H.C-han

H.C.F. ‘Highest Common Factor’ चे संक्षिप्त रूप. म. सा. वि. (महन्तम सामाईक / साधारण विभाजक).
ha. ‘Hectare’ चे संक्षिप्त रूप.
haberdashery हॅबर्डॅशरि n.--- सुया, गुंड्या, सूत, इ. क्षुल्लक वस्तु.
habit हॅबिट् v.t.--- पोषाख घालणे. n.--- प्रकृति, सवय, पोषाख, परिपाठ, अभ्यास.
habitant हॅबिटन्ट् n.--- राहणारा, वस्ती करणारा.
habitat हॅबिटॅट् / हॅबटॅट् n.---
habitation हॅबिटेशन् n.--- राहणी, वस्ती, घर.
habitual हॅबिच्युअल् a.--- सवयीचा, परिपाठातला.
habituate हॅबिच्युएट् v.t.--- सवय / अभ्यास लावणे.
habitue अबीट्यूए n.--- वावरणारा, ये-जा करणारा, तत्रचारी.
habituee n.--- ‘ Habitue’ चे स्त्रीलिंग.
hack हॅक् n.--- तुकडा, खाप, खांचा, भाडोत्री घोडे, दगड फोडण्याची सुतकी. कोयता, छोटी कुऱ्हाड. v.t.---वेडेवांकडे कापणे, अडखळत बोलणे. वेडेवाकडे घाव घालून तोडणे / कापणे.
hackle हॅकल् v.t.--- पिंजणे, पिंजारणे. n.--- फणी, (मोर, कोंबडा, इ. चा) मानेवरील पिसारा. ‘To raise the hackle of’--- -ला लढाईस प्रवृत्त करणे. ‘To get one’s hackles up’ --- लढ्यास प्रवृत्त होणे.
hackneyed a.--- हॅक्नीड् a.--- जुना, सामान्य, कंटाळवाणा, खूप काळ प्रचारात असल्यामुळे नाविन्य नष्ट झालेला.
haemoglobin n.--- हीमग्लोबिन् n.--- पृष्ठवंशी (vertebrates) च्या रक्तात तांबड्या गोलकांतून प्राणवायू (ऑक्सिजन) वाहून नेणारी प्रथिने. ह्यामुळेच रक्ताला लाल रंग येतो.
haemophilia / hemophilia हीमफिलिय n.--- एक अनुवंशिक रोग (विशेषतः पुरुषांमध्ये दिसून येणारा) ज्यामुळे जखमेतून वगैरे वाहणारे रक्त लवकर गोठून खपली धरण्यास वेळ लागतो व त्यामुळे अतिरक्तस्राव होतो.
haemorrhage / hemorrhage हेमरेज् n.--- तीव्र रक्तस्त्राव.
haemorrhoid हेमरॉइड् n.--- मूळव्याध (रोग) (= Piles).
haft हॅफ्ट् n.--- दांडा, मूठ.
hag हॅग् n.--- थेरडी, जखीण, हडळ, हेडंबा.
haggard हॅगर्ड् a.--- थेरडा, खप्पड, निस्तेज, फिकट, रोडावलेला, अशक्त, थकलेला.
haggle हॅगल् v.t.--- आडवेतिडवे कापून चिरडून / चिंधड्या करून टाकणे. v.i.--- घासाघीस करणे, कराराच्या अटींवरून / अटी ठरविण्यासाठी वाद घालणे. n.--- घासाघीस.
hagiographer हॅगिओग्राफर् n.--- संतचरित्रकार, संतसंकीर्तक, लीलाचरित्रलेखक, भक्तिभावाने चरित्रसंकीर्तन करणारा.
hagiography हॅगिओग्राफी n.--- साधुचरित्रलेखन / वर्णन, लीलाचरित्र, भक्तिरसप्रधान चरित्र, गुणगानप्रधान चरित्रग्रंथ.
haiku हायकू n.--- (pl. haiku) एक तीन भागांचा सामान्यतः : १७ अक्षरांचा चुटकेवजा विशिष्ट जपानी कविताप्रकार.
hail हेल् v.t.--- हांका मारणे, हटकणे, दुरून नमस्कार करणे, सलामी देणे. v.i.--- गारांचा पाऊस पडणे, वर्षाव होणे. n.--- गारा, गारांची वृष्टि, वर्षाव, मारा. -चे स्वागत करणे, (उद्गारवाचक) वाहवा! शाबास! नमस्ते, रामराम. Hails : गारपीट. Hail from : कडून येणे, -चा मूळ रहिवासी असणे.
hair हेअर् n.--- केस, वेश, केंसर, बाल.
hair-dresser हेअर् ड्रेसर् n.--- नापीत, न्हावी.
halberd हालबर्ड् n.--- भाला.
halberdier हालबर्डीर् n.--- भालेकरी, भालेवाला.
halcyon हॅल्सिअन् a.--- शांततेचा, सुखाचा, निर्विघ्नतेचा.
hale हेल् a.--- धट्टाकट्टा, धडधाकट, धडाखडा, टणक, आरोग्यपूर्ण.
hale and hearty हेल् अॅण्ड् हार्टी a.--- खुशाल, क्षेम.
half हाफ् n.--- अर्धा, निम्मा, अर्धा भाग, अर्धेल, ‘सावत्र’ अर्थाचे उपपद (पहा: ‘Step’ खालील टिपण)
half-blood हाफ्ब्ल्ड् n.--- सापत्नसंबंध.
half-brother हाफ् ब्रदर् n.--- सापत्न भाऊ. Half faced - कंगाल, दरिद्री. Half heard अर्धवट ऐकलेला.
halite हॅलिट् / हॅलाइट् n.--- सैंधव, शेंदेलोण, खनिज मीठ (= Rocksalt).
hall हॉल् हॉल n.--- दिवाणखाना, सभागृह, घराच्या प्रवेशद्वाराला लागून असलेली प्रशस्त बैठकीची खोली, महाविद्यालयातील वसती साठी किंवा वर्ग भरण्यासाठी बांधलेली मोठी इमारत.
hall-mark हॉल्मार्क् n.--- (सोने, चांदी, इ. वरील) अधिकृत चिन्ह, मुद्रा. v.t.--- अशा चिन्हाने अंकित करणे.
halloo हॅलो v.t.--- ललकारणे, पुकारणे.
hallow हॅलो v.t.--- पवित्र करणे. पवित्र कार्यासाठी रोखून ठेवणे. -चा आदर करणे.
halloween हॅलोईन् / हॅल्वीन् n.--- ‘All-hallow-even’ चे संक्षिप्त रूप, ख्रिश्चन धर्मांतील, ऑक्टोबर च्या अखेरच्या रात्रींचा सर्व-संत-संमेलन उत्सव (जुन्या चेटकिणींच्या संमेलन-दिनाचे ख्रिश्चन रूपांतर). ‘All Saints Day’ च्या आदल्या रात्रींचा ख्रिश्चनकाळापासून चालत आलेला) सण (‘November-eve’ हे एक नाव).
hallucinate ह/हॅल्युसिनेट् v.t.--- भ्रमविणे, भ्रमणे.
hallucination ह/हॅल्युसिनेशन् n.--- भ्रम, भूल, संचार. मनांतील भ्रमजन्य चित्र / प्रतिमा खऱ्यासारखे दिसण्याची विकृति. असे दिसणारे भ्रामक चित्र / प्रतिमा, भ्रम-चित्र(-दर्शन).
halo हेलो n.--- सूर्याचे / चंद्राचे खळे, परिवेश, तेजोवलय. v.t.--- खळे, तेजोवलय इ. ने वेढणे. (pl. halo(e)s, halones).
halogen हेलोजेन् n.--- धातूशी मिश्रित होऊन क्षार बनणारे द्रव्य (उदा: क्लोरिन्, फ्लुरीन्, ब्रोमिन्, आयोडिन्,…).
halt हॉल्ट् v.i.--- थांबणे, मुक्काम करणे, तळ देणे, लंगडणे, कांकू करणे. n.--- मुक्काम, तळ. a.--- लंगडा.
halter हाल्टर् v.t.--- काढणी गळ्यात घालणे. n.--- काढणी, फांशी देण्याची दोरी.
halve हाव्ह् v.t.--- सारखे दोन तुकडे करणे / वाटणे.
ham हॅम् n.--- गुडघ्याखालचा / गुडघ्याखालचा भाग, डुकराची मांडी (खाण्यासाठी कापलेल्या / मारलेल्या डुकराची मांडी).
hamburger हॅम्ब(र्)गर् n.--- मांवसाचा कीस मध्ये घातलेला मोठा पाव / केक, कोचालेले मांस. तळलेला / परतलेला hamburger, भरलेली पावजोडी.
hamhanded हॅम्हॅन्डेड् a.--- गांवन्ढळपणाचा, अडाणीपणाचा, बावळट, गलथान.
hamlet हॅम्लेट् n.--- वाडी, खेडे.
hammer हॅमर् v.t.--- हतोड्याने ठोकणे. n.--- हातोडा.
hammock हॅमॉक् n.--- हिंदोळा, झोला, झोपाळा.
hamper हॅम्पर् n.--- पेटारा, विडी, करंडी. v.t.--- अडचणीत / फेऱ्यांत घालणे / पाडणे.
hamstring हॅम्स्ट्रिंग् n.--- गुड्घ्यामागील स्नायुबंध; हे स्नायुबंध कापणे, पांगुळविणे, निकामी करणे. (past tense or past participle : hamstrung or hamstringed).
hand हँड् v.t.--- हाताने उचलून देणे, हातोहात पोचविणे. n.--- हात, पंजा, बाजू, हातोटी, वळण, अक्षर, सत्ता, अधिकार, कर, कामकरी, पाणी.
handbook हॅन्ड्बुक् n.--- साधारण माहितीचे लहान पुस्तक.
handbill हॅन्ड्बिल् n.--- जाहिरात, हस्तपत्रक.
handcraft हॅन्ड्क्रॅफ्ट् n.--- हातगाडी.
handcuff हॅन्ड्कफ् n.--- हातबेडी. v.t.--- हातबेडी घालणे.
handful हॅन्ड्फुल् n.--- पसाभर, मूठभर.
handicap हॅन्डिकॅप् n.--- अशक्तता, अधूपणा, विकलता, व्यंग. v.t.--- -ला ‘handicap’ देणे / अशक्त / अधू करणे. -वर ‘handicap’ लादणे.
handicapped हॅन्डिकॅप्ड् a.--- अधू, विकल, विकलांग, अपंग, लुळा, सव्यंग, पंगु, पांगळा.
handicraft हॅन्डिक्रॅफ्ट् n.--- शिल्पकाम, कला, हुन्नर.
handiness हॅन्डिनेस् n.--- हस्तकौशल्य, हातोटी.
handkerchief हॅन्ड्कर्चीफ् n.--- रुमाल, हातरुमाल.
handle हॅन्डल् v.t.--- हातात धरणे, हात लावणे, वापरणे. n.--- दांडा, मूठ, साधन.
handmaid / Handmaiden हँड्मेड् / हँड्मेडन् n.--- दासी, परिचारिका.
handset हँड्सेट् n.--- दूरध्वनियंत्रा(telephone)तील मुखांग (mouthpiece) यांना जोडून केलेला हाती / मुठीत धरण्याचा भाग. मुष्टिग्राह्य यंत्रांग.
handsome हँड्सम् a.--- सुंदर, रूपवान, गोजिरवाणा.
handwriting हँड्रायटिंग् n.--- हस्ताक्षर.
handy हँडी a.--- हातालान्यास सोपा, उपयुक्त, हाताशी (उपलब्ध) असलेला. हस्तकौशल्य-/हस्तलाघव-युक्त.
handycam हॅन्डिकॅम् n.--- छोटे छायाचित्रयंत्र / छायाचित्रक. हात-कॅमेरा.
handyman हँडीमॅन् n.--- हरकाम्या, विविधहस्त-अकौशल्य-संपन्न.
hang हँग् v.t. and v.i.--- टांगणे, लाटकावणे, अडकविणे, फांशी देणे, लोंबत ठेवणे, घिरट्या घालणे, भिजत पडणे, गुंतणे. n.--- लंबमान अवस्था; उतार लोंबणारी वस्तु. to get the hang of : एखादे उपकरण वापरण्याचा सराव होणे, -चा सराव होणे, -ची नित कल्पना येणे; -वर प्रभुत्व / ताबा मिळविणे. H. down: खाली घालणे. H. back--- मागे घेणे, ओढणे. Hang on: पिच्छा पुरवणे.
hang-over हँग्-ओव्हर् n.--- मागे राहिलेला / उरलेला / गाळलेला / शिल्लक राहिलेला भाग, अवशेष.
hangar हँङर् n.--- विमानं ठेवण्याची मोठी इमारत. v.t.--- अश्याप्रकरच्या मोठ्या इमारतीत ठेवणे.
hangdog हँग्डॉग् a.--- लज्जित, लाचार.
hanger हँगर् n.--- लोंबणारा, फांशीचा आंकडा.
hanger-on हँगर्-ऑन् n.--- (स्वत्वशून्य) आश्रित, (क्षुद्र स्वार्थासाठी) नीचसेवा करणारा.
hanging हँगिंग् n.--- झालर, फाशीने आलेला मृत्यु.
hangman हँग्मन् n.--- मांग, फांशी देणारा.
hank हँक् n.--- अंमल, ताबा.
hanker हँकर् v.i.--- छंद घेणे, सोस असणे.