tre-tri

treachery ट्रेचरि n.--- विश्वासघात, दगलबाजी, दगा.
treacherous ट्रेचरस् a.--- विश्वासघातकी, घातकी.
treacle ट्रीकल् n.--- काकवी, मळी.
tread ट्रेड् v.t.--- पायाखाली तुडवणे / मळणे, वरून जाणे. n.--- पाऊल, चालण्याची ढब, गति.
treadmill ट्रेड्मिल् n.--- पायांनी जोर लावून फिरविण्याचे चाक /चक्की / गिरणी / चरक. पायचक्की. फिरत्या पट्टयावर उभे राहून (एकाच जागी) चालण्याचा व्यायाम करण्याचे यंत्र. संचलनयंत्र, चालचक्की. कंटाळवाणा कार्यक्रम.
treason ट्रीझन् n.--- विश्वासघात, द्रोह. राजद्रोह, राष्ट्रद्रोह / देशद्रोह, फितूरी, दगाबाजी.
treasure ट्रेझर् n.--- पैसा, गुणांचा निधी, ठेवा.
treasure-trove ट्रेझर्-ट्रोव्ह् n.--- (निर्जन, दुर्गम स्थानी सापडलेला) धनाचा / संपत्तीचा साठा, गुप्त-धन (-अधिगम), गुप्त-खजिना / निधि, प्रच्छन्नगुप्त कोष, निधान (अवाप्ति), घबाड.
treasurer ट्रेझरर् n.--- खजिनदार.
treasury ट्रेझरी n.--- खजिना, भांडागार.
treat ट्रीट् v.t.--- वागवणे, मेजवानी करणे, उपाय करणे, तहाचे बोलणे करणे, विषय लिहिणे, औषध देणे. मेजवानी, खाना-महोत्सव, आनंदोत्सव.
treatise ट्रीटाइझ् n.--- ग्रंथ, पुस्तक, प्रबंध.
treatment ट्रीट्मेण्ट् n.--- वागणूक, उपचार.
treaty ट्रीटी n.--- तह, करार, ठराव.
treble ट्रिबल् a.--- तीन पदरी, तिप्पट. n.--- टिपेचा सूर.
tree ट्री n.--- झाड, वृक्ष. v.t.--- झाडावर चढवणे.
trek ट्रेक् n.--- (कष्टाचा) प्रवास, यातायात. v.--- (कष्टाने) प्रवास / यात्रा करणे.
trellis ट्रेलिस् n.--- जाळी, ताटी.
tremble ट्रेम्बल् v.i.--- लटलट कांपणे. n.--- कंप, लटलट, हुडहुडी.
tremendous ट्रेमेन्डस् a.--- भयंकर, अनर्थकारक.
tremor ट्रेम(र्) / ट्रीम(र्) n.--- कापरे; कंप. वेपथु, अंगमेजयत्व, थरार, थरकाप, थरारी.
trench ट्रेन्च् n.--- खंदक, चर. v.t.--- खंदक खणणे.
trenchant ट्रेन्चण्ट् a.--- धारदार, तीक्ष्ण; रोखटोक, स्पष्ट, मर्मस्पर्शी. धारदार, तीक्ष्ण, मर्मस्पर्शी. रोखठोक, परखड, स्पष्ट.
trencher ट्रेन्चर् n.--- खोदणारा.
trendy ट्रेण्डी a.--- खर्चिक थाटमाटास चटावलेला. आधुनिकतेचे / थाटमाटाचे / नखऱ्यांचे अंधानुकरण करणारा.
trepidation ट्रेपिडेशन् n.--- थरकांप, भय, भयवेपथु, भिती.
trespass ट्रेस्पस् / ट्रेस्पॅस् v.i.--- हुकूम ना मानणे, दुसऱ्याच्या जमिनीत अनाधिकाराने पाय ठेवणे. n.--- अमर्यादा, अपराध, बेकायदा प्रवेश.
tress ट्रेस् n.--- वेणी, बुचडा, झुलूप. Tresses --- (विशे. स्त्रीचे) डोक्याचे केस. v.t.--- ‘tress’ मध्ये (डोक्यावरील) केसांची रचना करणे.
trevet ट्रिव्हेट् n.--- तिवई.
tri- ट्राय् prefix --- ‘तीन या अर्थाचे उपपद. (उदा.: Trilateral)
triad ट्रायॅड् n.--- त्रिकूट, त्रय, तिघांचा समूह. तीन.
trial ट्रायल् n.--- परीक्षा, चौकशी, इन्साफ, न्याय.
triangle ट्रायॅङ्गल् n.--- त्रिकोण, चिमटा, तिकटे.
tribal ट्राय्बल् a.--- ‘Tribe’ -विषयक, आदिवासीय, जनजातीय (हिंदी). n.--- विशिष्ट ‘Tribe’ मधील माणूस.
tribe ट्राइब् n.--- जात, धर्म, कूळ, वर्ण, जथा. वनप्रचुर वा डोंगराळ अशा मर्यादित क्षेत्रांत एका विशिष्ट प्राचीन पारंपरिक जीवनपद्धतीने एकनिष्ठेने राहणारा जनसमूह. आदिवासी-समुदाय. (हिंदी: जनजाति / आदिमाजाति).
tribulation ट्रिब्युलेशन् n.--- दुःख, यातना, विपत्ति, कष्ट.
tribunal ट्राय्ब्यूनल् n.--- न्यायासन, न्यायसभा, न्यायालय. एखाद्या विशिष्ट प्रकारच्या वादांच्या निर्णयार्थ नियुक्त (अनेक व्यक्तींचे) मंडळ / परिषद / समिति, न्यायमंडळ, न्यायाधिकरण. (कोणत्याही विशिष्ट कामासाठी नियुक्त) मंडळ / परिषद / समिति.
tributary ट्रिब्युटेरि a.--- खंडणी देणारे, ताबेदार, पोषक, सहाय्यक. n.--- खंडणी देणारा, मोठ्या नदीला मिळणारी लहान नदी. उपनदी.
tribute ट्रिब्यूट् n.--- खंडणी, वर्गणी, भर, वांटणी. आदरांजली, श्रद्धांजलि. खंडणी इ. भरण्याची / देण्याची जबाबदारी. ‘Under tribute’ --- अशा तऱ्हेने जबाबदार. ‘Pay tribute’ --- खंडणी इ. देणे / भरणे / अर्पिणे.
trice ट्राइस् n.--- पळ, क्षण.
trick ट्रिक् v.t.--- ठकवणे. n.--- कसब, व्यसन, खेळ, युक्ति, पेच, खोड, करामत, प्रयोग, पोरचाळे, चटक. कावा, लबाडी.
trickery ट्रिकरी n.--- कावेबाजी.
trickle ट्रिकल् v.i.--- पाझरणे, गाळाने, ठिबकणे.
trickster ट्रिक्स्ट(र्) n.--- लबाड, धूर्त, शठ.
tricky ट्रिकी a.--- पेचदार, गुंतागुंतीचा, बिकट, अवघड, चलाख, धूर्त, कावेबाज, लबाड.
trident ट्राय्डेन्ट् n.--- त्रिशूळ.
trifling ट्राय्फ्लिंग् n.--- हलका, क्षुल्लक.
trifle ट्राय्फल् v.i.--- खेळणे, गमणे. n.--- क्षुल्लक गोष्ट.
trigger ट्रिगर् n.--- बंदुकीचा घोडा / चाप. v.t.--- घोडा ओढून बंदूक चालविणे. कोणतीही प्रक्रिया चालू करणे / प्रारंभिणे. -ला चालना देणे.
trilateral ट्राय्-लॅटरल् a.--- तीन बाजूंचा. त्रिपक्षीय.
trilogy ट्रिलजी n.--- तीन परस्परांशी निगडित तीन (पुस्तक-) -रचना.
trim ट्रिम् n.--- पोशाख, वेष, व्यवस्था, तयारी. a.--- ठाकठीक, बरोबर, सुदृढ, मजबूत, खंबीर, सुबक, तयार. v.t.--- (काटछाट करून इ.) व्यवस्थित करणे, नटविणे, सुशोभित करणे.
trinity ट्रिनिटि n.--- तीन व्यक्ती मिळून एक देव.
trinket ट्रिंकेट् n.--- नग, दागिना, खेळणे, भिकार / स्वस्त / नकली वस्तु / दागिना.
trip ट्रिप् v.i.--- ठेच लागणे, अडखळणे, ठोकर मारणे, चुकणे. जलद, हलक्या पावलांनी चालणे, उड्या मारणे, नाचणे. प्रवासास जाणे. n.--- चूक, चक्कर, फेरी, टांग, चाट, प्रवास, यात्रा, सहल. v.t.--- ठेचकाळून पाडणे.
tripe ट्राईप् n.--- आतडी (खावयाची); घाण / निरर्थक भाषण / लिखाण.
triple ट्रिपल् a.--- तिहेरी, तिप्पट. v.t.--- तिप्पट करणे / होणे.
tripod ट्रिपॉड् n.--- तिवई, घोडा.
trite ट्राइट् a.--- उष्टा, शिळा, जुना, झिजवट, जीर्ण, कंटाळवाणा, गुळगुळीत, लुपतार्थ.
tritium ट्रिटिअम् / ट्रिशिअम् n.--- उज्ज (न) -वायू (Hydrogen) चे एक जुळे रूप (Isotope). संक्षिप्त संज्ञा ‘H3’ वा ‘T’.
triumph ट्रायम्फ् v.i.--- जयजय करणे, जय मिळविणे. n.--- जय, जयोत्साह.
triumphant ट्रायम्फन्ट् a.--- विजयी, जयवंत.
triumvirate ट्राय्अम्व्हिरेट् n.--- त्रिकूट, तिघांचा गट.
trivate ट्रिव्हेट् n.--- तिवई.
trivia ट्रिव्हिअ n.--- क्षुद्र / क्षुल्लक / हलक्या गोष्टी. (‘Trivium’ चे अनेकवचन)
trivial ट्रिव्हिअल् a.--- क्षुद्र, क्षुल्लक, सामान्य, भिकार.
trivialize ट्रिव्हियलाइज् v.t.--- क्षुल्लक म्हणून उपेक्षा करणे.
trivium ट्रिव्हिअम् n.--- भाषा, तर्कशास्त्र इ. चा प्राथमिक / कनिष्ठ अभ्यासक्रम.