retail रिटेल् v.t.--- फुटकळीने विकणे. a.--- किरकोळ / फुटकळ. n.--- किरकोळ / फुटकळ विक्री.
retailer रिटेलर् n.--- फुटकळ विकणारा, वाणी.
retain रिटेन् v.t.--- राखणे, पदरी ठेवणे.
retainer रिटेनर् n.--- राखणारा, आश्रित. विश्वासांतील मोबदला, फी, शुल्क.
retaliate रिटॅलिएट् v.t.--- परत करणे, उसने फेडणे.
retaliation रिटॅलिएशन् n.--- उसने फेडणे, फेड, सूट.
retard रिटार्ड् v.t.--- कमी करणे, लांबणीवर टाकणे, मागे अडवून ठेवणे, विलंबित करणे, -ची नैसर्गिक / योग्य प्रगति रोखून धरणे, -च्या प्रगतीत अडथळा आणणे, -चा नैसर्गिक विकास खुंटविणे. v.i.--- मागे पडणे, अप्रगत राहणे, वाढ खुंटलेल्या अवस्थेत राहणे. n.--- अडथळा, खोळंबा, अवरुद्धगति. मंदमति, अल्पबुद्धि, मंदात्मा.
retch रेच् v.i.--- ओकारी करवणे, वांतीचे औषध देणे, ओकणे, ओकारी काढणे, ओकारीचा आवाज काढणे, कोरड्या उलट्या करणे. n.--- ओकारीचा आवाज, कोरड्या उलट्या.
retention रिटेन्शन् n.--- धारणाशक्ति, स्मरणशक्ति.
retentive रिटेन्टिव्ह् a.--- आठवणीचा धड / दृढ.
reticence रेटिसन्स् n.--- अबोला, मौन, मुकेपणा.
reticent रेटिसण्ट् a.--- मनातले बोलून न दाखविणारा, मितभाषी, घुमा.
reticulate रेटिक्युलेट् a.--- जाळीदार, जाळीचा.
reticulation रेटिक्युलेशन् n.--- जाळीचे काम, जाळी.
retina रेटिना n.--- डोळ्याच्या भिंगातून येणाऱ्या प्रकाशकिरणांनी आणलेली दृष्ट पदार्थाची प्रतिमा उमटविणारा डोळ्याच्या मागील भागांतील संवेदनशील पातळ (पापुद्र्यासारखा) पडदा. नेत्रपटल, दृष्टिपटल (हिंदी).
retinue रेटिन्यू n.--- इतमाम, खटले, ताफा, नोकरचाकर व इतर लवाजमा.
retire रिटायर् v.t.--- मागे जाणे, निघून जाणे, चाकरी सोडायला लावणे, रोजगार सोडणे. (कर्ज) फेडणे.
retirement रिटायर्मेन्ट् n.--- एकांत स्थल, एकांतवास.
retort रिटॉर्ट् v.t.--- परत करणे, उलट उत्तर देणे. v.i.--- उलटून प्रत्यत्तर देणे. n.--- उलट जबाब, सणसणीत जबाब, टोला.
retress रिट्रेस् v.t.--- मागे शोधीत जाणे, उलट फिरविणे.
retract रिट्रॅक्ट् v.t.--- फिरविणे, परत / माघार घेणे. आंत ओढून घेणे.
retractile रिट्रॅक्टिल् a.--- मागे अथवा आंत ओढून घेण्याजोगा.
retraction रिट्रॅक्शन् n.--- आंत / मागे ओढून घेण्याची प्रक्रिया.
retreat रिट्रीट् v.i.--- मागे जाणे, आश्रय धरणे.
retrench रिट्रेन्च् v.t.--- कांपणे, छाटणे, कमी करणे. v.i.--- काटकसर करणे.
retrenchment रिट्रेन्च्मेंट् n.--- छाटाछाट, काटकसर.
retribution रिट्रिब्यूशन् n.--- प्रतिफळ, प्रायश्चित्त, मोबदला, फेड.
retributive / Retributory रेट्रिब्यटिव्ह् / रेट्रिब्यटॉरी a.--- ‘Retribution’ -चा / -विषयक / -स्वरूपाचा. परतफेडीच्या स्वरूपाचा (विशेषतः अपराधाच्या).
retrieval रिट्रायव्हल् n.--- भरपाई, ठाकठिकी. पुनरावर्तन. आधीच्या / मूळच्या स्थानी / स्थितीत परतण्याची प्रक्रिया.
retrieve रिट्राइव्ह v.t.--- परत मिळविणे, सावरणे, ठाकठीक करणे.
retroactive रेट्रोअॅक्टिव्ह् a.--- गतगोष्टींनां लागू होणारा.
retrograde रेट्रग्रेड् v.i.--- परत जाणे, वक्र असणे. a.--- उतरत्या पायाचा, वक्रगामी, उलट्या दिशेने जाणारा, माघार घेणारा.
retrogress रेट्रग्रेस् / रेट्रग्रेस् v.i.--- मागे हटणे, मागासणे, परागति करणे.
retrogression रेट्रग्रेशन् n.--- परागति.
retrogressive रेट्रग्रेसिव्ह् a.--- परागतीचा, प्रगतिविरोधी, सुधारणाविरोधी.
retrospect रेट्रस्पेक्ट् v.t.--- मागचे पाहणे, मागचा विचार करणे.
retrospective रेट्रस्पेक्टिव्ह् a.--- अतीतलक्षी / पूर्वलक्षी, गतगोष्टींनां लागू, मागास(लेला).
return रिटर्न् v.t.--- माघारा जाणे, प्रत येणे, उलट खाणे, परत देणे, खबर देणे. n.--- माघार, पुनरागमन, परतफेड, हकीकतनामा, मोबदला, प्राप्ति, परतावा.
reunion रियूनियन् n.--- पुनर्योग, पुनर्मीलन.
rev रेव्ह् n.--- चालकयंत्रा (motor) चा फेरा. (Rev up) --- यंत्र इ. च्या प्रतिमिनिट फेऱ्यांत वाढ करणे. v.i.--- वेग घेणे / देणे, गति घेणे / देणे.
revamp रिव्हॅम्प् v.t.--- पुनः बनविणे. -चा जीर्णोद्धार करणे. -ची पुनर्रचना करणे. -मध्ये बदल / दुरुस्त्या / सुधारणा करणे.
reveal रिव्हील् v.t.--- उघड / जाहीर करणे / कळविणे.
revel रेव्हल् v.i.--- मौज मारणे, दिवाळी करणे. आनंदोत्सव / जल्लोष करणे, रामाने, रममाण होणे. n.--- आनंदोत्सव, जल्लोष.
revelation रेव्हलेशन् n.--- साक्षात्कार, प्रकटीकरण, स्फोट.
revelatory रेवेलटोरी / रेवेलटॉरी a.--- उघड करणारा, प्रकट करणारा, निदर्शक. उद्बोधक.
reveler रेव्हेलर् n.--- दिवाळी करणारा, बहार मारणारा.
revelry रेव्हल्री n.--- =Revel (n.)
revenge रिव्हेन्ज् v.t.--- सूड घेणे, उट्टे काढणे. n.--- सूड.
revengeful रिव्हेन्ज्फुल् a.--- खुनशी, आकशी.
revenue रेव्हिन्यू n.--- जमाबंदी, वसूल, उत्पन्न.
reverberate रिव्हर्बरेट् v.t./ v.i.--- प्रतिशब्द करणे, परावर्तन करणे. परावर्तित होणे, (आवाज इ.) परावर्तित होऊन प्रतिध्वनि काढणे / काढत राहणे. गाजणे. दुमदुमणे.
revere रिव्हीअर् v.t.--- -बद्दल पूज्यबुद्धि धरणे, -चा मान राखणे, -चा अत्यादर करणे.
reverence रेव्हरन्स् n.--- पूज्यबुद्धि, आदर, वंदन, थोरपणा, मोठेपणा, अभिवादन. v.t.--- = Revere
reverend रेव्हरन्ड् a.--- पूज्य, मान्य, माननीय.
reverent रेव्हरण्ट् a.--- =Reverential
reverential रेव्हरेन्शिअल् a.--- श्रद्धाळू, नम्र, सादर, भक्तियुक्त.
reverently रेव्हरेन्ट्लि ad.--- पूज्यबुद्धिपूर्वक.
reverie रेव्हरी n.--- तंद्री, ध्यान. स्वप्न, दिवास्वप्न.
reverse रिव्हर्स् v.t.--- फिरविणे, उलटा करणे, रद्द करणे. a.--- उलटा, विपरीत. n.--- उलट पक्ष, संकटावस्था, फेरफार, स्थित्यंतर, विपत्ति, मोड.
reversion रिव्हर्शन् n.--- मालमत्तेतील अधिकारसंबंध / हक्कसंबंध विशिष्ट स्थितींत / अवधीनंतर मूळ स्वामी / धनी कडे परतण्याची प्रक्रिया.
reversionary रिव्हर्शनरी a. / n.--- ‘Reversion’ -संबंधीचा /-जनित (हक्कदार).
revert रिव्हर्ट् v.t.--- परतणे, पहिल्या जागेवर येणे.
review रिव्ह्यू v.t.--- मागे पाहणे, फिरून विचार करणे, पुनः चौकशी करणे, गुणदोषविवेचनकरणे. n.--- पुनरावृत्ति, गुणदोषविवेचन, चौकशी, टीका, समीक्षा, परामर्श, सिंहावलोकन.
revile रिव्हाइल् v.t.--- निंदा करणे, कुटलेली करणे.
revisal रिव्हायझल् n.--- तपासणी, पुनर्शोधन.
revise रिव्हाइज् v.t.--- तपासणी करणे, शुद्ध करणे.
revision रिव्हिजन् n.--- कनिष्ठाच्या निर्णयाचा वरिष्ठाने केलेला पुनर्विचार / पुनर्निर्णय. पुनरावलोकन व सुधारणा.
revival रिव्हायव्हल् n.--- पुनर्जीवन, संजीवन. पुनरुज्जीवन, पुनर्जागरण, असंप्रमोष.
revivalism रिव्हाय्व्हलिझम् n.--- (प्राचीन व्यवस्थेच्या) पुनरुज्जीवनाचा पुरस्कार करणारी विचारप्रणाली. पुनरुज्जीवनवाद, पुराणमतवाद.
revivalist रिव्हाय्व्हलिस्ट् n.--- Revivalism चा पुरस्कर्ता, पुनरुज्जीवनवादी, पुराणमतवादी.
revive रिव्हाइव्ह् v.i.--- पुनर्जीवित होणे / करणे.
revocation रिव्होकेशन् n.--- रद्द करणे, फिरविणे.
revoke रिव्होक् v.t.--- रद्द करणे, फिरवून टाकणे.
revolt रिव्होल्ट् v.i.--- फितूर होणे, राजावर उलटणे, डोईवर चढणे. n.--- फितुरी, बंड, विरोध, उठाव.
revolution रेव्होल्यूशन् n.--- राज्यक्रांति, उलटापालट, क्रांति, कालचक्र, प्रदक्षिणा.
revolve रिव्हॉल्व्ह् v.t.--- परिभ्रमण करणे, मनांत घोळणे, फिरवणे, प्रदक्षिणा घालणे.
revolver रिव्हॉल्व्हर् n.--- फिरणारा, अनेकबारी पिस्तूल.
revulsion रिव्हल्शन् n.--- किळस, तिटकारा, घृणा, उद्वेग.