Or आॅर् conj.--- अथवा, किंवा, नाहीतर, कां, कीं.
Oracle आॅरकल् n.--- शकुन, प्रसाद, दृष्टांत. दैवी शक्ति धारण करणारी व्यक्ति, सिद्धपुरुष. दैवी वाणी / आदेश / कौल देणारे व्यक्ति-/वस्तु- स्थान-/रूप माध्यम. अशा माध्यमाची (गूढ) वाणी इ., एकप्रकारची आकाशवाणी. भविष्यवाणी. प्रमाणभूत वचन. v.t. / v.i.--- ‘Oracle’ उच्चारणे. ‘Oracle’ म्हणून / सारखे बोलणे.
Oracular ओरॅक्युलर् a.--- ‘Oracle’ -युक्त / -चे / -विषयक.
Oral ओरल् a.--- तोंडचा, तोंडी.
Orange आॅरेन्ज् n.--- नारिंग, नारिंगाचे झाड. a.--- नारिंगी.
Orangery आॅरेन्जरि n.--- नारिंगाची बाग.
Orangutang / Orangutan ओरॅङुटॅङ् / ओअरङूटन् n.--- सुमात्रादि बेटांतील एक मानवसदृश माकड/वानर. (हिंदी : ‘वनमानुष’).
Oration ओरेशन् n.--- वक्तृत्व, पांडित्य, भाषण.
Orator ओरेटर् n.--- वाक्पंडित, वक्ता, बोलणारा.
Oratory ओरेटरि n.--- शब्दपांडित्य, वाक्चातुर्य. प्रार्थनेची जागा / खोली.
Orb आॅर्ब् n.--- गोल, मंडल, ग्रहांची कक्षा/फेरी. a.--- वाटोळा, गोलाकार.
Orbit आॅर्बिट् v.t.--- -भोवती फिरणे, (असा-/केंद्रा-_-भोवती चकरा मारीत राहणे. अशा तऱ्हेने फिरविणे. n.--- ग्रहांचा फिरण्याचा मार्ग, कक्षा, डोळ्याची खाच / खोबण.
Orbital आॅर्बिटल् a.--- ‘Orbit’ स्वरूपाचा / -संबंधीचा.
Orchard आॅर्चर्ड् n.--- फळांची बाग, उपवन.
Orchestra ऑर्केस्ट्रा n.--- नाट्यगृहातील साथीदारांना (वादक, नर्तक इ.) बसण्याची (रंगभूमीसमोरील) जागा; वादकांचा संघ, वाद्यवृन्द.
Orchestrate ऑर्केस्ट्रेट् v.i. / v.t.--- वाद्यवृन्दासाठी (संगीतकृति) रचणे; वाद्यवृन्दात वादन करणे, सुरांत सूर मिसळणे, री-ओढून साथ देणे / सहमत होणे.
Orchid आॅर्किड् n.--- फुलपाखरे इ. कीटक व अन्य जीव यांच्या शरीरांसारखे व अवयवांसारखे चित्रविचित्र रंगीत आकार व झगझगीत रंग असलेली फुले धारण करणारी अनेक जातींची एक वनस्पति. -अशा वनस्पतीचे एक फूल. चित्रपुष्प.
Ordain आॅर्डेन् v.i.--- एखादी व्यवस्था, घटना, नेमणूक इ. निर्धारित करणे, ठरविणे, आदेशिणे. v.t.--- नेमणूक करणे, व्यवस्था लावणे.
Ordeal आॅर्डिअल् / आॅर्डील् / आॅर्डील् n.--- दिव्य, कसोटी, सत्वपरीक्षा.
Order आॅर्डर् n.--- व्यवस्था, बंदोबस्त, रीत, हुकूम, आज्ञा, कायदा, वरात, रोखा, परवानगी, वर्ग, पंथ. Order for --- व्यवस्था करणे. v.t.--- हुकूम करणे, रचणे, चालवणे.
Orderless आॅर्डर्लेस् a.--- क्रमशून्य, क्रमराहित, अव्यवस्थित.
Ordinal आॅ(र्)डिनल् / आॅ(र्)डनल् a./ n.--- विशिष्ट क्रमांतील / मालिकेतील विशिष्ट संख्यात्मक-स्थिति-दर्शक (शब्द), क्रमांक-वाचक (शब्द). (उदा. : पहिला / प्रथम, सोळावा (षोडश)). a.--- क्रमसूचक. n.--- पद्धति. Ordinal number = Ordinal (n.). a.--- n.---
Ordinance आॅर्डिनन्स् n.--- कायदा, कानू, शासन, विधि, संस्कार.
Ordinary आॅर्डिनरी a.--- साधारण, मध्यम, नित्याचा.
Ordination आॅर्डिनेशन् n.--- स्थापना, योजना.
Ordinance आॅर्डनन्स् n.--- तोफखाना, तोफा, युद्धसाहित्य, युद्धसामग्री. यांच्या पुरवठ्यासंबंधीचे सरकारी खाते.
Ordure आॅर्ड्यूर् / आॅर्जर् n.--- विष्ठा, मळ, गू.
Ore ओअर् n.--- अशोधीत धातु, धातु, अशुद्ध खनिज.
Oregano आॅरिगानो / अरेगनो n.--- ‘पुदिना’ जातीची एक वनस्पति.
Organ आॅर्गन् n.--- इंद्रिय, साधन, कर्मसाधन, शरीरधारणप्रक्रियेतील एक विशिष्ट कार्य करणारा विशिष्टरचनायुक्त भाग. Organ of action --- कर्मेंद्रिय. Organ of sense --- ज्ञानेंद्रिय.
Organelle आॅर्गनेल् / आॅर्गनेल् n.--- पेशीमधील (एकपेशीय प्राण्यांतील) एखादा विशिष्ट भाग / अवयव.
Organic आॅर्गॅनिक् a.--- इंद्रियाचा, इंद्रियविशिष्ट. केवळ जीवसृष्टिजन्य स्वताने परिपुष्ट (अन्न). अंगभूत, स्वाभाविक भाग / हिस्सा / अवयव असलेला. कर्ब(carbon)युक्त संयुगांनी बनलेला कर्बसंयुगविषयक (रसायनशास्त्रशाखा).
Organism आॅर्गनिझम् n.--- (विशिष्ट प्राण-/जीव-/-धारणार्थ बनलेला) शरीर, देह; शरीररचना, रचित शरीर.
Organize आॅर्गनाइझ् v.t.--- इंद्रियसंपन्न करणे, व्यवस्थित मांडणी करणे.
Organization आॅर्गनाइझेशन् n.--- जुळणी, रचना, घटना, बांधणी, संस्था.
Orgasm आॅर्गॅझम् n.--- अनावर चेतना, उकळी, परमोल्लास.