Fiv-Fla

Five फाइव्ह् a.& n.--- पांच.
Fix फिक्स् v.t.--- घट्ट किंवा गच्च बसविणे, ठराव करणे, लावणे, स्थिर होणे, थांबविणे, बसवणे. n.--- अडचण, संकट, पेच.
Fi Fixed फिक्स्ड् a.--- गच्च बसवलेला, स्थिर.
Fixity फिक्सिटि n.--- स्थिरता, निश्चळपणा.
Fizzफिज् n.--- ‘फस्‘ ‘फिस्‘ / ‘फुस्‘ असा आवाज, फसफसणारे पेय. v.i.--- असा आवाज काढणे / करणे.
Fizzle फिझल् n. / v.i.--- ‘फस्‘ / ‘फिस्‘ / ‘फुस्‘ असा आवाज, क्षीण आवाज (काढणे) Fizzle out v.t.--- क्षीणपणें बंद होणे / संपणे / संपुष्टात येणे, लय पावणे, विलीन होणे, विरणे, (जोमाने चालत असता / सुरू होऊन) फसणे / ‘ओम् ‘ फस् होणे.
Fizzy फिझी a.--- फसफसणारा, बुडबुडे सोडणारा. [In US State schools fizzy drinks have now been banned.]
Fjord = Fiord
Flab फ्लॅब् n.--- फोपसेपणा, थलथलीतपणा.
Flabby फ्लॅबी a.--- लोंबणारा, लुळा, लिबलिबीत, भुसभुशीत, फोपसा, अशक्त, ढिला, अक्षम.
Flabbergast फ्लॅब(र्)गास्ट् v.i.--- आश्चर्याने / धक्क्याने थक्क करणे / बुचकळ्यांत टाकणें, स्तिमित / चकित.
Flaccid फ्लॅक्सिड् a.--- बिलबिलित, बिलबिला, शिथिल, लुळा
Flaccidity फ्लॅक्सिडिटि n.--- बिलबिलपणा, शिथिलता.
Flag फ्लॅग् n.--- निशाण, झेंडा v.i.---
Flagella फ्लॅजेला n.--- Flagellum चे अनेकवचन.
Flagellate फ्लॅजेलेट् v.t.--- चाबकाने मारणे.
flagellated फ्लॅजेलेटेड् a.--- ‘Flagellum’- धारी /- सदृश
Flagellum फ्लॅजेलम् n.--- चाबूक / शेंडीसारखी रचना.
Flageolet फ्लॅजिओलेट् n.--- अलगूज.
Flagitiousफ्लॅजिशस् a.--- अति दुष्ट, घोर, अति निन्द्य.
Flagon फ्लॅगन n.--- चंबू, सुरई, जांब.
Flagrant फ्लॅग्रन्ट a.--- उघड, धडधडीत, ठळक, चक्क, धादांत.
Flagship फ्लॅगशिप् n.--- सेनापति / त्याचा ध्वज धारण करणारी युद्धनौका; मुख्यांगभूत व्यक्ति / वस्तु; महत्वपूर्ण भाग असलेली गोष्ट (या अर्थी विशेषणासारखा वापर)0 [These are some of the Foundation’s of projects]
Flail फ्लेल् v.t.--- (धान्य मळण्याच्या बडवणीने इ.) झोडपणे, चोपणे, बदडून काढणे n.--- धान्य झोडपण्याचे यंत्र.
Flair फ्लेअर् n.--- (बौद्धिक) प्रेरणा / प्रतिभा / गति / उन्मेष / उर्मि, बुद्धिकौशल, (विशिष्ट विषयांतील) पारख
Flak फ्लॅक् n.--- विमानभेदी तोफमारा, हल्ला, जोरदार टीका.
Flake फ्लेक् n.--- थर, जमाव, विस्तवाचे किटण, काजळी, सोलून काढलेला थर / ढलप v.t.--- थर धरणे, तासणे, थराथरांनी फुटणे.
Flakey / Flaky फ्लेकी a.--- ‘Flake’ - युक्त/- चा, अस्थिर, अविश्वसनीय.
Flambeu फ्लॅम्बो n.--- दिवटी, कांकडा, टेंभा.
Flamboyance फ्लॅम्बॉयन्स् n.--- नखरा, दिखाऊपणा, दिमाख, अलंकारप्राचुर्य (विशे. शब्दांचे) भपका, (बाह्य) थाटमाट.
Flamboyant फ्लॅम्बाॅयंट् a.--- नखरेल, भपकेबाज, चमकदार, दिखाऊ, दिमाखदार, अलंकारप्रचुर.
Flame फ्लेम् v.i.--- जाळ होणे. n.--- जाळ, भडका,ज्योत, आवेश, संताप, अति प्रेम, प्राणसखा.
Flaming फ्लेमिंग् a.--- देदीप्यमान, आवेशी, तल्लख.
Flamingo फ्लमिंगो n.--- हंस-जातीचा एक पाणपक्षी.
Flank फ्लॅंक् n.--- कटि, बाजू, पार्श्वभाग, शरीराचा मांसल / मऊ भाग.
Flannel फ्लॅनेल् n.--- एक सैल विणीचे,लवदार / मऊ लोकरी कापड, फलाणी.
Flap फ्लॅप् n.--- झोल, फुगारा,घेर, झटका, विंझणा खळबळ, आरडाओरड v.t.--- झडपणे, फडफडवणे, टोमणा मारणे, गोंधळणे गडबडणे, बावचळणे.
Flare फ्लेअर् v.i.--- ढणाढण जळणे, रसरसणे, (ब०‘up’ सह) भडकणे, उसळणे, एकदम पेटणे, पसरणे. n.--- (आग, राग, इ. चा) भडका, स्फोट. प्रसर.
Flash फ्लॅश् v.t.--- एकदम पेट घेणे, एकदम चमकणे; चमकविणे, चकाकविणे; सहसा प्रकटणे; उफाळूण येणे v.i.--- लकलकणे, चमकणे n.--- चमक, चक्क.
Flashy फ्लॅशी a.--- दिखाऊ, लकलखीत, ढबदार,पोकळ, डौली.
Flask फ्लास्क् n.--- शिसी, कुपी, बाटली.
Flasket फ्लास्केट् n.--- अन्न वाढण्याचे पात्र, थाळी.
Flat फ्लॅट् a.--- सपाट, चपटा, मिळमिळीत, साफ, उघड, मंद. n.--- पटांगण, माळ, सदनिका.
Flatist फ्लॅटिस्ट्
Flatly फ्लॅट्लि ad.--- साफ, निक्षून.
Flatness फ्लॅट्नेस् n.--- सपाटी, चपटेपणा, सपटपणा.
Flatten फ्लॅटन् v.t.--- चपटा करणे, चापटणे.
Flatter फ्लॅटर् v.t.--- ०ची खुशामत करणे/मर्जी संपादणे, ०ला फूस लावणे, ( ०च्या मनात) (विशे. फसवणुकीसाठी खोटी) आशा निर्माण करणे. [ He explained to the crowd how the present laws only flatter to deceive and therefore ought to be replaced.]
Flatterer फ्लॅटरर् n.--- आर्जवी, खुशामती, हांजीहांजीखोर.
Flatulent फ्लॅट्यूलण्ट् a.--- वातूळ, वायुबद्ध, वाताप्लुत, वाताप्लावित, वाताध्मात, वातदोषप्रवण, वृथाभिमानी, दांभिक.
Flatulence फ्लॅट्यूलन्स n.--- शरीरातील अन्नमार्गांतील वातुळपणा, वाताध्मातता, पोकळ दंभ / गर्व, वृथाभिमान.
Flatulency फ्लॅटूलन्सि n.--- वातरोग, आमवात.
Flatwise फ्लॅट्वाईज् a.--- चपट्या बाजूचा.
Flaunt फ्लॉन्ट् v.t.--- छानछुकी -- दिमाख दाखविणे, ऐटीने डोलणे / झोके घेणे / हलणे, ०चा दिमाख दाखविणे, मिरविणे.
Flavour फ्लेव्हर् n.--- चव, रुचि, स्वाद, गंध, रस, सुवास, सुगंध.
Flavoured फ्लेव्हर्ड a.--- चवदार, मजेदार.
Flaw फ्लॉ n.--- फूट, तडा, दोरा, व्यंग, गोम, छिद्र.
Flawy फ्लॉई a.--- तडा गेलेला, फुटका.
Flax फ्लॅक्स् n.--- जवस, अळसी, आंबाडीचे तंतु.
Flay फ्ले v.t.--- कातडी - चामडी काढणे, सोलणे, ०वर जळजळीत टीका करणे, ०चे वाभाडे काढणे