Yew-Yor

Yew यू n.--- (Yew tree) शंकूच्या आकाराचे सदाहरित झाड.
Yggdrasil येग्ड्रेसिल् n.--- स्कॅण्डीनेव्हियाच्या पौराणिक कथांमधील राख वृक्ष ज्याची मुळे आणि फांद्या स्वर्ग, पृथ्वी व नरक यांना जोडतात.
Yid यिड् n.---(अपमानकारक ) ज्यू
Yiddish यिडिश् a & n.--- मध्य आणि पूर्वी युरोपमध्ये ज्यू वापरत असलेल्या भाषेचा किंवा ती भाषा, यिडिश् बोलणारा माणूस.
Yield यील्ड् v.t.--- देणे, परत करणे, उत्पन्न करणे, शरण जाणे, निपजणे, लाभ देणे. v.i.--- नमते घेणे, कबूल करणे, संमती देणे, मागणी / न्यूनत्व मान्य करणे, चर्चेत दुसऱ्यास बोलण्याचा अधिकार देणे. n.--- उत्पन्न, निपज, लाभ शेतीचे उत्पादन. Yeild point n.--- (भौतिक शास्त्र) तणाव किंवा दाब ज्याच्या पलीकडे एखादा पदार्थ प्लास्टिक मध्ये बदलतो.
Yin यिन् n.--- चिनी दर्शन शास्त्रातील सृष्टीचे निष्क्रिय स्त्री तत्व.
Yippee यिपी int.--- आनंद आणि उत्साह दर्शक उद्गार.
Yipple, Yippy यिपल्, यिपी n.--- राजकारणात सक्रिय असा अमेरिकन हिप्पी.
Ylang-ylang ईलांग्-ईलांग् n.--- मलेशियात सापडणारे एक झाड ज्याच्या पिवळ्या फुलांपासून अत्तर बनविले जाते, ते अत्तर.
YMCA वाय् एम् सी ए abbr.--- Young Men’s Christian Assosiation.
Yob यॉब् n.--- आडमुठ्या, शुंभ, ठोंब्या, गुंड.
Yod यॉड् n.--- यहुदी (हिब्रू) वर्णमालेतील दहाव्वे सर्वात छोटे अक्षर.
Yodel योडल् v.t. & v.i.--- मंजुळ व गोड पण निराळ्या कृत्रिम आवाजात गाणे (स्विस् डोंगरी रहिवाशांसारखे)
Yoga योग n.--- आत्म्याचे परमात्म्याशी मीलन होते असे प्रतिपादन करणारे हिंदू तत्वज्ञान.
Yoghurt योगर्ट् n.---दही.
Yogi योगी n.--- योग साधनेचा अनुयायी.
Yo-heave-ho यो-हीव्-हो int.--- नांगर उचलताना खलाशांनी काढलेला आवाज.
Yo-(ho-)ho योहोहो int.--- लक्ष वेधून घेण्यासाठी वापरला जाणारा उदगार.श्रमाचे काम करत असताना नाविकांनी केलेला उद्घोष.
Yoicks योइक्स् int.--- कोल्ह्याचे लक्ष वेधण्यासाठी कोल्ह्याच्या शिकाऱ्याने हाक मारताना उच्चारलेला शब्द.
Yoke योक् n.--- जूं, जोखड, जोत. (रोमन इतिहास) प्रतीकात्मक रित्या जोत किंवा तीन भाल्यांची कमान ज्याच्या खाली हरलेल्या शत्रूला परेड करवली जात असे. (अलंकारिक ) सत्ता--- submitted to his yoke; ऐक्याचे बंधन, विशेष करून विवाह बंधन. बैलांची जोडी; (पुरातन ) एक बैलांची जोडी, एका दिवसात नांगरु शकेल एवढी जमीन; शर्ट, ब्लॉउज किंवा कोटाचा स्वतंत्रपणे बनविलेला खांद्याचा भाग / तुकडा; जोताच्या आकाराची एखादी वस्तू; घंटा लटकविण्यात येणारा आडवा खांब; सुकाणूची आडवी चपटी पट्टी. Yoke-bone योक् बोन् n.---चेहरा व डोक्याची हाडे जोडणारेगालाचे हाड. Yoke-fellow; Yoke-mate लग्न किंवा कामातील जोडीदार/भागीदार. v.t.--- वर जोत ठेवणे; लग्नात वा इतरत्र जोडीस एकत्र आणणे, एकाला दुसऱ्याशी जोडणे, एकत्र काम करणे. v.i.---
Yokel योकल् n.--- खेडवळ माणूस, गांवढळ, अडाणी. ( पोटभाषा) हिरवा सुतारपक्षी.
Yolk योक् n.--- अंड्यातील पिवळा भाग. शेळीच्या लोकरीतील नैसर्गिक चिकट पदार्थ. v.t.---अंड्यातून बाहेर येण्यापूर्वी बाळाचे पोषण करणे. Yolk-bag, -sac अंड्यातील पिवळ बलक थैली,
Yom Kippur यॉम् किपूर् n.--- प्रायश्चित्ताचा दिवस (हिब्रू)
Yon यॉन् a. & adv.--- त्या दिशेला, पलीकडे, Hither and yon वेगवेगळ्या दिशांना, इकडे तिकडे; pron.--- पलीकडचा माणूस किंवा पलीकडची वस्तू.
Yonder यॉंडर् a. & adv.--- त्या दिशेला, तिकडे, पलीकडील, लांब पण दृष्टिक्षेपात असलेला.
Yoni योनी n.--- स्त्रीचे बाह्य जननेंद्रीय, हिंदूंद्वारे पूज्य मानले जाणारे मादी जननेंद्रिय. परंपरागत रित्या गोलाकार दगडाने दाखविले जाणारे दैवी प्रजनन शक्तीचे चिन्ह.
Yoo-hoo यूहू int.--- एखाद्याचे लक्ष वेधून घेण्याच्या इच्छेने केलेली अभिव्यक्ती.(उत्स्फूर्तपणाचे उदगार.)
Yore योर n.--- adv.--- फार पूर्वी n.--- फार पूर्वीचा काळ.
York यॉक् n.---York and Lancaster - इंग्लंडच्या war of roses मधील दोन विरुद्ध पक्ष. House of York एडवर्ड IV पासून रिचर्ड III पर्यंतचे इंग्लिश राजे. v.t.---yorker चा चेंडू टाकणे.
Yorker यॉकर् n.--- (क्रिकेट) नेमका बॅटखाली टप्पा पडेल असा टाकलेला चेंडू.
Yorkist यॉकस्ट् a. & n.--- Wars of the Roses मध्ये White Rose पार्टीचा अनुयायी. York शहराच्या पहिल्या ड्यूकच्या परिवाराचा अनुयायी.
Yorks. abbr. Yorkshire.
Yorkshire यॉक्शर् n.--- Yorkshire man, Yorkshire woman--- Yorkshire मध्ये जन्मलेला किंवा राहणारा. Yorkshire terrier--- छोटे, केसाळ निळसर तपकिरी कुत्रे.
Yoruba योरुब n.--- पश्चिम अफ्रिका विशेष करून नायजीरियामधील काळा माणूस किंवा त्यांच्या भाषेचे स्थानिक नाव.