pro-pru

profane प्रोफेन् a.--- (धर्माशी संबंध नसलेल्या) व्यवहारांशी संबंध, शुद्ध ऐहिक. धर्माची दीक्षा व संस्कार नसलेला, धर्मबाह्य. v.--- (पवित्र गोष्ट, तत्व, वस्तु इ. ची) अवहेलना / अनादर / अपमान करणे. विटाळणे.
profanity प्रोफॅनिटि n.--- ‘Profane’ पणा, ‘Profane’ आचार / विचार / भाषा / उच्चार. धर्मसंस्कारहीन वागणूक.
profer प्रोफर् v.t.--- (स्पष्टीकरण, समर्थन, पुरावा इ.) पुढे / सादर / देऊ करणे.
profess प्रोफेस् / प्रफेस् v.t.--- (उद्)घोषिणे, मान्य करणे, मानणे, -चा बाणा बाळगणे, -बद्दल आपली निष्ठा / भक्ति / श्रद्धा व्यक्तविणे / मानणे. -०चे सोंग करणे / आणणे, -चा आव आणणे.
profession प्रफेशन् n.--- निष्ठा, श्रद्धा, भक्ति इ. ची उघड घोषणा / अभिव्यक्ति. प्रस्थापित व्यवसाय / धंदा.
professional प्रफेशनल् a.--- ‘Profession’ संबंधीचा. विशिष्ट व्यवसाय / धंदा करणारा. अशा व्यवसाय इ. चे ज्ञान / कौशल्य / कारागिरी असणारा. (पहा: amateurish) n.--- धंदेवाईक, व्यावासायिक, तज्ज्ञ, कारागीर. (पहा: Amateur).
professionalism प्रफेशनलिझम् n.--- व्यावासायिक निष्ठा / चारित्र्य. स्वकर्मकौशल्याची चाड.
profile प्रोफाइल् n.--- एका बाजूने दिसणारे रूप. एका बाजूने घेतलेला दृष्टीवेध.रूपरेखा, रेखाचित्र, ढोबळ स्वरूप. (व्यक्तीचे) संक्षिप्त जीवनवृत्त / व्यक्तिचित्र. v.t.--- -चे संक्षिप्त रेखाचित्र / जीवनवृत्त चतारणे.
progenitor प्रोजेनिटर् n.--- मूळपुरुष, आदिपुरुष.
progenitress प्रोजेनिट्रेस् n.--- Progenitor चे स्त्रीलिंग. आदिमाता, आदिमाया.
program / Programme प्रोग्रॅम् n.--- कार्यक्रम, सभासंमेलनादि उपक्रमांची वेळ, विषय, स्थान इ. चा क्रमवार तपशील.
progressive प्रोग्रेसिव्ह् a.--- चढत्या कलेचा, प्रागतिक, प्रगामी.
progressively प्रोग्रेसिव्हलि ad.--- उत्तरोत्तर.
prohibit प्रोहिबिट् v.t.--- अटकाव करणे, मना करणे.
prohibition प्रोहिबिशन् n.--- अटकाव, मनाई, हरकत.
prohibitive प्रोहिबिटिव्ह् a.--- प्रतिबंधक.
project प्रॉजेक्ट् v.t.--- पुढे येणे, योजने, रेखणे, सोडणे. n.--- कल्पना, युक्ति, खेळ, डाव.
projectile प्रॉजेक्टाइल् a.--- पुढे ढकलणारा, दुरवेधी.
projection प्रॉजेक्शन् n.--- बाहेर आलेला भाग, योजणे, नकाशा, योजना, चित्र.
projector प्रॉजेक्टर् n.--- कल्पक, लोचक, लचांड्या.
prolapse प्रोलॅप्स् n.---- = Prolapsus. v.--- पुढे / खाली घसरणे / झुकणे / निसरणे.
prolapsus प्रोलॅप्सस् n.--- घसरण, स्खलन, स्रंसन, पुरः-/अधःपतन.
prolate प्रोलेट् a.--- वाढविलेला, विस्तारलेला.
prolated = Prolate.
prolegomenal प्रोलिगॉमिनल् a.---
prolegomenary प्रोलिगॉमिनरि a.---
prolegomenon प्रोलिगॉमिनॉन् n.--- प्रस्तावना, प्रास्ताविक, उपोद्धात. (pl. Prolegomena).
proletarian प्रोलिटेरिअन् n.--- मजूरवर्गीय, कामकरी, कामगार.
proletariat / Prolitariate प्रोलिटेरिएट् n.--- मजूरवर्ग, कामगारवर्ग; ‘शूद्रवर्ग’.
proliferate प्रलिफरेट् v.i.--- नवनवीन अंगांनी फुलून / बाहेरून येणे. वेगाने वाढणे / विकास पावणे.
proliferation प्रलिफरेशन् n.--- फुलोरा, बहर. वाढ, विकास, प्रसार.
prolitariat / Prolitariate
prolific प्रॉलिफिक् a.--- फलप्रद, फलोत्पादक.
prolix प्रॉलिक्स् a.--- लांबलचक, कंटाळवाणा.
prolixity प्रॉलिक्सिटी n.--- चर्पटपंजरी, चेंगटपणा.
prologize प्रोलॉगाइझ् v.i.--- नांदी म्हणणे, प्रस्तावना करणे.
prologue प्रोलॉग् n.--- नांदी, प्रस्तावना, पूर्वरंग.
prolong प्रोलाँग् v.t.--- लांबविणे, आणखी वाढविणे.
prolongation प्रोलाँगेशन् n.--- लांबणीवर टाकणे.
promenade प्रॉमनाड् n.--- पायीं फेरफटका करण्याचा मार्ग.
prominence प्रॉमिनन्स् n.--- उंचवटा, प्राधान्य, मान.
prominent प्रॉमिनन्ट् a.--- उंच, मुख्य, प्रधान, ठळक
promiscuity प्रॉमिस्क्यूइटी n.--- संमिश्रता, खुलेपणा, मुक्तता, मोकळेपणा. स्वैरता, स्वैराचार, अनिर्बंधता, अनियंत्रितता, विधिनिषेधशून्यता, मोकाटपणा. गोंधळ, बेबंदशाही, अंदाधुंदी, अव्यवस्था. लैंगिक संबंधाविषयीचा स्वैराचार / अनाचार / विधिनिषेधशून्यता / अतिरेक.
promiscuous प्रमिस्क्युअस् a.--- सर्वसामान्य. संमिश्र, सरमिसळ, सरसकट, भेदभावरहित. मोकळा/खुला/मुक्त/अनिर्बंध. अव्यवस्थेचा, ढिला, अनियंत्रित.
promise प्रॉमिस् v.t.--- वाचन देणे. n.--- वाचन, प्रतिज्ञा.
promisee प्रॉमिसी n.--- ज्यास वाचन मिळाले तो, प्राप्तवचन, वचनग्रहीता.
promiser प्रॉमिसर n.--- वचनदाता. = Promisor.
promisor प्रॉमिसर् n.--- = Promiser.
promising प्रॉमिसिंग् a.--- होतकरू, रूपास येण्याजोगा.
promissory प्रॉमिसरी a.--- वचनाबद्दल.
promissory note प्रॉमिसरी नोट् n.--- रोखा, दस्तऐवज.
promote प्रमोट् v.t.--- बढती देणे, वाढविणे, उत्तेजन देणे.
promotion प्रमोशन् n.--- बढती, उन्नति, प्रचार, प्रसार.
promotive प्रमोटिव्ह् a.--- साधक, उत्तेजक.
prompt प्रॉम्प्ट् a.--- रोकडा, तडकफडक, तत्पर. v.t.--- उत्तेजन देणे, प्रेरणा करणे, चेतावणे.
promptitude प्रॉम्प्टिट्यूड् n.--- जलदी, रोकडा.
promulgate प्रोमल्गेट् v.t.--- जाहीर / उघड करणे.
prone प्रोन् a.--- अधोमुख, उपडा, पालथा, उतरता, तयार. Prone (to) --- -कडे कल असलेला, -ला / साठी उन्मुख, -ची सवय / खोड असलेला.
prong प्राँग् n.--- सूळ, कांटा, शूळ. कोटिक्रमांतील विशिष्ट मुद्दा / पैलू. अंग, भाग, हिस्सा.
pronoun प्रोनाउन् n.--- सर्वनाम.
pronominal प्रोनॉमिनल् a.--- सर्वनामाचा.
pronounce प्रोनाउन्स् v.t.--- उच्चार करणे, खचित सांगणे, निश्चयपूर्वक सांगणे, उच्चारणे.
pronunciation प्रोनन्सिएशन् n.--- उच्चार.
proof प्रूफ् n.--- प्रमाण, दाखला, मुद्दा, ताळा, प्रतीती, दृढनिश्चय, क्षमता, सिद्धता, सिद्धि, मुद्रित. a.--- अभेद्य, अढळ, खबरदार, अविकार्य.
proofless प्रूफ्लेस् a.--- अप्रमाण, प्रमाणरहित.
proofsheet प्रूफ्शीट् n.--- कच्चे मुद्रित.
prop प्रॉप् v.t.--- टेकण देणे. n.--- टेंकण, टेका, आधार.
propaganda प्रॉपगॅन्डा n.--- विशिष्ट तत्वाचा प्रसार करणे.
propagate प्रॉपगेट् v.t.--- उत्पन्न करणे, फैलावणे.
propagation प्रॉपगेशन् n.--- प्रसार, फैलाव, क्रमोत्पत्ति.
propel प्रॉपेल् v.t.--- पुढे घालविणे / चालविणे / ढकलणे.
propense प्रॉपेन्स् a.--- कलाचा, ओढ्याचा.
propensity प्रॉपेन्सिटि n.--- कल, ओढा, प्रवाह, नाद, छंद.
proper प्रॉपर् a.--- नीटनेटका, योग्य, ठरीव, खाजगत, विशेष.
proper noun प्रॉपर् नाउन् n.--- विशेषनाम.
properly प्रॉपर्लि ad.--- यथायोग्य, ठीक, उजू.
property प्रॉपर्टी n.--- मालमत्ता, जिंदगी, मालकी, गुण.
prophecy प्रॉफिसि n.--- भविष्य, भाकीत, भवितव्य.
prophesy प्रॉफिसि v.t.--- भविष्य सांगणे, भाकीत करणे.
prophet प्रॉफेट् n.--- भविष्य सांगणारा, भविष्यवादी.
prophetess प्रॉफेटेस् n.--- भविष्यवादिनी.
propitiate प्रपिशिएट् v.t.--- खुलविणे, वाळविणे, शांत करणे. -ला प्रसन्न करणे, -ची आराधना करणे.
propitiation प्रपिशिएशन् n.--- आराधना.
propitious प्रोपिशस् a.--- शुभशकुनाचा, प्रसन्न, अनुकूल.
propone प्रोपोन् v.t.--- पुढे आणणे, मांडणे.
proponent प्रपोनण्ट् n.--- (विशिष्ट मत इ. चा) पुरस्कर्ता / समर्थक.
proportion प्रपोर्शन् v.t.--- प्रमाण ठेवणे. n.--- प्रमाण, मेळ, हिशेब, बेतबात, परिणाम, बेत, जम.
proportionate प्रपोर्शनेट् a.--- प्रमाणाचा, बेताचा.
proposal प्रपोझल् n.--- योजना, सूचना, शर्त.
propose प्रपोझ् v.t.--- योजणे, बेत असणे.
proposition प्रपोझिशन् n.--- सिद्धांत, उल्लेख, प्रतिज्ञा, विधान, सूचना, योजना, धर्ममत, वाक्य.
proprietary = Proprietorial
proprietor प्रप्रायटर् n.--- धनी, मालक, स्वामी.
proprietorial प्रप्राय्टोरियल् a.--- स्वामित्वविषयक. मालकीचा.
proprietorship प्रप्राय्टर्शिप् n.--- स्वामित्व, धनित्व, मालकी.
propriety प्रप्रायिटि n.--- योग्यता, शिस्त, हिशेब. प्राशस्त्य औचित्य.
prorogue प्ररोग् / प्रोरोग् v.t.--- (विविध मंडळाचे बैठकसत्र इ.) कालमर्यादेविना (बेमुदत) स्थगित करणे. लांबवणे, पुढे टाकणे. (पहा: Adjourn).
prosaic प्रोझेक् a.--- गद्यात्मक, नीरस, रुक्ष, बेचव.
proscribe प्रोस्क्राइब् v.t.--- माणसातून उठवणे / काढणे, बहिष्कृत / हद्दपार करणे, मना करणे. -वर बंदी घालणे, -ला निषिद्ध ठरविणे.
prose प्रोझ् n.--- गद्य, छंदरहित भाषण, गाथा. a.--- नीरस, बेचव, गद्यात्मक, कंटाळवाणा.
prosecute प्रॉसिक्यूट् v.t.--- फिर्याद करणे, पाठीस लागणे, पिच्छा पुरविणे, खटला चालविणे.
prosecution प्रॉसिक्यूशन् n.--- फिर्याद, पाठलाग.
prosecutor प्रॉसिक्यूटर् n.--- फिर्याद चालवणारा.
proselyte प्रॉसिलाइट् n.--- (ख्रिस्ती धर्म इ. मधील) दीक्षा घेऊन आलेला नवा अनुयायी.
proselytize प्रॉसिलिटाइझ् v.t.--- (ख्रिस्ती इ. पंथाची) दीक्षा देणे, धर्मांतर घडवून आणणे.
prosodic प्रॉसडिक् a.--- ‘Prosody’ -संबंधीचा / -विषयक, छंदशास्त्रीय.
prosody प्रॉसडी n.--- छंदशास्त्र, कविताशास्त्र, छंद. कविता किंवा पद्य किंवा गेय शब्दरचना विविध प्रकारच्या हृस्वदीर्घ क्रमांत आणि ध्वनीच्या विविध ठेक्यांत / चालीत रचण्याचे शास्त्र.
prospect प्रॉस्पेक्ट् v.t.---दृष्टीपुढचा प्रदेश, धोरण, यशः-/श्री- -संभव, देखावा, सुमार, आशा, अपेक्षा, लाभापेक्षा. (खनिज वगैरे साठी विशिष्ट क्षेत्राचा) शोध घेणे /परीक्षण करणे. n.---
prospective प्रॉस्पेक्टिव् a.--- दूरदृष्टी, विचारी, प्रत्यक्षांत येण्याजोगे, अपेक्षिण्यायोग्य.
prospectivity प्रस्पेक्टिविटि n.--- (एखाद्या क्षेत्राची / योजनेची) संभाव्य / अपेक्षित लाभदायकता.
prospectus प्रॉस्पेक्टस् n.--- योजनापत्रक. v.t.---
prosper प्रॉस्पर् v.t.--- सिद्धीस जाणे, यश पावणे, भरभराट होणे, चढती कळा असणे, जिंकणे.
prosperity प्रॉस्पेरिटि n.--- भरभराट, आबादानी.
prosperous प्रॉस्परस् a.--- भरभराटीचा यशस्वी.
prostate प्रोस्टेट् n.--- सस्तन प्राण्यांतील पुरुषशरीरांतील मूत्राशय व मूत्रमार्ग यांमधील ग्रंथि / ग्रंथिपुंज. पुरस्थ-ग्रंथि. (जननेंद्रियसमूहाचा एक भाग. पुरुषवीर्यास कांही द्रव्यें पुरविणारा).
prostration साष्टांग नमस्कार.
prostitute प्रॉस्टिट्यूट् n.--- कसबीण. v.t.--- भाड खाणे.
prostitution प्रॉस्टिट्यूशन् n.--- वेश्यावृत्ति.
prostrate प्रॉस्ट्रेट् v.t.--- -ला (पालथे) जमीनदोस्त करणे, लोळवणे. (स्वतःला) पालथे पाडणे, दंडवत घालणे, लोटांगण घालणे, शरणागति पत्करणे, शरण जाणे. (prostrate before…= -च्या सामोरे / पुढे लोटांगण घालणे. )a.--- दंडवत घातलेला, जमीनदोस्त झालेला, खचलेला. (वनस्पतिसंबंधी:) जमिनीवर पसरणारा. भूमीवर आडवा पसरणारा / वाढणारा.
prostration प्रॉस्ट्रेशन् n.--- दंडवत, नमस्कार, शक्तिपात, ग्लानि.
protagonist प्रोटॅगनिस्ट् n.--- नायक / नायिका, मुख्य पात्र; प्रमुख समर्थक / पुरस्कर्ता / पक्षधर (हिंदी).
protect प्रोटेक्ट् v.t.--- संरक्षण करणे, पाठीशी घालणे.
protection प्रोटेक्शन् n.--- संरक्षण, बचाव, आश्रय.
protector प्रोटेक्टर् n.--- रक्षक, वाली, प्रतिपालक.
protectress प्रोटेक्ट्रेस् n.--- रक्षणकर्ती, आश्रयदाती.
protege प्रॉटिझे n.--- आश्रित, शरणागत, सहाय्यर्थी.
protein प्रोटीन् n.--- रासायनिक तत्वावर आधारित शरीरपुष्टीस आवश्यक अन्नघटकांच्या वर्गांमधील एक प्रथिन.
protension प्रोटेन्शन् n.--- पुढे पसरण्याची क्रिया. पुरस्मरण, पुरःक्रमण, दिगंतर / लांबी; कालांतर / अवधि.
protensity प्रोटेन्सिटि n.--- टिकून / चालू / पसरत राहण्याचा गुण / क्रिया.
protensive प्रोटेन्सिव्ह् a.--- पसरणारा, चालू / टिकून राहणारा.
proteomics प्रोटिओमिक्स् n.--- प्रथिनशास्त्र.
protest प्रोटेस्ट् v.t.--- छातीला हात लावून बोलणे. हवाला देणे. n.--- हरकत, तक्रार, निषेध, लेखी विरोध.
proto- मूळचा, प्रथम, प्राथमिक, प्रारंभिक इ. अर्थाचे शब्दारंभी येणारे उपपद (कच्चा, अपूर्ण, अविकासित अशी अर्थच्छटा).
protocol प्रोटकॉल् n.--- वाटाघाटी / करार वगैरेची नोंद, (आंतरराष्ट्रीय कराराचा कागद; दरबारी शिष्टाचार; राजशिष्टाचार, शिष्टाचारविधि; करारपत्रांतील शिष्टाचारात्मक विधानें.
protoplasm प्रोटोप्लॅझम् n.--- जवळजवळ जीवावस्थेस पोचलेले जीवप्राय शरीरद्रव्य.
prototype प्रोटोटाइप् n.--- मूळ, नमुना, प्रकृति.
protozoa प्रोटोझोआ n.--- एक-पेशी सूक्ष्म जंतूचा वर्ग.
protract प्रोट्रॅक्ट् v.t.--- दिवसगतीवर टाकणे, वाढवणे.
protraction प्रोट्रॅक्शन् n.--- लांबण, विलंब.
protrude प्रट्रूड् v.i.--- दांड्या- / खुंट्या- प्रमाणे सुळक्याने बाहेर येणे / उगविणे / वर / पुढे येणे. घुसणे, घुसून राहणे.
protrusion प्रट्रूजन् n.--- दांडा, खुंटा, सुळका, यांप्रमाणे वर / बाहेर / पुढे आलेला भाग. घुसलेला भाग. असे पुढे येण्याची / घुसण्याची प्रक्रिया / स्थिति.
protuberance प्रोट्युबरन्स् n.--- उंचवटा, टेंगूळ, फुगवटा.
protuberant प्रोट्युबरन्ट् n.--- फुगीर, उंच, फुगलेला, ठळक.
protuberate प्रोट्युबरेट् v.i.--- फुगणे, बाहेर येणे.
proud प्राउड् a.--- गर्विष्ठ, ताठ्याचा, पीळदार, अहंकारी, मानी, माजोरा, भव्य, कौतुकास्पद.
prove प्रूव्ह् v.t.--- सिद्ध करणे, दृष्टीस येणे, पडताळणे, अनुभव / प्रचीती येणे.
provenance प्रॉव्हनन्स् n.--- विशिष्टजन्मता, तज्जन्यता, उगम, उत्पत्तिसंभव.
provencal प्रोव्हन्सल् a. / n.--- आग्नेय फ्रान्समधील ‘प्रोव्हान्स’ (Provence) प्रांताचा (निवासी).
provence प्रोव्हान्स् --- पहाः ‘Provencal’
provender प्रोव्हेन्डर् n.--- दाणा, वेरण, दानाचारा.
proverb प्रॉव्हर्ब् n.--- म्हण, आहणा, न्याय, लोकोत्ति.
proverbial प्रॉव्हर्बिअल् a.--- म्हणीचा, लोकप्रसिद्ध.
provide प्रोव्हाइड् v.t.--- तजवीज / तरतूद करणे, पुरविणे, पुरवठा करणे, अट सांगणे.
provided प्रोव्हाइडेड् conj.--- जर, असे असेल तर.
providence प्रॉव्हिडन्स् n.--- ईश्वरीसूत्र, दूरदृष्टि, ईश्वर.
provident प्रॉव्हिडन्ट् a.--- दूरदृष्टि असणारा, मितव्ययी, ईश्वरी सूत्राने घडलेला.
providential प्रॉव्हिडेन्शिअल् a.--- ईश्वरी सूत्राचा. ईश्वराच्या लीलेच्या संबंधाचा / स्वरूपाचा.
providentially प्रोव्हिडेन्शिअली ad.--- ईश्वरी सूत्राने.
province प्रॉव्हिन्स् n.--- प्रांत, सुभा, अधीकार, काम, खाते, हक्क.
provincial प्रॉव्हिन्शिअल् a.--- प्रांताचा, प्रांतिक, सुभ्याचा, एकदेशी, एकप्रांती.
provision प्रोव्हिजन् v.t.--- अन्नाची तरतूद करणे. n.--- बेगमी, संग्रह, अट, तजवीज, साहित्य, अन्न.
provisional प्रोव्हिजनल् a.--- चालचलाऊ, कामचलाऊ.
proviso प्रोव्हिजो n.--- संकेत, शर्त, अट, कलम.
provisory प्रोव्हिजोरि a.--- शर्तीचा, कामचलाऊ.
provocation प्रोव्होकेशन् n.--- उत्तेजन, उद्दीपन, चिथावणी, भयाचे कारण.
provoke प्रोव्होक् v.t.--- चेतविणे, कोपविणे, चिडविणे, प्रदीप्त करणे.
provost प्रॉव्हस्ट् n.--- अधिकारी, मॅजिस्ट्रेट.
prowess प्रॉवेस् n.--- पराक्रम, शौर्य, प्रताप.
prowl प्रॉउल् v.t.--- शिकारीच्या संधानावर / मागावर फिरणे.
proximate प्रॉग्झिमेट् a.--- जवळचा, लगतचा.
proximity प्रॉग्झिमेटि n.--- लगता, जवळपणा, संसर्ग.
proxy प्रॉक्सि n.--- प्रतिनिधि, प्रतिनिधित्व, बदली.
prude प्रूड् n.--- लाजेचे ढोंग करणारी स्त्री, मुरकेबाज स्त्री.
prudence प्रूडन्स् n.--- शहाणपण, सारासार विचार, काटकसर.
prudent प्रूडन्ट् a.--- व्यवस्थित, सारासारविचारी, दूरदर्शी, काटकसरी.
prudential प्रूडेन्शल् a. / n.--- विवेकयुक्त, विचारीपणाचा, सारासार विचार करणारा / विवेकी (व्यक्ति).
prudery प्रूडरि n.--- खोटा विनय, मुरकेबाजपणा.
prudish प्रूडिश् a.--- अतिनम्र, अतिसभ्य, अतिविनयशील, विनय / नम्रता / सभ्यता यांचा आव आणणारा / यांचे नाटक करणारा.
prune प्रून् v.t.--- कलम करणे, छाटणे. (झाड, केस, लेख (लेखनातील शब्द), खर्च इ.) -मधील अनावश्यक पसाऱ्यात / विस्तारात काटछाट करणे. (पहा: ‘Pare’).
prurience प्रुअरिअन्स् n.--- वासनातिरेक, तीव्र / विकृत भोगेच्छा / कामेच्छा. खाज, कडू.
pruriency प्रुअरिअन्सी n.--- वासनाहत चित्तवृत्ति.
prurient प्रुअरिअन्ट् a.--- विकृत वासनेचा, विषयासक्त, विषयधुंद.