depress डिप्रेस् v.t.--- दडपणे, नम्र करणे, खिन्न करणे, मंदावणे, मनोभंग करणे.
depression डिप्रेशन् n.--- दडपणे, खिन्नता, मंदी, विषण्णता, विषाद, उद्विग्नता.
deprive डिप्राइव्ह् v.t.--- हिसकून घेणे, नागविणे.
deputation डेप्युटेशन् n.--- नेमून पाठविलेली मनुष्ये, शिष्टमंडळ.
depth डेप्थ् n.--- खोली, गांभीर्य.
depute डेप्यूट् v.t.--- वकील नेमून पाठविणे. n.--- कारभारी.
deputy डेप्यूटी n.--- प्रतिनिधि, गुमास्ता, मुनीम.
derailment डिरेल्मेंट् n.--- रुळावरून आगगाडी खाली येणे.
deranged डिरेन्ज्ड् a.--- वेडसर, वेडा, भ्रमिष्ट.
derangement डिरेंज्मेंट् n.--- अव्यवस्था, गोंधळ, घोळ.
dereliction डेरिलिक्शन् n.--- कर्तव्यच्युति, परित्याग, (कामाची) अक्षम्य हेळसांड/झीज.
deride डिराइड् v.t.--- तुच्छतेने थट्टा/उपहास करणे.
derision डिरीझन् n.--- तुच्छतापूर्वक थट्टा, उपहास, टर, विटम्बना.
derivate डेरिव्हेट् a.---साधित. n.--- साधित शब्द.
derivation डेरिव्हेशन् n.--- व्युत्पत्ति, मूळ.
derivative डेरिव्हेटिव्ह् n.--- साधित (शब्द), तद्धितांत, कृदंत. a.--- सविकार, विकार होऊन बदललेला.
derive डिराइव्ह् v.t. and v.i.--- काढणे, पावणे, मिळवणे, शब्दाची व्युत्पत्ति/फोड करणे.
dermatologist डSर्मटॉलजिस्ट n.--- ‘Dermatology’ जाणणारा/त्यानुसार उपचार करणारा.
dermatology डSर्मटॉलजी n.--- त्वचेचे किंव्हा त्वचारोगाचे शास्त्र.
derogate डेरोगेट् v.t.---मानहानी करणे. v.i.--- स्वतःच्या इभ्रतीस न शोभणारे वर्तन करणे, स्वतःची पातळी सोडून हलकटपणाने वागणे. ऱ्हास/अवनति पावणे. हीन/निकृष्ट पातळीस येणे, दर्जाने उतरणे.
derogative डेरोगेटिव्ह् a.--- अब्रू कमी करणारा, मानहानिकारक, कमीपणा आणणारा.
derogatory डिरॉगटरी a.--- अवहेलनात्मक, अवमानकारी, अपमानास्पद, अनादरयुक्त, दूषणात्मक, हेताळणीकारक, हीन लेखणारा, हिणवणारा.
derring-do डेरिंगडू n.--- साहस, धैर्य.
descant डेस्कॅन्ट् v.t.--- पोवाडा म्हणणे/गाणे.
descend डिसेंड् v.i.--- उतरणे, वंशात उत्पन्न होणे. v.t.--- उतरून जाणे.
descendant डिसेन्डन्ट् n.--- वंशज, संतति, अवलाद.
descending डिसेंडिंग् a.--- उतरता, उतार.
descent डिसेंट् n.--- अधोगति, दौड, हल्ला, ऱ्हास, वंश.
describe डिस्क्राइब् v.t.--- वर्णन करणे, कथन करणे, रेखणे, चालीने दर्शविणे.
description डिस्क्रिप्शन् n.--- वर्णन, रेखाटणे, प्रकार, जात.
descriptive डिस्क्रिप्टिव्ह् a.--- वर्णनपर, वर्णनात्मक.
descry डिस्क्राय् v.t.--- लांबून पाहणे, टेहळणे.
desecrate डेसिक्रेट् v.t.--- विटाळणे, बाटविणे.
desecration डेसिक्रेशन् n.--- विटाळणे, प्रतिष्ठाभंग.
desert डेसर्ट् n./a.--- ओसाड/पडित. डेझर्ट् a.--- ओसाड, पडित. n.--- रान, जंगल, अरण्य; उचित बक्षीस व शिक्षा (बहुधा बहुवचनात). गुणवत्ता, गुणावगुणमूल्य, मूल्यमापन. v.i.--- सोडून जाणे, फरारी होणे. v.t.----ला सोडणे/टाकणे.
desertion डिझर्शन् n.--- चाकरी सोडून जाणे, पळून जाणे.
deserve डिझर्व्ह् v.t.--- लायक असणे, पात्र होणे.
deservedly डिझर्व्हेड्लि ad.--- यथान्याय, वाजवी.
desiccate डेसिकेट् v.t.--- वाळवणे, वाळवून टिकाऊ बनविणे.
desiderate डेसिडरेट् v.t.--- जरूर असणे, इच्छणे.