ree-ref

reecho रीएको v.t.--- प्रतिध्वनि / प्रतिशब्द दुमदुमविणे.
reed रीड् n.--- बोरू, वेत, अलगुज, पेपरे.
reef रीफ् n.--- पाण्यातील खडक. पाण्यामधील पृष्ठभागाच्या जवळपर्यंत आलेला खडकाळ / वालुकामय उंच भूभाग.
reek रीक् v.i.--- वाफ / धूर निघणे / येणे, धुमसने, घाणणे. Reek of --- -चा वास मारणे. Reek with --- -ने घणणे. n.--- वाफ, धूर, (वाफेचा / धुराचा) उद्गार.
reel रील् v.i.--- झोकांडी खाणे. n.--- झोकांडी, चरक.
reenforce रीएन्फोर्स् v.t.--- कुमक करणे, बळ वाढवणे.
reenforcement रीएन्फोर्स्मेन्ट् n.--- कुमक.
reenter रीएन्टर् v.t.--- पुनः दाखल करणे.
refection रिफेक्शन् n.--- फराळ, उपहार.
refectory रिफेक्टरी n.--- एका धार्मिक संस्थेमधील भोजनकक्ष.
refer रिफर् v.t.--- हवालणे, बोलण्याचा झोक असणे, लागू पडणे, विचारणे, चौकशी करणे, (मदत इ. साठी) पाठवणे.
referee रेफ्री n.---तिऱ्हाईत, विशिष्ट प्रष्णांवर सल्ल्यासाठी नियुक्त (व्यक्ति). v.i.--- ‘Referee’ म्हणून काम करणे.
reference रेफरन्स् n.--- हवाला, धोरण, संबंध, (कारवाई, मदत, सल्ला, इ. साठी) पाठवणी.
referendum रेफरेण्डम् n.--- विशिष्ट कारवाई / व्यवस्था याबद्दल सर्व नागरिकांचे स्पष्ट मत आजमावण्याची प्रक्रिया. सार्वमत. जनमतसंग्रह (हिंदी). पहा : ‘Plebiscite’.
referral रिफरल् (अभिप्रायार्थ / सल्ल्यासाठी) पाठवणीसंबंधी.
referrant रिफरन्ट् n.--- मार्गदर्शक, दिग्दर्शक, निकष.
refine रिफाइन् v.t.--- साफ करणे, सुधारणे, शोधणे.
refinement रिफाइन्मेंट् n.--- संशोधन, सुधारणा.
reflect रिफ्लेक्ट् v.t.--- प्रतिबिंब पाडणे, चिंतन करणे, बोलावणे, परावर्तन होणे / करणे, मागे वळणे.
reflection रिफ्लेक्शन् n.--- प्रतिबिंब, परावर्तन, चिंतन.
reflective रिफ्लेक्टिव्ह् a.--- परावर्तन करणारा, परावर्तनाचा, विचारी, वर्तनोद्भव, चिंतनोद्भव.
reflector रिफ्लेक्टर् n.--- परावर्तक.
reflex रिफ्लेक्स् n.--- प्रतिबिंब, प्रतिछाया, पडछाया. n.--- प्रतिबिंबित, परावृत्त. v.t.--- मागे वळणे.
reform रिफॉर्म् v.t.--- सुधारणे, वाटेवर आणणे, पुन्हा करणे, बनवणे. n.--- नावे स्वरूप, सुधारणा.
reformer रिफॉर्मर् n.--- सुधारणारा, सुधारक.
refract रिफ्रॅक्ट् v.t.--- वाकवणे, एकदम वळवणे.
refractory रिफ्रॅक्टरि a.--- आडदांड, शिरजोर, हट्टी, अडलेला, अदाह्य.
refragable रिफ्रागेबल् a.--- प्रतिकार्य, खंडणीय.
refrain रिफ्रेन् v.t.--- राहविणे, राहणे, आटोपणे.
refrangible रिफ्रान्जिबल् a.--- वाकडा करण्याजोगा.
refresh रिफ्रेश् v.t.--- टवटवी आणणे, सावरणे.
refreshing रिफ्रेशिंग् n.--- ताजा करणारा.
refreshment रिफ्रेश्मेंट् n.--- विसावा, उपहार.
refrigerate रिफ्रिजरेट् v.t.--- गोठवणे, गोठवून सुरक्षित ठेवणे. V.i.--- गोठणे, गोठून (सुरक्षित) राहणे.
refrigerator रिफ्रिजरेट(र्) n.--- शीतपेटिका / कपाट / गृह. प्रशीतक (हिंदी). (प्र-)शीतकालय. = Fridge.
refuge रेफ्यूज् n.--- आश्रय, तरणोपाय, उपाय.
refugee रेफ्यूजी n.--- शरण येणारा, शरणागत, निर्वासित.
refulgency रिफल्जन्सि n.--- तेज, कांती, चकाकी.
refulgent रिफल्जन्ट् a.--- तेजस्वी, दैदीप्यमान.
refund रिफन्ड् v.t.---परत देणे, परत करणे. n.--- घेतलेल्या / वसूललेल्या पैशाच्या परत करण्याची क्रिया. अशा रीतीने परत केलेला पैसा /रक्कम.
refurbish रिफSर्बिश् v.t.--- -चा जीर्णोद्धार करणे, -ला नवे रूप देणे.
refusal रिफ्यूझल् n.--- नकार, निषेध, नाकारणे.
refuse रिफ्यूज् v.t.--- नाकारणे. n.--- कचरा, गाळ, कर.
refutal रिफ्यूटल् n.--- खंडन, निराकारण, विक्षेप.
refute रिफ्यूट् v.t.--- -चे खंडन करणे.