que-quo

queasy क्वीझी a.--- अपचनप्रवण, अशांत (पोट), अस्वस्थ, अस्थिर, डळमळीत (शरीर, हृदय, मन इ.), (अन्न इ. बद्दल) अतिचिकित्साखोर (रोग वगैरेमुळे).
queasiness क्वीझीनेस् n.--- अस्वस्थता, अशांतता, मळमळ.
queen क्वीन् n.--- राणी, बुदबळातील वजीर, राज्ञी.
queenhood क्वीन्हुड् n.--- राज्ञीपद, राणीपणा.
queer क्वीर् a.--- विलक्षण, बेढव, तऱ्हेवाईक. Queer the pitch = बिघडविणे, अडथळा आणणे.
quell क्वेल् v.t.--- शमन करणे, मोडणे, दाबणे, दडपून टाकणे, बीमोड करणे, निःपान करणे, नरम आणणे.
quench क्वेन्च् v.t.--- विझविणे, भागवणे (तृषा).
querulous क्वरूलस् a.--- तक्रारखोर, चिडका, रुसण्याची खोड असलेला.
query क्वीरि n.--- सवाल, प्रश्न. v.t.--- प्रश्न करणे. शंकेने, -बद्दल प्रश्न / वाद / संशय उपस्थित करणे.
quest क्वेस्ट् n.--- शोध, तलास, तपास.
question क्वेश्चन् v.t.--- प्रश्न विचारणे, संशय / शंका घेणे. n.--- प्रश्न, शंका.
questionable क्वेश्चनेबल् a.--- शंकार्ह, शंकायोग्य.
questionnaire क्वे-/ के-/ श्चनेअर् n.--- (मत अजमावणीसाठी बनवलेली) प्रश्नमालिका.
queue क्यू n.--- (पशूची) शेपटी. केसांची लांब वेणी. भाल्याची काठी. रांग, ओळ. v.t.--- (केसांचा इ.) शेपटा घालणे. v.i.--- रांग लावणे, रांगेत उभे राहणे.
quezon City n.--- फिलिपाइन्स (Philippines) गणराज्याची राजधानी.
quibble क्विबल् v.i.--- आडफांटे फोडणे, आढेवेढे घेणे. (बारीकसारीक / क्षुल्लक गोष्टींवर) वाद घालणे. n.--- आडफांटा, आढेवेढे, उडवाउडव.
quick क्विक् a.--- जिवंत, जलदीचा, हुशार, चणचणीत, रागीट. ad.--- लवकर, जलद. n.--- जिव्हाळी, मर्मस्थान. झाडांनी बनलेले (कुंपण).
quicken क्विकन् v.t.--- जिवंत करणे, त्वरा करणे, गति वाढविणे. प्रज्वलित करणे, चेतविणे.
quicklime क्विक्लाइम् n.--- चुनकळ्या.
quickness क्विक्नेस् n.--- जलदी, हुशारी, चलाखी.
quicksand क्विक्सँड् n.--- रुपण, रूपणीची पुळण.
quickset क्विक्सेट् n.--- कलाम, खुंट, मोखा.
quicksilver क्विक्सिल्वर् n.--- पारा.
quiescent क्वाएसण्ट् a.--- शांत, स्थिर, निःशब्द, अनुच्चारित (अक्षर).
quiet क्वाइअट् a.--- शांत, स्वस्थ, गरीब, निवांत, अचल. n.--- शांतपणा, निश्चलता, निवांतपणा. v.t.--- शांतविणे, शमविणे, समजूत करणे, स्वस्थ करणे.
quietly क्वाएट्लि ad.--- शांतपणाने, गुपचूप.
quietude क्वाएट्युड् n.--- स्वस्थता, शांतपणा.
quill क्विल् n.--- पीस, साळपीस, साळेचा कांटा, (रूपकार्थाने) लेखणी.
quilt क्विल्ट् v.t.--- रू भरणे. n.--- रजई, लेप, गोधडी.
quinsy क्विन्झी n.--- घशांतील खवखव, घशाचा / टॉन्सिल्स ग्रंथींचा दाह.
quintessence क्विन्टेस्सेन्स् n.--- कस, सार, सत्व.
quintuple क्विन्ट्यूपल् a.--- पांचपट, पांच पांच. v.i.--- पांचपट होणे.
quip क्विप् n.--- टोमणा, टोला. (प्रति-)टोमणा मारणे, उपरोधिक शेरा मारणे.
quire क्वायर् n.--- कागदाचा दस्ता. = choir.
quirk क्वर्क् n.--- बोलण्याची लपेट, भाषणांतील लपंडाव.
quirky क्वर्की a.--- चमत्कारिक, विचित्र, अवघड.
quit क्विट् v.t.--- सोडून देणे, मुक्त करणे. a.--- ऋणमुक्त, मोकळा.
quite क्वाइट् ad.--- केवळ, अगदी, निखालस.
quiver क्विव्हर् v.t.--- कांपणे. n.--- भाता, कंप.
quiz क्विझ् v.t.-- -ला बारकाईने प्रश्न विचारणे. अशा रीतीने अज्ञातासंबंधीचा तपास करणे. n.--- सामान्य ज्ञानाची परीक्षा घेणारी स्पर्धा किंवा स्पर्धात्मक खेळ.
quizzical क्विझिकल् a.--- थट्टेचा, मस्करीचा, चमत्कारिक, विचित्र.
quoit कॉ(क्वॉ)इट् n.--- तबकडी, चक्र, कडे.
quorum क्वॉरम् n.--- कायदेशीरपणे सभेचे कामकाज चालू ठेवण्यास आवश्यक उपस्थित सभासदसंख्या, गणसंख्या.
quota कोटा n.--- वर्गणी, वाटणी, हिस्सेरशी.
quotation कोटेशन् n.--- अवतरण, उतारा.
quote क्वोट् v.t.--- दुसर्या पुस्तकांतील वाक्य घेणे. = Quotation.
quoth क्वोथ् v.t.--- म्हणाला, बोलला.
quotidian क्वोटिडियन् a.--- नित्याचा, दैनंदिन.
quotient क्वोशन्ट् n.--- भागाकार, भाग, फल. परस्परप्रमाणांक (ratio).