Executor एक्सिक्यूटर् n.--- मृत्युपत्रात सांगितल्याप्रमाणे व्यवस्था करणारा.
Executress एक्सिक्यूट्रेस् n.--- मृत्युलेख बजावणारी स्त्री.
Exegesis एक्सिजीसिस् n.--- स्पष्टीकरण, विवरण, अर्थप्रतिवाद.
Exegete एक्सिजीट् n.--- टीकाकार, भाष्यकार.
Exegetic एक्सिजेटिक् a.--- स्पष्टीकरणात्मक, विवरणात्मक; टीकाशास्त्र.
Exegetical एक्सिजेटिकल् a.--- स्पष्टीकरणात्मक.
Exemplar एग्झेम्प्लर् n.--- नमुना, कित्ता, उदाहरण, आदर्श.
Exemplarism एग्झेम्प्लरिझम् n.--- आदर्शवाद.
Exemplary एग्झेम्प्लरि a.--- नमुनेदार, सावध करणारा, आठवण ठेवणारा/देणारा, ताकीद/इशारा देणारा. वर्णनीय, कित्ता घेण्याजोगा.
Exemplification एग्झेम्प्लिफिकेशन् n.--- उदाहरण.
Exemplify एग्झेम्प्लिफाय् v.t.--- -चे उदाहरण देणे.
Exempt एग्झेम्प्ट् v.t.--- सोडणे, काश्मा करणे. a.--- सोडलेला, मुक्त.
Exemption एग्झेम्प्शन् n.--- माफी, सुटका, मोकळीक.
Exequies एक्स्क्विझ् n.--- उत्तरकार्य क्रिया.
Exercise एक्झर्साइझ् v.t.--- चालवणे, वापरणे, शिकवणे, प्रवृत्त करणे, कसरत/व्यायाम करणे, छळणे. n.--- मुलांना दिलेला धडा, व्यायाम, कसरत, अभ्यास.
Exert एग्झर्ट् v.t.--- झटणे, मेहनत/श्रम करणे, श्रमविणे, आयास करणे.
Exertion एग्झर्शन् n.--- श्रम, खर्च, मेहनत.
Exfoliate एक्स्फोलिएट् v.t. / v.i.--- (हाड, कातडे, खनिज, झाडाची साल, इ. चे) खवल्यांच्या / थरांच्या रूपाने सुटून येणे / गळून पडणे. टाकणे / सोडणे / गाळणे.
Exhalation एक्सेलेशन् n.--- वाफ, उद्धार, निश्वास.
Exhale एक्सेल् v.t.--- वाफेच्या रूपाने बाहेर टाकणे, निश्वास सोडणे.
Exhaust एग्झॉस्ट् v.t.--- खर्चणे, फडशा उडवणे.
Exhausted एग्झॉस्टेड् p.p.a.--- खलास, उडवलेला.
Exhaustion एग्झॉस्शन् n.--- फन्ना, खडखडाट.
Exhibit एग्झिबिट् v.t.--- दाखवणे, दर्शविणे. कोर्टात दाखल करणे. n.--- दाखल लेख, कोर्टात दाखल केलेली वस्तू, प्रदर्शनातील वस्तू.
Exhibiter एग्झिबिटर् n.--- दाखवणारा, अर्ज देणारा.
Exhibition एग्झिबिशन् n.--- प्रदर्शन, तमाशा, दाखवलेली वस्तू, विद्यार्थाची नेमणूक.
Exhibitioner एग्झिबिशनर् n.--- वेतनी विद्यार्थी.
Exhilarate एक्झिलरेट् v.t.--- खुष/प्रसन्न करणे, उल्लसित करणे.
Exhilaration एक्झिलरेशन् n.--- खुषी, सुप्रसन्नता, उल्लास.
Exhort एग्झॉर्ट् v.t.--- (अधिकाराने/खडसून) उपदेश करणे, ताकीद देणे.
Exhortation एग्झॉर्टेशन् n.--- उपदेश, बोध, ताकीद.
Exhortative एग्झॉर्टेटिव्ह् a.--- उपदेशकारक.
Exhumation इ(ए)ग्झ्यूमेशन् n.--- पुरलेली वस्तु (प्रेत इ.) बाहेर काढण्याची क्रिया. पुनरुज्जीवन, पुनःप्रकाशन.
Exhume इ(ए)ग्झ्यूम् v.t.--- भूमीत गाडलेली वस्तु (विशे. प्रेत) बाहेर काढणे. -ला पुनः प्रकाशात आणणे, -चे पुनरुज्जीवन करणे.
Exiguous इग्झीग्युअस् a.--- अत्यल्प, अति तोकडा/अपुरा/कमी.
Exile एक्झाइल् v.t.--- हद्दपार करणे. n.--- हद्दपार केलेला इसम, हद्दपारी.
Exist एक्झिस्ट् v.i.--- असणे, राहणे, जमणे.
Existence एक्झिस्टन्स् n.--- अस्तित्व, स्थिति.