Hovel हॉव्हेल् n.--- खोपटी, खोपट. v.t.--- आसरा देणे.
Hover हॉवर् v.i.--- घिरट्या घालणे, भोवणे, हवेत तरंगणे, घिरट्या घालणे, रेंगाळत राहणे; अनिश्चित / संदिग्ध / संशयग्रस्त / दोलायमान अवस्थेत राहणे.
Hovercraft हॉव(र्)क्राफ्ट् n.--- पोटाखाली वायूची कृत्रिम उशी बनवून तीवर उडत जाणारे एक प्रकारचे विमान.
How हाऊ ad.--- कसा.
However हॉउएव्हर् ad.--- कसाही / तथापि.
Howl हॉउल् v.t.--- हेल / गळा काढून रडणे, केंकाटणे, घोंघावणे.
Howler n.--- घोडचूक (विशे. विनोदी)
Hub हब् n.--- (चाकाचा अक्ष/कणा धारण करणारा) मध्यभाग. विशिष्ट कार्यप्रणालीतील / संघटनेतील केंद्रभूत / महत्वाचे (नियंत्रण-)स्थान.
Hubble, Edwin P. --- एका प्रसिद्ध यू.एस.ए. मधील खगोलशास्त्रज्ञाचे नाव.
Hubbub हबब् n.--- गलबला, गलगा, गलका, कालाकलाट, गोंगाट, गोंधळ, कल्लोळ.
Hubris ह्यूब्रिस् n.--- बेफाम औद्धत्य / उन्मत्तपणा.
Huddle हडल् n.--- घोळका, ढिगारा, घोळ, झुंबड, कल्लोळ, गर्दी, गोंधळघाई, घाईगर्दी. v.--- -चा ढिगारा / घोळका करून ठेवणे. (into)… मध्ये कोंबून ठेवणे. (out)... -मधून (घोळक्यातून) बाहेर काढणे, हाकलणे, हाकलीत / ढकलीत नेणे. (up)... घाईने / कसेबसे उभे करणे / सिद्ध करून घेणे. गर्दी करणे / करून राहणे, दाटी (वाटी) ने राहणे.
Hue ह्यू n.--- हाकाहाक, हाकाटी, रंग, वर्ण, ओरड.
Huff हफ् n.--- इतराजी, चिरड, तिरसटपणा.
Hug, Hugging हग्ग्, हग्गिंग् n.--- आलिंगन, मिठी.
Huge ह्यूज् a.--- अवजड, फार मोठा, अवाढव्य.
Hulk हल्क् n.--- जुन्या गलबताचा सांगाडा, लठ्ठ्या. v.i.--- मंदपणे (हालत डुलत) काम करणे.
Hull हल् n.--- टरफल, सालपट, सांगाडा.
Hullabaloo हलबलू n.--- गोंगाट, (आरडा-)ओरडा.
Hum हम् v.t. and v.i.--- गुंगणे, गुणगुणणे, गोंगावणे, गेंगणे, गुळमुळीत बोलणे. n.--- गुणगुण, गुंजारव. v.t.--- to hum and ha/haw कचरून वा कानकोंडे होऊन अं अं ….करीत गुळमुळीत बोलणे / गुळमुळीत भूमिका घेणे.
Human ह्यूमन् a.--- मनुष्याचा, मानवी, दया इ. मानवी सद्गुण/भावना यांनी युक्त / प्रेरित. n.--- मनुष्यप्राणी, माणूस. = Human being.
Human intelligence n.--- गुप्तहेर म्हणून काम करणार्या मानवी व्यक्तीने गोळा केलेली माहिती (संक्षिप्त रूप: humint) a.---
Humane ह्यूमेन् a.--- दयाळू, करुणावान.
Humanity ह्यूमॅनिटि n.--- भूतदया, मानवजाति.
Humble हम्बल् a.--- नम्र, गरीब, गर्वहीन, गरीबीचा, नीच, हलका. v.t.--- नमवणे, नम्र करणे, पाणउतारा करणे.
Humblebee हम्बल्बी n.---भुंगा, भ्रमर.
Humbling हम्बलिंग् n.--- मानखंडणा, मानभंग.
Humbly हम्बलि ad.--- गरीबीने, नम्रपणाने.
Humdrum हम्ड्रम् a.--- कांटाळवाणा, रटाळ, सर्वसाधारणपणा. v.i.--- रटाळपणे चालणे / काम करणे / चालविणे.
Humid ह्यूमिड् a.--- ओलसर, ओलकट, दमट, दमदार.
Humiliate ह्युमिलिएट् v.t.--- -ची अवहेलना / बेअब्रू / उपहास करणे, -ला कमीपणा आणणे.
Humiliation ह्युमिलिएशन् n.--- उपहास, अवहेलना, टिंगल, टर, फजिती.
Humility ह्यूमिलिटि n.--- लीनता, नम्रता, विनय, अमानित्व.
Humint ह्यूमिंट् n.--- = Human intelligence (पहा).
Humongous / Humungous ह्यूमंगस् a.--- प्रचंड, अवाढव्य.
Humor / Humour ह्यूम(र्) / यूम(र्) v.t.--- लाड पुरविणे. -ला खूष / प्रसन्न ठेवणे, -ची मर्जी सांभाळणे. n.--- मनोवृत्ति; लहर, थट्टेबाजी, हास्यरस, विनोद. शारीरिक धातुरस (कफ, पित्त, वति, रक्त).
Humorous ह्यूमरस् a.--- मजेचा, विनोदी, रसिक.
Hump हम्प् n.--- कुबड, पोंक, ओशिंड, वशिंड, उंचवटा, कोळे, मदार.
Humpback हम्प्बॅक् n.--- कुबड, पोंक.
Humpty-dumpty हम्प्टी-डम्प्टी n.--- बुटका व लठ्ठ.
Humus ह्यूमस् / यूमस् n.--- जीवजंतूंच्या विघटनापासून बनणारी माती.
Hunch हन्च् n.--- कुबड, पोंक, ठोकळा. अंदाज, अटकळ, आडाखा, संभाव्य, अनुमान. v.i.--- आखडणे, आखडून बसणे, कुबड काढून उकिडवे बसणे. v.t.--- दाबणे; वळविणे, वाकविणे, घुसविणे, दाबून बसविणे, ढकलणे.
Hundred हन्ड्रेड् a. & n.--- शंभर, शेकडा, शत.
Hunger हंगर् v.i.--- भूक लागणे. n.--- भूक, क्षुधा.
Hungry हंग्रि a.--- भुकेलेला, उपाशी, भुका, क्षुधित.
Hunk हंक् n.--- मोठा तुकडा, गोळा. जवान मर्द. = Hunky-dory / Hunky-dorum. a.--- सुरक्षित, क्षेम, ठीकठाक.
Hunt हन्ट् v.t.--- पारध करणे, हुडकणे, हाकलणे, पारधीस जाणे. n.--- पारध, शोध, शिकार, मृगया.
Huntsman हंटस्मन्, Hunter हंटर् n.--- पारधी, मृगयाकार, शिकार करणारा.
Hurdle हर्डल् n.--- ताटी. v.t.--- ताटी लावणे.
Hurdy gurdy हर्डी-गर्डी n.--- एक वाद्य.
Hurl हर्ल् v.t.--- जोराने फेकणे, झुगारणे, गुंगावणे.
Hurly-burly हर्ली-बर्ली n.--- गोंधळ, गजबजाट, गोंगाट, धामधूम, धांदल. धामधुमीचा, धान्दलीचा, गोंधळाचा.
Hurra हुर्रा n.--- जयजयकार, गजर. int.--- वाहवा.
Hurricane हरिकेन् n.--- वादळ, तुफान, चंडवात. ताशी ११४ कि.मी. पेक्षा अधिक वेगाचे cyclone.
Hurry हरि v.t.--- गडबडवणे, घाईने करणे. n.--- गडबड, लगबग, घाई,उतावळी, तांतड.
Hurt हर्ट् v.t.--- नुकसान / दुखापत करणे. n.--- दुखापत.
Husband हझ्बन्ड् v.t.--- बेताने खर्च करणे. n.--- नवरा, पति, भ्रतार.
Husbandman हझ्बन्ड्मन् n.--- शेतकरी, कृषिक.
Husbandry हझ्बन्ड्री n.--- कृषिकर्म, शेतकाम, (साधनसंपत्तीचे) व्यवस्थापन.
Hush हश् v.t.--- शांत करणे. -ला दाबून / दडपून टाकणे, -ला गप्प करणे. (विचार / भाव / प्रतिक्रिया इ.) -ला गिळणे / दाबणे / दडपणे. (In the interest of the game, the critics hushed reservations about the cricket-body’s some suspect procedures) n.--- शांतता / स्तब्धता (विशेषतः गोंगाटानंतरची). v.i.--- शांत होणे, दबणे, गप्प राहणे.
Husk हस्क् v.t.--- टरफल काढणे. n.--- टरफल.
Husky हस्की a.--- कोरडा, शुष्क; (आवाज) घोगरा.
Hustings हस्टिंग्ज् n.--- निवडणुकीच्या प्रचाराचा मंच / (व्यास-)पीठ / स्थान. निवडणुकीची प्रचार-मोहीम.
Hustle हसल् v.t.--- -ला धक्काबुक्की करणे, धिंगाणा घालणे; दंगामस्ती करणे, घाई-घाई करणे.
Hustler हस्लर् n.--- कांगावाखोर माणूस.
Hut हट् n.--- खोपट, झोपडी, पर्णकुटी, खोपटी.
Hutch हच् n.--- ठेवरेवीची पेटी.
Hyacinth हायसिंथ् n.--- जलाशयात वाढणारी, जलाचा पृष्ठभाग व्यापणारी एक विशिष्ट वनस्पति, जाल्कुम्भी, निळ्या नारिंगी, पांढऱ्या रंगाची फुले धारण करणारी एक वनस्पति.
Hybrid हायब्रिड् a.--- मिश्रजातीय, संकरजातीय.