scrabble स्क्रॅबल् v.i.--- खरडणे, रेघोट्या काढणे; खुरटत जाणे; धडपडत सरकणे.
scraggy स्क्रॅगी a.--- कृश, सडसडीत.
scramble स्क्रॅम्बल् v.i.--- हातपाय टेकून चालणे. झोम्बाझोम्बी / झटापट करणे. n.-- झटापट, झोम्बाझोम्बी. Scramble through --- कठीण परिस्थितीतून बाहेर पडणे, कष्टाने संकटातून सुटणे.
scrap स्क्रॅप् n.--- (तासणी, कापणी इ. कामांनंतर उरलेला) तुकडे, भुगा, चिंध्या इ. चा कचरा. मोड, भंगार. (किरकोळ) वाद / झगडा / झटापट. v.--- ‘Scrap’ म्हणून बाजूस काढणे / निकालांत काढणे / विल्हेवाट लावणे, बाद करणे, टाळून देणे. (किरकोळ) वाद / झगडा / झटापट करणे.
scrap-book स्क्रॅप्-बुक् n.--- कात्रण - वही.
scrape स्क्रेप् v.t.---
scraping स्क्रेपिंग् n.--- कीस, खरवड.
scrappy स्क्रॅपी a.--- तुकड्यांनी बनलेले, विस्कळित, फुटकळ, तुटक.
scratch स्क्रॅच् v.t.--- ओचकारणे, (हाताच्या / पायाच्या नखांनी) उकरणे; खाजविणे, खरडणे, खरवडणे. ओरबाडणे. n.--- ओरखाडा, बोचकारा. Scratch out --- खरवडून / खोदून काढणे / टाकणे, काट मारणे.
scrawl स्क्रॉल् v.t.--- रेखाटणे, रेघोट्या काढणे, ओरपणे, खरडणे. गिचमीड अक्षरांत / घाईने लिहिणे. n.--- गिचमीड, रेघोट्या.
scrawny स्क्रॉनी a.--- अत्यंत बारीक / पातळ / किडकिडीत / कृश.
scream स्क्रीम् v.i.--- किंकाळी फोडणे, ओरडणे. n.--- किंकाळी.
screech स्क्रीच् n.--- किंचाळी, किंकाळी. v.i.--- किंचाळणे.
screed स्क्रीड् n.--- चिंधी, पट्टा, लांब तुकडा; पट्टी; लांबडे प्रवचन (तोंडाचा पट्टा).
screen स्क्रीन् v.t.--- पडदा / झाकण घालणे, चाळणे, झांकणें. n.--- आडपडदा, पडदा, चाळण.
screw स्क्र्यू v.t.--- मळसूत्राने फिरविणे, पिळणे. n.--- मळसूत्र.
scribble स्क्रिबल् n.--- गिचमीड, भरकट.
scribe स्क्राइब् n.--- लेखक, लिहिणारा.
scrimp स्क्रिंप् v.t.--- अल्प मोबदला देऊन कामास लावणे; वेतन देण्यांत काटछाट / काटकसर करणे. v.i.--- काटकसरीने वागणे, चिक्कूपणा करणे.
script स्क्रिप्ट् n.--- लिखित मजकूर, लेख(न), (विशिष्ट ग्रंथातील) मूळ शब्द / वचन. भाषण / घोषणा / नाट्यसंवाद इ. मधील प्रस्तुत करायचा मजकूर / पटकथा. विशिष्ट भाषेची विशिष्ट लिपि. हस्ताक्षर (किंवा त्याची छापील प्रतिकृति).
scripture स्क्रिप्चर् n.--- धर्मशास्त्र, शास्त्र. a.--- शास्त्रोक्त.
scroll स्क्रोल् n.--- गुंडाळी, पट, सळसळणे.
scrotal स्क्रोटल् a.--- ‘scrotum’ -चा / -विषयक.
scrotum स्क्रोटम् n.--- पुरुषांडकोष / पुरुषांडकोश, पुरुषप्राण्याच्या प्रजोत्पादक ग्रंथींची पिशवी (संस्कृत - सीमन्).
scrub स्क्रब् v.t.--- खोडणे, काढून टाकणे, टाकणे, रद्द करणे. घासणे, घासटणे. n.--- घासण्याचे साधन (बोळा, कुंचला इ.), घासणी. घासून साफ / तुळतुळीत / नितळ करायची प्रक्रिया. हलकट मनुष्य, चोर.
scrubber स्क्रबर् n.--- देहव्यापार करणारी स्त्री; ओबडधोबड / कळकट / कुरूप व्यक्ति. = Scrub (n.).
scruff स्क्रफ् n.--- मानेचा मागचा भाग. गचांडी.
scrum स्क्रम् n.--- रग्बी (rugby) खेळांतील एक व्यूहरचना, गोंधळ-युक्त संघर्ष.
scrunch स्क्रन्च् n.--- चिरडताना होणारा चर् चर् असा आवाज, चोळामोळा. v.t.--- चिरडणे, चोळामोळा करणे. v.i.--- चिरडले जाणे, चोळामोळा होणे. = crunch (v.)
scrupulosity स्क्रूप्यूलॉसिटी n.--- पापभीरुत्व, नीतिमत्तेची चाड, धर्मनिष्ठा, सदाचार.
scrupulous स्क्रूप्युलस् a.--- संशयी.
scrupulously स्क्रूप्युलस्लि ad.--- संशयाने.
scrutinize स्क्रुटिनाइझ् v.t.--- शोधणे, परीक्षा करणे.
scrutiny स्क्रुटिनि n.--- शॊध, चौकशी.
scuba स्कुबा (‘Self contained underwater breathing apparatus) (अद्याक्षरसंज्ञा) n.--- पाण्यामध्ये श्वासोच्छ्वास करण्याची यंत्रणा, (शरीराच्छादनरूप) जलश्वसन यंत्र(णा). = aqualung.
scuba-dive स्कुबा-डाइव्ह् v.i.--- ‘Scuba’ च्या साहाय्याने पाण्यांत बुडून फिरणे / पोहणे / गोताखोरी करणे.
scuff स्कफ् v.i.--- पाय किंवा पादत्राणे न उचलता घासत चालणे. पायानी किंवा बुटांनी घासणे / खरवडणे. n.--- पायांनी किंवा बुटांनी घासण्याची क्रिया, पायांनी किंवा बुटांनी घासण्याचा आवाज.
scuffle स्कफल् v.i.--- झटापटी / झोम्बाझोम्बी करणे. n.--- झोम्बाझोम्बी, धक्काधक्की, झटापट.
scull स्कल् n.--- डोक्याची कवटी, लहान वल्हे.
scullion स्कलियन् n.--- स्वयंपाकघरातील नोकर.
sculk = Skulk.
sculpt स्कलप्ट् v.t.--- (प्रतिमा, कल्पना, व्यक्ति, वस्तु इ.) कोरीव कामाच्या रूपाने चित्रित करणे. (लाकूड, दगड इ.) -ला कामात परिवर्तित करणे. कोरीव काम, ओतकाम इ. द्वारा -ला आकार / लावण्य / रूप देणे.
sculptor स्कल्पटर् n.--- कारागीर, खोदीव काम करणारा, मूर्तिकार, शिल्पकार.
sculpture स्कल्प्चर् n.--- खोदीव काम. v.t.--- =Sculpt.
scum स्कम् v.t.--- माळी काढणे. n.--- मळी, तवंग, फेस.
scupper स्कपर् v.t.--- उध्वस्त करणे, मोडून टाकणे, हाणून पाडणे, उधळून लावणे.
scurf स्कर्फ् n.--- कोंडा, भूस.
scurfy स्कर्फी a.--- भुसाने भरलेला.
scurrilous स्करिलस् a.--- फटकळ तोंडाचा,शिव्या देणारा, फटकळ. दुष्ट, दुराचारी, सद्सद्विवेकहीन. ग्राम्य भाषेंतील, शिवराळ.
scurry स्करी v.i.--- घाईने / गडबडीने / लगबगीने / जलदीने जाणे / हालचाल करणे. n.--- घाई(-गर्दी), लगबग.
scurvy स्कर्व्ही a.--- अनादराचा, अपमानाचा. अतिशय अधम / नीच / हलकट / क्षुद्रबुद्धीचा. तुच्छ, तिरस्करणीय.
scuttle स्कटल् v.t.--- (नाव वगैरे बुडविण्यास तिला) भोके पाडणे, (एखादे काम) अर्धवट सोडून देणे / उपेक्षिणे / दुर्लक्षिणे. Scuttle (off / away): पळ काढणे.