Obvert आॅब्व्हर्ट् v.t.--- कडे वळवणे, फिरविणे.
Obviate आॅब्व्हिएट् v.t.--- निवारणे, टाळणे, चुकवणे.
Obvious आॅब्व्हिअस् a.--- उघड, स्पष्ट, व्यक्त.
Occasion आॅकेजन् n.--- समय, प्रसंग, प्रयोजन, घटना, गोष्ट, निमित्त. v.t.--- निमित्त / कारण होणे.
Occasional आॅकेजनल् a.--- प्रसंगाचा, कधींकधींचा.
Occident आॅक्सिडेंट् n.--- पश्चिम बाजू.
Occidental आॅक्सिडेंटल् a.--- पश्चिमेकडचा, पाश्चिमात्य, पाश्चात्य.
Occiput आॅक्सिपट् a.--- डोक्याचा पृष्ठभाग.
Occlude आॅक्लूड् v.t.--- रोखणे, थांबविणे, बंद करणे, अडविणे.
Occult आॅकल्ट् a.--- गूढ, गुप्त, अप्रसिद्ध, अद्भुत, अतीन्द्रिय.
Occupancy आॅक्युपन्सि n.--- वहिवाट, भोग, राबता, ताबा, आक्रमण, वापराने, वहिवाट्याची / भोगवट्याची मुदत / काल.
Occupant आॅक्युपन्ट् n.--- भोगणारा, वहिवाटणारा.
Occupation आॅक्युपेशन् n.--- धंदा, वयापारी, भोग, ताबा, व्यापृतता.
Occupy आॅक्युपाय् v.t.--- व्यापणे, वहिवाटणे, राबणे.
Occur आॅकर् v.i.--- आढळणे, घडणे, आठवणे. Occur to - -ला स्फुरणे.
Occurrence आॅकरन्स् n.--- स्मरण, स्फूर्ति, घडणे, स्फुरित, अस्तित्वातील घटना.
Ocean ओशन् n.--- महासागर, अब्धि.
Oceanography ओशनॉग्रफी n.--- समुद्रशास्त्र, सागरविज्ञान.
Ocher ओकर् n.--- काव, गेरू, पिवळी माती. असा (पिवळसर) रंग. = Ochre.
Octagon आॅक्टॅगॉन् n.--- अष्टकोनाकृति, अष्टकोन.
Octavo आॅक्टॅव्हो a.--- आठ पानांचा, अष्टपत्री.
October आॅक्टोबर् n.--- इंग्रजी वर्षाचा दहावा महिना.
Octogenarian आॅक्टोजिनेरियन् a./n.--- ऐंशी वर्षांचा माणूस / व्यक्ति.
Octopede आॅक्टोबर् n.--- आठ पायांचा प्राणी.
Ocular आॅक्युलर् a.--- डोळ्यांचा, दृष्टीचा, प्रत्यक्ष.
Oculist आॅक्युलिस्ट् n.--- डोळ्याचा वैद्य, नेत्रवैद्य.
Odd आॅड् a.--- विलग, विजोड, फुटकळ, तुटका, व्यंग, विषम, विलक्षण, तऱ्हेवाईक, अंदाजाबाहेर.
Oddness आॅड्नेस् n.--- विषमता, वैलक्षण्य.
Odds आॅड्स् n.--- सटरफटर, वर्चस्व, श्रेष्ठत्व. संभाव्यता, शक्यता.
Ode ओड् n.--- पद, गज्जल, कविता.
Odious ओडिअस् a.--- द्वेषकारक, नालस्तीकारक, द्वेष्य. द्वेषार्ह, तिरस्करणीय, घृणास्पद (पहा: संस्कृत: ‘अवद्य’).
Odium ओडिअम् n.--- द्वेष, ठपका, तिटकारा, अपवाद, दुष्कीर्ति, दोष.
Odontology ओडॉन्टालजि n.--- दंतव्यथा, पीडा.
Odour ओडर् n.--- सुवास, सुगंध, वास, गंध. = Odor
Odoriferous ओडोरिफेरस् = Odorous
Odorous ओडरस् a.--- वासित, गंधित, गंधयुक्त, सुगंधित.
Odyssey आॅडिसी n.--- ‘Homer’ या कवीचे भटकंतीविषयक काव्य. भ्रमणगाथा, भ्रमंती, भटकंती, महायात्रा.
Oecumenical ईक्युमेनिकल् a.--- जागतिक, सर्वव्यापी, सर्वंकष, सर्व ख्रिस्ती पंथोपपंथांसंबंधी.
Oedema इडीमा n.--- पेशींमधल्या पोकळीत द्रव शिरून(अवयवाच्या) फुगण्याची प्रक्रिया.
Oedipal ईडिपल् / एडिपल् a.--- ‘Oedipal complex’ -चा /-विषयक/ -पासून उत्पन्न.
Oedipus complex ईडिपल् / एडिपल् कॉम्प्लेक्स् (Freud इ. मानसशास्त्रज्ञांच्या अवलोकनानुसार) पुरुष-बालकास आपल्या आईबद्दल वाटणारे आकर्षण (व तदुद्भूत बापाबद्दल मत्सर (द्वेष). Electra complex --- स्त्रीअपत्यातील पित्यामाताविषयक असेच अनुक्रमे आकर्षणद्वेषाचे भाव.
Oesophageal ईसोफॅजियल् a.--- ‘Oesophagus’ विषयक.
Oesophago --- ‘Oesophagus’ चे सामासिक रूप.
Oesophagus ईसोफगस् n.--- घशापासून पोटापर्यंतचा अन्ननलिकेचा भाग. = Esophagus.