jab जॅब् v.t.--- घुसविणे, टोचणे.
jabber जॅबर् v.t.--- वचावचा बोलणे, वटवटणे, वटवट करणे.
jack जॅक् n.--- फणसाचे झाड, फणस, ग्वलाशी.
jack boot n.--- पाय पिंढरीसह झाकणारे सैनिकाचे पादत्राण / जोडा. मोठा मजबूत बूट (जोडा). (-गुढघ्याच्या वरपर्यंत पाय झाकणारा).
jack-daw जॅकडॉ n.--- काळ्या व करड्या रंगाचा आणि (सामान्य कावळ्याहून) छोट्या आकाराचा कावळा.
jackal जॅकॉल् n.--- कोल्हा.
jackanapes जॅकनेप्स् n.--- मग्रूर, उद्धट, गर्विष्ठ मनुष्य, टारगट मनुष्य, खोडकर मूल.
jackass जॅकॅस् n.--- गाढव.
jacuzzi जकूझी n.--- आंघोळीच्या कुंडातील गरम पाण्याच्या फवाऱ्यांची यंत्रणा. (अशा विशिष्ट यंत्रणेच्या व्यापारचिन्हावर आधारित). स्नानकुंडातील उष्णवारियंत्ररचना.
jade जेड् v.t.--- शिणविणे, क्षीण होणे, गाळून जाणे; कंटाळणे. N.--- खेचर, रांडरू, उंडगी, एक हिरवे रत्न.
jaded जेडिड् a.--- क्षीण, थकलेला, गळून गेलेला.
jag जॅग् n.--- खांडा, कातरा. v.t.--- दांते पाडणे.
jaggery जॅगरि n.--- गुळीसाखर, गूळ, कच्ची / ना धुतलेली पांढरी ना केलेली साखर.
jaguar जॅग्वा(र्) n.--- (अमेरिकन जातीचा) बिबळ्या (ठिपक्यांचा) वाघ (शास्त्रीय नाव : Panthera onca) (पहा: Leopard, Panther).
jail जेल् n.--- तुरुंग, बंदीखाना, कारागृह.
jailer जेलर् n.--- तुरुंगावरचा अधिकारी.
jakes जेक्स् n.--- शेतखाना.
jam जॅम् v.t.--- चेंगरणे, चिरडणे. n.--- मुरंबा.
jamb जॅम् n.--- दरवाज्याच्या (चौकटीच्या) बाजूचा खांब.
jangle जॅन्गल् v.t.--- कर्कश वा असंबद्ध वाजणे, भांडणे. असंबद्ध ध्वनि.
janitor जॅनिटर् n.--- देवडीवाला, द्वारपाळ, चौकीदार, शिपाई.
jantiness जॅन्टिनेस् n.--- छानी, छानछुकी.
janty जॅन्टि a.--- छानदार, छानछुकीचा.
january जॅनुअरी n.--- इंग्रजी पहिला महिना.
jape जेप् v.i. / n.--- थट्टा / परिहास / गम्मत (करणे), टोमणा (मारणे).
jar जार् v.t.--- कर्कश वाजणे. n.--- बेबनाव असणे, कर्कशस्वर, खरखर, करकर,भांडण. घडा, मडके.
jargon जार्गन् n.--- हेंगाडी भाषा, रांगडी बोली, वटवट, कलकल, अगडबंब (सांकेतिक / शास्त्रीय) परिभाषा/शब्द. अल्पार्थवाही शब्दजंजाळ / वाग्जाल.
jasmine जॅस्मिन् n.--- जाई. Arabian Jasmine - मोगरी. Eared Jasmine - जुई.
jaundice जॉन्डिस् n.--- कावीळ, कामिण.
jaundiced जॉन्डिस्ड् a.--- कावीळ झालेला, कलुषित, मत्सरग्रस्त.
jaunt जॉन्ट् n.--- सहल, सफर. v.i.--- सहल करणे.
jaunty जॉन्टि a.--- चैनी, नखरेबाज. आनंदी, उत्साही.
jauntiness जॉन्टिनेस् n.--- चैन, ऐट, झोक, दिमाख.
jaw जॉ n.--- जबडा.
jaw tooth जॉ टूथ् n.--- दाढा, दष्ट्रा.
jay जे n.--- नीळकंठ, मणिकंठ, मैना.
jealous जेलस् a.--- मत्सरी, संशयी, अभिमानी.
jealousy जेलसि n.--- मत्सर, हेवा, संशय, अभिमान.
jear जीअर् v.t.--- थट्टा / टवाळी करणे. n.--- थट्टा, टवाळी.
jell (with) जेल् v.i.--- -शी जुळणे / मेल खाणे / मिसळणे / एकरूप होणे.
jellaba / djellaba / jellabah जेलाबा n.--- डोक्यापासून पायापर्यंत शरीरास झाकणारा अरब लोकांचा झगा / झोळणा.
jejune जिजून् a.--- रुक्ष, भाकड, निरास, निकस, तथ्यहीन.
jo up v.t.--- -ला चैतन्य आणणे, -ला उत्साहित करणे.
jennet जेन्नेट् n.--- तट्टू.
jeopard जेपर्ड् v.t.--- धोक्यात घालणे, -ला बाधा आणणे.
jeopardize जेपर्डाइझ् v.t.---
jeopardy जेपर्डि n.--- जोखीम, भय, धोका.
jerk जर्क् v.t.--- हिसकणे. n.--- हिसका, हिसडा, आसडा.
jerkwater जर्क्-वॉटर् a.--- दूरचा, लहान, क्षुल्लक, क्षुद्र. (उदा: The collector was camping at Dimhatty, a jerkwater hamlet near Kotagiri).
jerry-built जेरि-बिल्ट् a.--- कच्च्या / भिकार द्रव्यान्नी रचलेला / बांधलेला / बनवलेला.
jest जेस्ट् v.i.--- थट्टा मस्करी करणे. n.--- थट्टा, खेळ.
jesuit जेसूट् n.--- कावेबाज, कपटी माणूस.
jet जेट् n.--- कारंज, फवारा, चिळकांडी, एक कठिण काळ्याभोर रंगाचा (अलंकारोपयोगी)कोळशाचा प्रकार, फवारा/चिळकांडी इ. सोडणारे छिद्र, फवाऱ्याच्या शक्तीने उडणारे विमान. v.t.--- ‘jet’ विमानाने जाणे.
jet - lag जेट्-लॅग् n.--- वेगवान विमानाने दीर्घ प्रवास केल्यावर दोन स्थानांच्या स्थानिक वेळांतील मोठ्या फरकामुळे, शरीराच्या स्वाभाविक, वेळापत्रकांत/तालबद्धतेत होणारा बिघाड, कालविस्खलन/-विस्खलित.
jetsam जेटसम् n.--- धोक्यांतील जहाज वाचविण्यासाठी समुद्रात फेकून देण्यास योग्य कींव्हाआ फेकून दिलेले सामान. निकालात काढण्याजोगी वस्तू.
jettison जेटिसन् v.t.--- -ला, नौकेचे/वाहनाचे ओझे हलके करण्यासाठी इ., नौके-/वाहना- बाहेर फेकून देणे, त्यागिणे, नाकारून सोडून देणे. n.--- ‘Jettison’ (v.) करण्याची (प्र-)क्रिया.
jew ज्यू n.--- यहुदी, हिब्रू, इस्त्राएली, जोहोवा-उपासक.
jewel जुएल् n.--- रत्न, जवाहीर, मणि, परिस.
jeweler / Jeweller जुएलर् n.--- जवाहिऱ्या.
jewelry जुएलरी n.--- जडावाचे दागिने, जवाहीर.
jewess ज्यूएस् n.--- यहुदीण. Jewish ज्युइश् a.--- यहुदी.
jibe जाइब् v./n.--- gibe
jiffy जिफी n.--- क्षण, पळ.
jig जिग् n.--- सरल/शीघ्र/चंचल नृत्य v.i.--- सरळ/शीघ्र/चंचल नृत्य करणे.
jiggery-pokery जिगरी-पॉकरी n.--- थोतांड, खूळ, लबाडी/कारस्थान-युक्त काम.
jilt जिल्ट् v.i.--- प्रेमभंग करणे, प्रेमाची भूल घालून विश्वासघात करणे
jingle जिन्गल् v.i.--- खुळखुळणे. N.--- खुळखुळ, रुणझुण.
jingo जिंगो n.--- अतिरेकी (लढाऊ) राष्ट्रभक्त.
jingoism जिंगोइझम् n.--- अतिरेकी राष्ट्रप्रेम.
jin(n) जिन् n.--- (मुस्लिम पुराणातील) भूत, पिशाच्च, अद्भुत शक्तीचा राक्षस, सिद्ध योनी (अद्भुत शक्तिधारी जीव). पहा: ‘genie’.
jinnee = Jin (pl.: Jinn).
jinx or Jynx जिंक्स् n.--- जादू, भूल; करंटा / अशुभ मनुष्य/वस्तु. v.t./v.i.---अशुभ शक्तीने बाधित/दैवहत होणे/करणे.
jitter जिट(र्) v.i.--- चिंताकुल / भयग्रस्त होणे, डगमगणे.
jitters जिटर्स् n.--- चिंताग्रस्तता, भयकूलता, घबराट.
jittery जिटरी a.--- घाबरलेला, डगमगलेला, डळमळीत, घाबरा.
jive जाइव्ह् n.--- झोकदार संगीत. अशा संगीतावरील नाच. Jive to : v.--- झोकदार संगीतावर नाचणे.