Tusk टस्क् n.--- सुळा, सुळका. (हत्ती, अस्वल, वॉलरस इ. प्राण्यांच्या दातांचा) सुळा.
Tusked टस्केड् a.--- सुळ्याचा.
Tusker टस्कर् n.--- सुळे विकसित झालेला हत्ती.
Tusser टसर् n.--- रेशमाचा धागा प्रसविणारा. ओक-वृक्षाची पाने खाववून पोसलेला किडा. अशा किड्यांनी प्रसविलेली रेशमाची एक जात. तागाचे कडक, जाड रेशीम / रेशमी वस्त्र. (spelled also as Tussore / Tussur) (हिंदीत ‘तासर, संस्कृतांत ‘तसर’).
Tussle टसल् n.--- लढा, संघर्ष, स्पर्धा, झोंबाझोंबी, धक्काबुक्की.
Tussore = Tusser = Tussur =Tusser.
Tutelage ट्यूटिलेज् n.--- मार्गदर्शकत्व, देखरेख, देखभाल, नेतृत्व.
Tutelar ट्यूटिलर् = Tutelary; रक्षक देवता / सिद्धपुरुष.
Tutelary ट्यूटिलरी a.--- रक्षक शक्तीच्या स्वरूपाचा.
Tutenag ट्युटिनॅग् n.--- जस्त.
Tutor ट्यूटर् n.--- शिक्षक, अध्यापक. v.t.--- शिकवणे.
Tutorial ट्यूटॉरियल् a.--- ‘Tutor’ / त्याची शिकवणी या संबंधीचा. n.--- ‘Tutor’ ची शिकवणी. विशिष्ट विषयाच्या विशिष्ट अभ्यासक्रमाचे.
Twaddle ट्वाड्ल n.--- वेशभूषा उपस्थिति (सभा, संमेलन इ. तील) (उपस्थितांची संख्या).
Twain, Mark --- (११-११-१८३५ ते २१-४-१९१०): सॅम्युएल लॅघॉर्न् क्लेमेन्स् या विनोदी अमेरिकन लेखकाचे (लेखक म्हणून) टोपणनाव. याची गाजलेली पुस्तके: ‘Innocents Abroad’, ‘Roughing It’, ‘The gilded age’, ‘Tom Sawyer’, ‘Huckleberry Finn’.
Twang ट्वॅङ्ग् v.t.--- झणझणवणे, टणत्कार करणे. n.--- टणत्कार टंकार, सणसणात.
Tweak ट्वीक् v.t.--- चिमटीने उपटणे / उखडणे / ओढणे / पिळणे. -मध्ये अशा क्रियेने बदल करणे. -मध्ये फेरबदल करणे. (eg.: Finance Minister has taken measures to tweak the tax-structure to offer a higher take-home to salaried individuals.) n.--- अशी प्रक्रिया.
Tweedledum and Tweedle-dee --- परस्पराहून नाममात्र भिन्न असलेल्या दोन गोष्टी / वस्तु / कल्पना. एकाच माळेचे मणि.
Tweezer / Tweezers ट्वीझर् / ट्वीझर्स् n.--- (छोटा) चिमटा, चिमट्यासारखा.
Twelve ट्वेल्व्ह् a. & n.--- बारा.
Twelth ट्वेल्थ a.--- बारावा.
Twenty ट्वेन्टि a. & n.--- वीस.
Twice ट्वाइस् ad.--- दोनदा, दुप्पट, दुबार.
Twiddle ट्विड्ल् v.t.--- (बोटांनी) वळणे / पिळणे; -शी चाळा करणे. ‘To twiddle one’s thumbs / fingers : निरुद्योगी बसणे.
Twig ट्विग् n.--- डहाळी (विषे. पर्णहीन). v.t.--- अर्थ समजणे, -ला समजणे.
Twilight ट्वाइलाइट् n.--- संधिप्रकाश. गोरज. संध्यासमय संधिकाल.
Twin ट्विन् n.--- जुळे, जावळा. The twins --- मिथुनरास.
Twine ट्वाइन् v.t.--- पिळणे, वेष्टणे. n.--- वेष्टन, सुतळी, जाड दोरा. अनेक धाग्यांनी गुंफलेला जाडसर दोरा, सुतळी, गुंफण. गुंफण करीत जाणारा झाडाचा / वेळाचा दांडा.
Twinge ट्विन्ज् n.--- चिमटा, बोच. (मानसिक) यातना; (अपराधाची) टोचणी.
Twinkle ट्विंकल् v.i.--- डोळा उघडणे, उघडझाप करणे, लकलकणे. (डोळे) मिचकावणे. n.--- चमक, लुकलुक, निमीष. (डोळ्यांची) उघडझाप.
Twirl ट्वर्ल् v.i.--- गरगर फिरवणे. n.--- गिरकांडी.
Twist ट्विस्ट् v.t.--- पिळणे, मुरगळणे, वळवणे, बनवणे, तयार करणे, उलटे करणे, विणणे, सूट काढणे, गुंडाळणे, वळणे, वेष्टणे. n.--- पीळ, मुराद, सडा, पदर, पेंच.
Twit ट्विट् v.t.--- टोमणा मारणे, नाकात नाड्या घालणे, त्रास(वि)णे, सतावणे. n.--- मूर्ख.
Twitch ट्विच् v.t.--- हिसकणे. n.--- हिसका, हिसडा.
Two टू a.--- दोन, दोहोंचा आंकडा.
Twofold टूफोल्ड् a.--- दुप्पट.