Experienced एक्स्पीरिअन्स्ड् p.p.a.--- व्यवहारज्ञ, अनुभवी.
Experiential एक्स्पीरिएन्शल् a.--- अनुभूतीचा, अनुभवसंबंधीचा, प्रतीतिजन्य.
Experientially एक्स्पीरिएन्शिअलि ad.--- अनुभवाधारे.
Experiment एक्स्पेरिमेन्ट् n.--- प्रयोग, परीक्षा.
Expert एक्स्पर्ट् a. and n.--- कुशल, कसबी, दर्दी, वस्ताद, विशेषज्ञ.
Expertness एक्स्पर्टनेस् n.--- हातोटी, कसब.
Expiate एक्स्पीएट् v.t.--- प्रायश्चित्ताने पाप घालविणे, पापाचे परिमार्जन करणे.
Expiation एक्स्पीएशन् n.--- प्रायश्चित्त, प्रायश्चित्ताने निरसन, परिमार्जन.
Expirant एक्स्पायरन्ट् n.--- मरणारा.
Expiration एक्स्पायरेशन् n.--- प्राणांत, मृत्यु.
Expire एक्स्पायर् v.t.--- श्वास / हवा इ. (फुप्फुसा-) बाहेर सोडणे, प्राण सोडणे, श्वास टाकणे. (पहा: “Inspire’) v.i.--- मरणे, मरण पावणे.
Explain एक्स्प्लेन् v.t.--- समजावून देणे, फोड करून सांगणे, अर्थ करणे, टीका करणे.
Explanation एक्स्प्लनेशन् n.--- (सकृदर्शनी दिसणारी चूक / अपराध इ. चे) स्पष्टीकरण / खुलासा / सफाई.
Explanatory एक्स्प्लनेटरि a.--- उलगड्याचा, टीकारूप, उलगडा करणारा, समजून देणारा.
Expletive इक्स्प्लीटिव्ह् n.--- वाक्यालंकार, मात्रापूर्ति, वाक्यपुर्ति, उणीव भरून काढण्यासाठी योजलेला शब्द; असभ्य शब्द/भाषा, असे अभद्र / अश्लील वचन. उदा: ‘च्यायला’, ‘bloody’, ‘साला’.
Explicable एक्स्प्लिकेबल् a.--- स्पष्ट व्यक्त करण्यासारखा.
Explication एक्स्प्लिकेशन् n.--- उलगडा, विवरण.
Explicit एक्स्प्लििसिट् a.--- निवळ, साफ, स्पष्ट.
Explode एक्स्प्लोड् v.t.--- and v.i.--- बार उडविणे, हुर्यो हुर्यो करणे, बार उडणे, आवाज होणे.
Exploit एक्स्प्लॉइट् n.--- महत्कृत्य, शतक्रुत्य, पराक्रम. v.t.--- -चा आर्थिक लाभ घेणे. -चा उपयोग करून घेणे. -ला पिळून काढणे, ची पिळवणूक करणे, -पासून लबाडीने/अन्यायाने फायदा उकळणे.
Exploitation एक्स्प्लॉइटेशन् n.--- लाभार्थ केलेला उपयोग / वापर.
Exploration एक्स्प्लोरेशन् n.--- शोध, शोधन.
Explore एक्स्प्लोअर् v.t.--- शोध/तपास करणे.
Explosion एक्स्प्लोझन् n.--- उडणे, आवाज होऊन फुटणे, बार, स्फोट.
Explosive एक्स्प्लोझिव्ह् n.--- पेट घेऊन उडणारा पदार्थ. a.--- बार होऊन उडणारा.
Exponent एक्स्पोनेंट् a.--- प्रतिपादक, प्रतिपादन करणारा, घात-प्रकाशक (गणितांत). घातचिन्ह, घातक. विशिष्ट विद्या-/कला-शाखेचा प्रवक्ता/व्याख्याता/भाष्यकार/प्रयोक्ता (म्हणजे आविष्कर्ता).
Exponential एक्स्पोनेन्शल् a.--- घातचिन्हयुक्त, घातांकलक्षित (वाढ/घट), प्रचंड प्रमाणाचा, अवाढव्य, अफाट. n.--- घातचिन्हांकित संख्या.
Exponentially एक्स्पोनेन्शिअलि ad.---
Export एक्स्पोर्ट् a.--- परदेशास माल पाठवणे.
Exporter एक्स्पोर्टर् n.--- बाहेरगावी माल पाठविणारा.
Expose एक्स्पोझ् v.t.--- उघडा टाकणे, उघडकीस आणणे, फजिती करणे. n.--- वस्तुस्थितीचे वर्णन/निवेदन. (दुर्व्यवहार इ.) उघडकीस आणण्याची (फोडण्याची) प्रक्रिया, परिस्फोट, फोड.
Exposition एक्स्पोझिशन् n.--- व्याख्या, फोड, विश्लेषण, स्पष्टीकरण.
Expositor एक्स्पॉझिटर् n.--- व्याख्या करणारा.
Expostulate एक्स्पॉस्चुलेट् v.t.--- उपदेश करणे, कान उघाडणी करणे, चार गोष्टी सांगणे, विनवणीपूर्वक सांगणे/समजावणे.
Exposure एक्स्पोझर् n.--- उघड्यात टाकणे, उघडी जागा/दिशा, फजिती, टेर.
Expound एक्स्पाउन्ड् v.t.--- अर्थफोड, व्याख्या, विवेचन करणे.