senate सीनेट् n.--- राज्यव्यवस्था पाहणारी मंडळी / सभा.
senator सीनेटर् n.--- सभासद.
send सेन्ड् v.t.--- पाठवणे, फेकणे, पाठवून देणे. Send forth --- बाहेर टाकणे / सोडणे. Send away --- पाठवणी करणे, निरोप देणे. Send for --- बोलावणे पाठविणे.
send-up सेन्डप् n.--- विडंबन, विडंबनात्मक चित्रण.
sender सेन्डर् n.--- पाठविणारा.
senescence सिनेसन्स् n.--- वार्धक्य येण्याची प्रक्रिया. वृद्धावस्था.
senescent सिनेसन्ट् a.--- वृद्ध होत चाललेला. वयोवृद्ध.
senile सीनाइल् a.--- जरासुलभ, जराजीर्ण.
senility सिनिलिटी n.--- जरावैलक्य, म्हातारचळ.
senior सीनिअर् n.--- वडील, मोठ्या पदवीचा, वरचा.
senna सेन n.--- सोनामुरकी, सोनामुखी चे झाड किंवा त्यापासून बनविलेली रेचक औषधी.
sennight सेन्नाइट् n.--- आठवडा.
sensation सेन्सेशन् n.--- वेदना, संवेदना, गडबड.
sense सेन्स् n.--- ज्ञान, बुद्धि, अर्थ, हाशील, अक्कल.
sense-organ सेन्स्-आॅर्गन् n.--- ज्ञानेंद्रिय (शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांपैकी एक).
senseless सेन्स्लेस् a.--- ज्ञानहीन.
sensibility सेन्सिबिलिटि n.--- हुशारी, शुद्धि, देहभान, सावधगिरी.
sensible सेन्सिबल् a.--- समजूतदार, हुशार, सूज्ञ.
sensitive सेन्सिटिव्ह् a.--- संवेदनाक्षम, संवेदनाशील, जाणीवयुक्त; हळवा; सूक्ष्मलक्षी.
sensitive plant सेन्सिटिव्ह् प्लांट् n.--- लाजाळू (झाड)
sensitization सेन्सिटझेशन् n.--- ‘Sensitize’ करण्याची प्रक्रिया.
sensitize सेन्सिटाइझ् v.t.--- -ला संवेदनशील करणे, -ला जाणीव देणे / जगविणे, -ला परिचित / प्रेरित करणे, -ला ‘sensitive’ करणे.
sensory सेन्सरी a.--- संवेदनासंबंधीचा, संवेदना-/-ग्राहक /-कारक /-वाहक.
sensual सेन्शुअल् a.--- इंद्रियासंबंधी, इंद्रियाविषयी. = Sensuous.
sensualist सेन्शुअलिस्ट् n.--- गुलहौशी.
sensuality सेन्शुअॅलिटि n.--- विषयाधीनता.
sensuous सेन्स्युअस् / सेन्शुअस् a.--- इंद्रिये व त्यांचे विषय यासंबंधी. वैषयिक. ऐंद्रिय. विषयेंद्रियसंयोगजन्य. विषय(-उपभोग-) प्रचुर. उत्तान, उद्दीपक. विषयलोलुप / पट.
sentence सेन्टेन्स् n.--- वाक्य, म्हण, शिक्षा. v.t.--- शिक्षा देणे.
sentiment सेन्टिमेंट् n.--- अभिप्राय, रस, भावना.
sentimental सेन्टिमेंटल् a.--- भावनाप्रधान.
sentinel सेन्टिनल् n.--- पाहरेकरी, चौकीदार. v.t.--- -च्या संरक्षणार्थ पाहरेकरी उभे करणे.
separate सेपरेट् v.i.--- निराळे करणे, वियोग करणे. a.--- वेगळा.
separately सेपरेट्ली ad.--- पृथक, निरनिराळा, वेगळा.
separation सेपरेशन् n.--- वियोग, विरह, तूट, फूट.
separatism सेपरटिझम् n.--- कुटीरपणाचे तत्वज्ञान / धोरण / प्रवृत्ति. विघटन-/विच्छेद-/विभाजन-/पृथकता- वाद. (अलगाववाद (हिंदी)).
separatist सेपरटिस्ट् n.--- ‘Separatism’ चा पुरस्कर्ता / अनुयायी. फुटीर. विघटन-/विभाजन / विच्छेद-पृथकता -वादी. (हिंदी : अलगाववादी).
sepsis सेप्सिस् n.--- रोगाच्या लसीच्या जंतूनचा आपल्या मूळस्थानापासून प्रसार. Pl. Sepses.
september सेप्टेम्बर् n.--- इंग्रजी वर्षांचा नववा महिना.
septennial सेप्टेनिअल् a.--- सात वर्षांनी येणारा, सात वर्षे टिकणारा, सात वर्षांनी होणारा.
septic सेप्टिक् n.--- कुजवणारा पदार्थ. a.--- कुजणारा. ‘Sepsis’-संबंधीचा /-लक्षणांचा.
septuagenarian सेप्चुअजेनेअरिअन् n.--- सत्तरीतील व्यक्ति (७०-८० वयांतील).
sepulchre सेपल्कर् n.--- दफनस्थान, श्मशान.
sepulture सेपल्चर् n.--- प्रेतक्रम, मूठमाती, थडगे.