concrete कॉन्क्रीट् v.t.--- जमविणे, गोठविणे. v.i.--- जमणे, गोठणे. a.---घण, दाट, पदार्थबोधक. n.--- सिमेंट, लादा.
concretion कॉन्क्रीशन् n.--- खडा, कंकर, खडे.
concubine कॉन्क्युबाइन् n.--- ठेवलेली बायको, अंगवस्त्र, राख, रंडी, उपपत्नि.
concupiscence कॉन्क्यूपिसेन्स् n.--- पापवासना, मद.
concur कॉन्कर् v.i.--- मिळणे, मान्य होणे, जुळणे.
concurrence कॉन्करन्स् n.--- ऐक्य, मेळ, संमति.
concurrent कॉन्करन्ट् a.--- मिळणारा, इकडील, एकाच वेळी चालू.
concussion कॉन्कशन् n.--- धक्का, हबका, गचका.
condemn कॉन्डेम् v.t.---दोष ठेवणे, शिक्षा सांगणे, निकामी ठरवणे, रद्द करणे, दोषी ठरवणे.
condemnation कॉन्डेम्नेशन् n.--- शिक्षा, दंड, शिक्षेचे कारण, निन्दावचन, दूषण
condensation कण्डेन्सेशन् n.--- अधिक घन/दाट होण्याची प्रक्रिया, घनीभवन (उदा. बाष्पाचे द्रवांत रूपांतर). संक्षेप, संको(कु)चन. घनीभूत/संक्षिप्त/संकुचित स्थिति/वस्तु.
condense कॉन्डेन्स् v.t.--- दाट/घट्ट करणे, थिजणे.
condescending कॉण्डसॆण्डिंग् a.--- अहंमन्य, शिष्ठ, अढीबाज, वर्चस्व दाखविणारा.
condescension कॉन्डिसेन्शन् n.--- नम्रता.
condign कॉन्डाइन् a.--- वाजवी, यथायोग्य, याठापाराध, अपराधानुरूप.
condiment कॉन्डीमेंट् n.--- तोंडी लावणे, मसाला.
condition कन्डिशन् n.--- स्थिति, अवस्था, हकीकत, शर्त, करार, गुण. विशिष्ट लक्षण/रूप/घटना यांसाठी अटळपणे आवश्यक अवस्था. (pl.--- परिस्थिति). v.t.--- -ला विशिष्ट कामांसाठी/उपयोगासाठी सुस्थितीत/इष्टस्थितीत आणणे. -ला संस्कारित करणे, - चे प्रगुणीकरण करणे. -वर अधिकार चालविणे. - चे स्वरूप ठरविणे.
conditional कन्डिशनल् a.--- सशर्त, सापेक्ष.
conditioned कन्डिशन्ड् a.--- परतंत्र, वेष्टलेला, संस्कारित.
conditioner कन्डिशनर् n.--- (केश-)संवर्धक (द्रव्य), (केश) प्रसाधन
condolation कण्डोलेशन् न.--- (मृत्यु इ. प्रसंगी) दुःखाभिव्यक्ति/ सहानुभूती-प्रदर्शन.
condolatory कण्डोलटरी a.--- ‘condolation’ च्या स्वरूपाचा.
condole कन्डोल् v.i.--- दुसर्याचे दुःख पाहून दुःखित होणे, दुःखाचा वाटा घेणे. (उदा. ...condole with him for his loss) v.t.--- (मृत्युबद्दल, नातलग इ.)-च्या पाशी दुःख/सहानुभूति व्यक्तविणे. (उदा: ...you must condole the widow.)
condolement कन्डोलमेंट् n.--- समदुःखी होणे.
condolence कन्डोलन्स् n.--- समदुःखीपणा, दुखवटा.
condominium कॉण्डमिनियम् n.--- अनेक राष्ट्रांची संयुक्त सार्वभौम सत्ता असलेला प्रदेश. अशी संयुक्त सार्वभौम सत्ता. स्वतंत्र वेगवेगळ्या मालकीच्या/स्वामित्वाच्या अनेक सदनिकां(flats)चे / दालनांचे संकुल. अशा संकुलातेल एक सदनिका/दालन.
conduce कॉन्ड्यूस् v.i.----ला उपयोगी पडणे, साधक होणे.
conducent कॉन्ड्यूसेंट्, Conducive (to) कॉन्ड्यूसिव् a.--- उपयोगी, साधक.
conduct कॉन्डक्ट् n.--- वागणूक, वहिवाट, परवाना, पुढाकार, आवरशक्ति. v.t.--- वाट दाखवून नेणे/चालविणे, वाहीवाताने. v.i.--- वागणे, पुढारी होणे.
conductor कॉन्डक्टर् n.--- पुढारी, वहिवाटदार, चालविणारा, वहिवाट करणारा, (सार्वजनिक वाहनांतील-) वाहक, घेऊन जाणारा, वाहून नेणारा. विद्युतवाहक, वीज वाहून नेऊ शकणारा (पदार्थ). Good conductor - ज्यामधून वीज वाहू शकते असा पदार्थ, सुवाहक. Bad conductor- (विजेचा) दुर्वाहक.
conduit कॉन्डिट् / कंडिट् / काँड्युइट् / कंड्विट् n.--- नळ, नळी, नहार, सारणी, बाहिका. आवरणनली (हिंदी).