Zec-Zil

Zechin झेकन् n.--- (विशेषतः बायकांच्या कपड्यांना व दागिन्यांना अलंकृत / सुशोभित करण्यासाठी वापरली जाणारी) छोटी चमकणारी टिकली / चमकी / तबकडी. = Sequin.
Zed झेड् n.--- इंग्रजी भाषेतील शेवटचे अक्षर, मोठ्या लिपीत ‘Z’ व लहान लिपीत ‘z’ असे लिहिले जाणारे. Also see ‘Zee’.
Zee झी n.--- इंग्रजी भाषेतील शेवटचे अक्षर, मोठ्या लिपीत ‘Z’ व लहान लिपीत ‘z’ असे लिहिले जाणारे. Also see ‘Zed’.
Zemindar = Zamindar
Zemindary = Zamindary
Zenana झनाना n.--- जनानखाना, माहिलाकक्ष, घरातील महिलांसाठी राखलेली जागा. जनानखान्यातील महिलावर्ग.
Zenith झेनिथ् / झीनिथ् n.--- आकाशातील (बघणाऱ्याच्या) बरोब्बर डोक्यावरचा बिंदू. कळस, पराकाष्ठा, बहर.
Zenithal झेनथल् / झीनथल् a.--- ‘Zenith’ शी संबंधित, ‘Zenith’ वर स्थित.
Zephyr झेफर् n.--- मऊ हलकी लोकर, मऊ लोकरीचे कापड किंवा कपडा. पश्चिमेकडील वारा, वाऱ्याची मंद झुळूक.
Zeppelin झेपलिन् n.--- कणखर लढाऊ विमान. जर्मन लढाऊ विमान.
Zero झीरो n.--- शून्य, अरेबिक नोटेशन मधे ‘0’ ने दर्शविली जाणारी संख्या, अभाव दाखविणारी संख्या. कोणत्याही मोजमापाची सुरवात / मूळ. धन संख्या (positive number) व ऋण संख्या (negative number) ह्यांच्या दरम्यानची संख्या.
Zero day झीरो डे n.--- कोणत्याही संगीताच्या / व्हिडिओच्या / सॉफ्टवेअरच्या प्रकाशनाच्या आधीचा दिवस.
Zero hour झीरो आवर् n.--- लष्करी हल्ल्याला / कामगिरीला प्रारंभ करायची वेळ, कोणत्याही कामाला / कार्यक्रमाला सुरवात करण्याची वेळ. एखादी महत्वाची घटना घडण्याची वेळ. निर्णायक वेळ.
Zest झेस्ट् n.--- कळकळ, असोशी, उत्साह, तीव्र आवड, अतिशय आवड, लज्जत, गोडी. लिंबूवर्गीय फळांच्या सालीचा बाहेरचा पातळ थर (जो खाद्यपदार्थांमध्ये चवीसाठी किंवा सुगंधासाठी वापरता येतो.) v.t.--- -ला चव /लज्जत / खमंगपणा आणणे. -मधे उत्साह भरणे. जोश आणणे.
Zester झेस्टर् n.--- संत्रे, लिंबू, मोसंबी इत्यादि समान फळांच्या सालीचा बाहेरचा पातळ थर काढण्याचे स्वयंपाकघरातील एक हत्यार.
Zestful झेस्टफुल् a.--- चमचमीत, चटपटीत, लज्जतदार, उत्साहवर्धक, उत्तेजक.
Zesty झेस्टी a.--- = Zestful
Zigzag झिगझॅग् n.--- नागमोडी रस्ता / रेघ / मार्ग. वळणदार रस्ता. नागमोडी चाल. a.--- वळणदार, नागमोडी, वाकडातिकडा. v.i.--- वेडेवाकडे वळणं घेत चालणे.
Zila झिला n.--- जिल्हा, प्रदेश, मुलूख, राज्य, प्रांत. = Zillah
Zillah =Zila
Zillion झिलियन् n.--- एक अतिशय मोठी संख्या / ढीग.
Zillionaire झिलियनेअर् n.--- अब्जाधीश. अतिशय श्रीमंत माणूस.