sty / Stye स्टाय् n.--- डुक्करखाना, रांजणवाडी. (Pl.--- Styes / Sties). v.t.--- डुक्करखान्यात घालणे.
style स्टाइल् n.--- चालरीतींतील विशेष उत्कृष्टता / गुणवत्ता / ऐट / डौल / सुंदरता / आकर्षकता. घाटणी, सरणी, रीत, चाल, ढब, ठेवणं, शंकु, पदवी. v.t.--- पदवी देणे.
stylish स्टाइलिश् a.--- ऐटदार, डौलदार, नखरेल.
stymie स्टाइमी n.--- गोल्फच्या खेळांतील एक विशिष्ट खेळी / स्थिति. v.--- खेळी खेळून / डाव टाकून (बेत) हाणून पाडणे; अडचणीत आणणे.
suave स्वे(स्वा)व्ह् a.--- मृदुमनोहर, शांतमधुर, सौम्य व गोड. साळसूद.
suavity स्वाव्हिटी n.--- गोडबोलेपणा, गोडी, माधुर्य.
sub (उपपद, उपसर्ग, कर्मप्रवचनीय) = -च्या खालील / अधीन, उप / अवर / कनिष्ठ / दुय्यम, -चा अंशभूत, -च्या जवळील.
sub judice सब् ज्यूडिसी ad.--- (‘under judge’ / under court) न्यायालयाच्या / न्यायाधीशाच्या विचाराधीन. न्यायप्रविष्ट.
subaltern सबॉल्टर्न् / सबSल्टर्न् n.--- (कॅप्टन-हून) कनिष्ठ अधिकारी. a.--- कप्तानाच्या हाताखालचा. दुय्यम स्वरूपाचा / दर्जाचा.
subconscious सब्कॉन्शस् a.--- ‘conscious’ अवस्थेच्या आंत / खाली बुडलेला आणि संवेदनेच्या कक्षेंत न पडणारा. मनांत / विचारांत असलेला पण जाणिवेच्या कक्षेंत नसलेला. असंज्ञ (सावरकर). n.--- अंतःकरणाच्या प्रक्रियेंतील जाणिवेच्या क्षेत्राबाहेरील / पलीकडील भाग.
subdivide सब्डिव्हाइड् v.t.--- पोटभाग करणे / पाडणे.
subdivision सब्डिव्हिजन् n.--- पोटभाग.
subduce सब्ड्यूस् v.i.--- काढणे, काढून नेणे.
subdue सब्ड्यू v.t.--- जिंकणे, स्वाधीन करून घेणे. नरम आणणे, सौम्य करणे, जोर / तीव्रता कमी करणे.
subject सब्जेक्ट् v.t.--- अमलांत आणणे, जिंकणे, वश करणे. a.--- ताबेदार, वश. n.--- विषय, प्रजा, अधिष्ठान, आश्रय, अहंकार. पहा : ‘Predicate’.
subjection सब्जेक्शन् n.--- पारतंत्र्य, आधीनता. उद्देश्य.
subjoin सब्जॉइन् v.t.--- खाली जोडणे / लिहिणे.
subjunctive सब्जंक्टिव्ह् a.--- खाली जोडलेला. n.--- संशयार्थ. व्याकरणातील इच्छा, आशा, उपदेश, आज्ञा इ. दर्शक क्रियार्थ / क्रियापदरूप (Mood). संकेतार्थ.
sublet सब्लेट् v.t.--- पोटभाड्याने देणे.
sublimate सब्लिमेट् v.t.--- (वासना, आवेश, इ. ना) सुसंस्कृत करणे / उदात्त करणे / हितकर स्वरूप देणे.
sublimation सब्लिमेशन् n.--- (अनावर वासनावेगांचे) उदात्तीकरण / सुसंस्करण.
sublime सब्लाइम् a.--- अत्युत्तम, उमदा, नामी, उदात्त, उच्च. उंचावणारा, गूढ / सूक्ष्म आनंदानुभव देणारा, परमसुखदायी. v.i.--- घनावस्थेतून थेट बाष्पावस्थेत जाणे.
subliminal सब्लिमिनल् a.--- जाणीवेच्या उंबरठ्याशी असलेला, ‘संस्कारशेष’.
sublimity सब्लिमिटि n.--- उंचपणा, मोठेपणा.
sublunary सब्ल्युनरि a.--- या लोकचा, ऐहिक.
submarine सब्मरीन् a.--- समुद्रातला.
submerge सब्मर्ज् v.t.--- बुडविणे, जलमय करणे.
submissive सब्मिसिव्ह् a.--- हुकमी, हुकमांत राहणारा.
submission सब्मिशन् n.--- पारतंत्र्य, आधीनता, नम्रता.
submit सब्मिट् v.t.--- हार जाणे, हुकमांत राहणे.
subordinate सबॉर्डिनेट् a.--- ताबेदार, गोण.
subordination सबॉर्डिनेशन् n.--- ताबेदारी.
suborn सबॉर्न् v.t.--- लाच देऊन आपलासा करणे. (साक्षीदार) फोडणे. (अपकृत्य करण्या-) साठी भ्रष्ट मार्गाने वश करणे. खोटी साक्ष देण्यास / अन्य अपकृत्य करण्यास प्रवृत्त करणे.
subscribe सब्स्क्राइब् v.t.--- खाली लिहिणे, वर्गणीदार होणे,
subscriber सब्स्क्राइबर्
subscript सब्स्क्रिप्ट् n.--- अवालिखित, खाली लिहिलेले अक्षर / आंकडा.
subscription सब्स्क्रिप्शन् n.--- वर्गणी, दस्तुर, पट्टी.
subsequent सब्सिक्वेन्ट् a.--- मागचा.
subsequently सब्सिक्वेन्ट्लि ad.--- मागून.
subserve सब्सर्व्ह् v.t.--- उपयोगी पडणे, सहाय्य करणे.
subservience सब्सर्व्हियन्स् n.--- लाचार सेवावृत्ति, श्वानवृत्ति, (वरिष्ठांशी) खुशामतखोरी.
subside सब्साइड् v.i.--- बसणे, (गळूं) उतार पडणे.
subsidiary सब्सिडिअरि a.--- साह्यकारी, कुमकेचा.
subsidy सब्सिडि n.--- पैशाची मदत / पुरवठा, सहाय्य.
subsist सब्सिस्ट् v.i.--- निर्वाह चालणे / असणे.
subsistence सब्सिस्टन्स् n.--- निर्वाह, अस्तित्व.
substance सब्स्टन्स् n.--- पदार्थ, तत्व, द्रव्य, सार.
substantial सब्स्टॅन्शिअल् a.--- वास्तविक, घट्ट, दणकट, खंबीर, पौष्टिक, प्रमुख व महत्वाचा, सारभूत.
substantially सब्स्टॅन्शिअली ad.--- वस्तुतः, तत्वतः.
substantiate सब्स्टॅन्शिएट् v.t.--- खरे करणे.
substantive सब्स्टॅन्टिव्ह् a.--- = नाम. = Substantial.
substitute सब्स्टिट्यूट् n.--- बदली, दुसऱ्याचे स्थानी बदली म्हणून आलेली व्यक्ति / वस्तु. v.t.--- बदली देणे, -ला -च्या जागी (for) स्थापिणे / आणणे / नेमणे, -ला ‘substitute (बदली)’ म्हणून आणणे. -ची जागा घेणे, -च्या जागी येणे, -च्या जागी स्थानापन्न होणे.
substitution सब्स्टिट्यूशन् n.--- वरील (See ‘Substitute’) प्रमाणे केलेली स्थापना वा स्थानापन्न होण्याची प्रक्रिया.
subsume सब्स्यूम् : (अंग म्हणून) समाविष्ट करणे, अंतर्भाव करणे, वर्गीकृत करणे.
subterfuge सब्टर्फ्यूज् n.--- पळवाट, फट, मखलाशी, चलाखी.
subterranean सब्टरेनिअन् a.--- जमिनीतला.
subtile स(ब्)टाइल् a.--- बारीक, नाजूक, पातळ, सूक्ष्म.
subtilty सब्टिलिटि n.--- नाजूकपणा, बारीकपणा, कावा, मतलब. = Subtlety.
subtle सटल् a.--- कुशाग्र, धूर्त, कावेबाज, तलम, लुच्चा.
subtlety सटल्टी = Subtilty.
subtract सब्ट्रॅक्ट् v.t.--- वजा करणे, काटणे, बाद करणे.
subtraction सब्ट्रॅक्शन् n.--- काढणे, वजाबाकी.
suburb सबर्ब् n.--- शहराबाहेरची वाडी, उपनगर.
suburban सबर्बन् a.--- शाखापुरांत असणारा, उपनगरी(य).
suburbia n.--- उपनगर, तेथील लोकं, व त्या लोकांचे जीवन व चालीरीती.
subversion सब्व्हर्शन् n.--- विध्वंस, मोड.
subversive सब्व्हर्सिव्ह् a.--- वाटोळे करणारा.
subvert सब्व्हर्ट् v.t.--- -ला उलथून टाकणे / उद्धवस्त करणे. -चा पाया / आधार (पोखरून इ.) शक्तिहीन करणे.