथ, लेख इ. च्या अखेरीचे लेखकादींचा उल्लेख करणारे वाचन. ‘इतिश्री’ (वाचन), समाप्ति-/समारोप-/ - वचन.
colossal कलॉसल a.--- अवाढव्य, प्रचंड.
colossus कलॉसस् n.---मोठा पुतळा.
colour कलर् n.--- रंग, वर्ण, निमित्त. v.t.--- रंग देणे, तिखट-मीठ लावून सांगणे, निमित्त सांगणे. v.i.--- लाजणे.
colour-blind कलर्र्-ब्लाइंड् a.-- दृष्टीमध्ये एका वा अधिक रंगांची संवेदना नसलेला. रंगसंवेदनाशून्य, रंगांध.
colourful कलरफुल् a.--- रंगबिरंगी, चित्रविचित्र.
colouring कलरिंग् n.--- रंग देणे, रंगणावळ.
colt कोल्ट् n.--- नर-शिंगरू, तरुण शिंगा. पहा: ‘filly; foal’.
column कॉलम् n.--- खांब, फौजेचा गोल, स्तंभ रकाना, कोष्टक.
colure कोल्युअर् n.--- (भूगोलविद्येत) याम्योत्तरवृत्त.