Piv-Pla

pivot पिव्हट् n.--- कांटा. v.t.--- कांट्यावर ठेवणे.
pivotal पिव्हट्ल् a.--- मुख्य, महत्वाचा.
pizza पीत्स n.--- चीज, टोमॅटो इ. भाज्यांचे तुकडे कालवलेल्या पिठावर पसरून भाजलेला पाव. पावाच्या पिठाचे भाज्या घालून केलेले थालीपीठ.
placable प्लॅकेबल् a.--- शांतवन करण्यायोग्य.
placard प्लॅकार्ड् v.t.--- जाहिरात लावणे. n.--- जाहिरात, जाहिरातीचा फलक, सूचना-फलक.
placate प्ल(प्ले)केट् v.t.--- -चे मन वाळविणे, प्रसन्न करणे, -ची मनधरणी करणे, खुशामत करणे.
placation प्लकेशन् n.--- खुशामत, मनधरणी, अनुनय; आराधना.
placatory प्लॅ(प्ले)कटरी a.--- अनुनयात्मक, आराधनारूप.
place प्लेस् v.t.--- ठेवणे, स्थापणे, योजना करणे, नेमणे. ओळखणे. n.--- जागा, काम, स्थळ, देश, प्रदेश, गांव, प्रांत, ठाव, दर्जा, असामी, आधार, आश्रय.
placebo प्लसीबो n.--- रुग्णाच्या मानसिक समाधानापुरते दिलेले उपयोगशून्य औषध. a.--- अशा औषधासमान.
placenta प्लसेण्ट n.--- वार.
placid प्लॅसिड् a.--- शांत, सौम्य, संथ.
placidity प्लॅसिडिटि n.--- शांति, सौम्यता, संथपणा.
plagiarise प्लेजिअराइझ्
plagiarism प्लेजिअरिझम् n.--- ग्रंथचौर्य, उष्टी कविता. वाङ्मय-/कला-/कल्पना- / -चौर्य.
plagiarist प्लेजिअरिस्ट् n.--- ‘Plagiarism’ करणारा.
plagiaristic प्लेजिअरिस्टिक् a.--- ‘Plagiarism’ चा / च्या स्वरूपाचा.
plagiarise प्लेजिअराइझ् v.t. / v.i.--- = Plagiarize.
plagiarize प्लेजिअराइझ् v.t.--- (एखादे लिखाण, कलाकृति, शोध, कल्पना) स्वतःच्या नावावर खपवणे.
plagiary प्लेजिअरि n.--- शब्दचौर्य.
plague प्लेग् v.t.--- मारकी होणे. n.--- मारकी, अनर्थ, जाच. मोठ्या संख्यने बळी घेणारा रोग / रोगाची साथ, महामारी. महासंकट, अरिष्ट. विशिष्ट सूक्ष्मजंतू (bacteria) मुळे, प्रथम उंदरांत व तेथून मानवांत, पसरणारा एक अतिघातक साथीचा रोग.
plain प्लेन् a.--- सपाट, सरळ, साळसूद, उघड, साधा, बाळबोध, खणखणीत, धोपटमार्गी, मोकळा, साधारण रूपाचा, दहाजणांसारखा, उघडा, स्पष्ट, सुगम, बिन पेंचाचा. n.--- मैदान, सपाटी, पटांगण, सपाट / मैदानी प्रदेश. ad.--- स्पष्टपणे.
plainly प्लेन्लि ad.--- उघड, निष्कपटाने, साधेपणाने.
plaindealing प्लेनडिलींग् a.--- धोपटमार्गी, खरा.
plaint प्लेन्ट् n.--- फिर्याद, कागाळी, रद्द, कुरकूर.
plaintiff प्लेन्टिफ् n.--- वादी, फिर्यादी.
plaintive प्लेन्टिव्ह् a.--- बापडा, दीनवाणा, दुःखाचा.
plait प्लेट् v.t.--- चुणणे, निऱ्या करणे. (धागे / केस इ.) गुंफणे, -ची वेणी बांधणे / घालणे. वेणीप्रमाणे गुंफून तयार करणे. n.--- चुणी, वेणी.
plan प्लॅन् n.--- नमुना, बेत, तजवीज, उपाय, मसलत, नकाशा. v.t.--- कल्पना / बेत करणे, नकाशा काढणे.
planchette प्लांशेट् n.--- आडव्या पुष्टिपात्रावर बोट ठेवून भूत इत्यादि गूढ शक्तींना आवाहन करून त्यांचेद्वारा पुष्टिपात्रावर आपल्या प्रश्नांची उत्तरे लिहविण्याचा एक विधि / खेळ.
plane प्लेन् v.t.--- सपाट करणे, रंधणे. n.--- पातळी, रंधा.
planetarium प्लॅनिटेअरिअम् n.--- सूर्यमालेची लहान प्रतिकृति. खगोलांची प्रकाशचित्रांद्वारे ओळख करून देणारे चित्रक्षेपक यंत्र. अशा यंत्राने व अन्य साधनांनी सज्ज खगोलदर्शनशाला. (Planetaria).
plank down प्लँक्-डाउन् v.t.--- देणे असलेले पैसे फेकणे / टाकणे / (हातावर फळीवर इ.) टिकविणे / रोखीने लगेच चुकते करणे.
plant प्लँट् v.t.--- -ला एका जागी घट्टपणे / स्थिरपणे स्थापिणे / उभे करणे. n.--- स्थिर / घट्ट उभे होण्याची / राहण्याची स्थिति. स्थिर स्थानापन्नता.
plantar प्लॅण्टर् a.--- ‘प्लॅन्ट’-(तळपाय-) -संबंधीचा, तळपायांतील.
plaque प्लॅक् n.--- पटल, पट्ट, पाटी, फलक. दातावरील किटाणू.
plasma प्लॅझ्म n.--- रक्तांतील पेशीव्यतिरिक्त द्रवरूप भाग.
plastic प्लॅस्टिक् a.--- विविध आकारांत घडविला / ओतला जाऊ शकणारा. ‘Plastic’ चा बनलेला. n.--- पॉलिमर (Polymer) जातीचे विविध प्रकारे घडविले / ओतले / आकारले जाणारे द्रव्य.
plasticity प्लॅस्टिसिटि n.--- लवचिकता, विविध आकार घेण्याची क्षमता.
platitude प्लॅटिट्यूड् n.--- सर्वसामान्यता, सरळसोटपणा, अळीवपणा, अविशेषता, उठावदारपणाचा अभाव, नावीन्यहीनता. अळणी / कंटाळवाणे / नावीन्यहीन वचन, विद्वत्तेचा आव आणून केलेलं रटाळ विधान.
platitudinarian प्लॅटिट्यूडिनेरिअन् a.--- ‘Platitude’ च्या स्वरूपाचा. n.--- ‘Platitudes’ बोलण्याची सवय असलेला (माणूस).
platitudinarianism प्लॅटिट्यूडिनेरिअॅनिझम् n.--- ‘Platitudes’ झोकून देणारा पंथ / विचारसरणी.
platitudinous प्लॅटिट्यूडिनस् a.--- ‘Platitude’ च्या स्वरूपाचा, ‘Platitudes’ झोकून देणारा, ‘Platitudes’ नी लक्षणीय.
play प्ले v.t.--- (नाटक इ.) मध्ये) -ची भूमिका करणे. (उदा. पहा ‘Whiz’).
play - back प्लेबॅक् n.--- ध्वनि वा चित्र लेखबद्ध अवस्थेतून पुनः मूळ रूपांत (ध्वनि/चित्र) येण्याची / आणण्याची प्रक्रिया. (चित्राचे / ध्वनीचे) असे पुनरावर्तित रूप. चित्रपटांत पडद्यावर प्रत्यक्ष अभिनय करण्याचे शब्द वा गायन अन्य व्यक्तीच्या लेखबद्ध वाणीच्या पुनरावर्तित रूपांत प्रसारित करण्याची प्रक्रिया. अशा रीतीने प्रसारित वाणी. playback singing --- अशा रीतीने स्वतःची वाणी दुसऱ्यास (प्रत्यक्ष अभिनेत्यास) उधार / उसनी देण्याची प्रक्रिया. Playback singer --- अशा प्रकारे स्वतःची वाणी उधार / उसनी देणारा गायक, पार्श्वगायक.
playwright प्लेराइट् n.--- नाटकाचा लेखक, नाटककर्ता / प्रणेता, नाटककार.