rej-rem

reject रिजेक्ट् v.t.--- वर्ज करणे, नाकारणे, नापसंत करणे.
rejection रिजेक्शन् n.--- त्याग, नकार.
rejoice रिजॉइस् v.t.--- आनंदित करणे. v.i.--- आनंद होणे.
rejoicing रिजॉइसिंग् n.--- आनंद, उत्साह.
rejoin रिजॉइन् v.t.--- पुनः जोडणे, पुनः भेटणे.
rejoinder रिजॉइन्डर् n.--- (उत्तराचे) प्रत्युत्तर, उत्तरपक्ष, उलट जबाब.
rejuvenate रिज्यूव्हिनेट् v.t.--- पुनः तरुण करणे, (पुनः) सबल / सशक्त करणे.
rejuvenation रिज्यूव्हिनेशन n.--- पुनः सबल / सशक्त होण्याची क्रिया.
relapse रिलॅप्स् v.i.--- उलट खाणे, पुनः बिघडणे. n.--- माघार.
relate रिलेट् v.i.--- कथन करणे, नाते जोडणे.
relation रिलेशन् n.--- नाते, सोयरेपणा, कथन, वर्णन, संबंध, तुलना, साम्य, निरूपण. (Pl.) सोयरेधोयरे, भाऊबंद.
relative रिलेटिव्ह् a.--- संबंधी, नातेवाईक, सापेक्ष. n.--- नातेवाईक.
relativity रिलेटिव्हिटी n.--- सापेक्षता. Theory of Relativity : अल्बर्ट आइन्स्टाइन या शास्त्रज्ञाने मांडलेला विज्ञानातील सापेक्षतावाद.
relax रिलॅक्स् v.t.--- विसावणे, शांत / निश्चिन्त होणे. v.i.--- सैल करणे / होणे, विसावा देणे, ढिला करणे / होणे.
relaxation रिलॅक्सेशन् n.--- शिथिलीकरण, प्रयत्नशैथिल्य, आराम, विसावा, मानसिक / शारीरिक विश्राम / शांति.
relay रिले n.--- डाक, टप्पा. v.t.--- फिरून ठेवणे / घालणे.
release रिलीझ् v.t.--- सुटका करणे, सोडणे, मोकळीक करणे. -ला जारी करणे, -ला प्रकाशित करणे. n.--- सुटका, सोडचिट्ठी, मुक्तता.
relent रिलेंट् v.i.--- दया / कळवळा येणे, मृदू होणे.
relentless रिलेंट्लेस् a.--- पाषाणहृदयी, कठोर.
relevance रेलव्हन्स् n.--- समर्पकपणा, औचित्य.
relevant रेलव्हण्ट् a.--- प्रासंगोचित, समर्पक, सुसंगत, (सु-)संबद्ध. समयोचित. (हिंदी: प्रासंगिक).
reliance रिलायन्स् n.--- विश्वास, भरंवसा, भिस्त, निष्ठा.
reliant रिलायन्ट् a.--- विश्वासू,भरंशाचा.
relic रेलिक् n.--- अवशेष. (pl.) शव, प्रेत, स्मरण.
relict रेलिक्ट् n.--- विधवा.
relief रिलीफ् n.--- दुःखपरिहार, विश्रांति, मुक्तता, सहाय्य, स्वस्थता; उंचवटा, उभारी, उठाव, भरीवपणा, ठसठसशीतपणा.
relieve रिलीव्ह् v.t.--- दुःख हरणे, विश्रांति देणे, भागवणे.
reliever रिलीव्हर् n.--- बदली, मदत करणारा.
religion रिलीजन् n.--- धर्म, ईश्वरसेवा, पंथ, भक्ति.
religious रिलीजस् a.--- धार्मिक, धर्मासंबंधी. n.--- जोगी.
religiose रिलिजिओस् a.--- अतिधार्मिक.
religiosity रिलिजिआॅसिटी n.--- धार्मिकपणा, धर्मपरायणता. अतिधर्मपरायणता.
relinquish रेलिंक्विश् v.t.--- वर्ज्य करणे, सोडणे.
relinquishment रेलिंक्विशमेंट् n.--- त्याग, उत्सर्ग.
reliquary रेलिक्वरी n.--- (मूल्यवान / महत्वाचे) अवशेष (सांभाळून) ठेवण्याचे पात्र / पेटी.
relish रेलिश् v.t.--- रुचि लागणे / आणणे. n.--- रुचि, चव, गोडी, रुचकर द्रव्य /वस्तु.
relucent रिल्यूसेंट् a.--- तेजस्वी, चकचकीत.
reluctance रिलक्टन्स् n.--- कंटाळा, नाखुषी, त्रास. अनुत्सुक.
reluctant रिलक्टन्ट् a.--- नाखुष, नाराज.
rely रिलाय् v.i.--- विश्वास / भरवसा ठेवणे.
remain रिमेन् v.i.--- शिल्लक असणे, राहणे, थांबणे, मुक्काम करणे. n.--- बाकी, शेष. (pl.) प्रेत, शव, अवशेष.
remainder रिमेंडर् n.--- बाकी, शेष, अवशेष. a.--- राहिलेला, शिल्लक.
remand रिमांड् v.t.--- परत पाठविणे.
remark रिमार्क् v.i.--- लक्ष लावणे, चारचा करणे, टीका करणे. n.--- अवलोकन, टीका, चर्चा, नजर.
remarkable रिमार्केबल् a.--- लक्षांत ठेवण्याजोगा, प्रख्यात.
remarriage रीमॅरेज् n.--- पुनर्विवाह.
remediable रिमिडीएबल् a.--- उपायसाध्य.
remediless रिमिडिलेस् a.--- निरुपाय, असाध्य.
remedy रेमिडी n.--- उपाय, इलाज. v.t.--- उपाय करणे.
remember रिमेंबर् v.t.--- आठवणे, आठवण ठेवणे.
remembrance रिमेम्ब्रन्स् n.--- आठवण, स्मरण.
remind रिमाइन्ड् v.t.--- आठवण करणे, सुचविणे.
reminder रिमाइन्डर् n.--- सूचना / आठवण देणारा.
reminisce रेमिनिस् v.t. / v.i.--- -ला स्मरणे / आठवणे. आठवणी काढणे / काढत बसने. (on) --- -च्या आठवणी काढणे.
reminiscence रेमिनिसन्स् n.--- जुन्या आठवणी, पूर्वस्मृति, आठवणीतील गोष्ट.
reminiscent रेमिनिसंट् a.--- आठवण असणारा. n.--- आठवणारा.
remiss रिमिस् a.--- ढिला, भोळा, गाफील, सुस्त, चुकार.
remission रिमिशन् n.--- ढिलाई, सुस्ती, मवाळ स्वरूप भूमिका, माफी, सूट.
remit रिमिट् v.t.--- ढिला करणे, सूट देणे, हवाली करणे, माफ करणे, हुंडी करणे, पैसे पाठविणे, सोडणे. (न्यायालयांतील खटला / दावा) कनिष्ठ न्यायालयाकडे फेरविचारार्थ पाठविणे.
remittance रिमिटन्स् n.--- हुंडीने पाठविलेला पैसा.
remittee रिमिटी n.--- ज्याला पैसे पाठविले तो.
remix रिमिक्स् v.t.--- -ची फेरमिसळ करणे, -ला पुनः / वेगळ्या प्रकारे मिसळणे. n.--- अनेक, वेगवेगळ्या, ध्वनींचे / ध्वनिमुद्रणांच्या फेरमिश्रणाने / संकराने बनविलेली वेगळी / नवी सुरावट. (In the age of remix and raps and vulgar dances, the new generation may not be familiar with M.S. Subbulaksmi’s golden voice.)
remnant रेम्नन्ट् n.--- शेष, बाकी, रेजा. a.--- शिल्लक.
remonstrance रिमॉन्स्ट्रन्स् n.--- कानउघाडणी, समजूत.
remonstrate रिमॉन्स्ट्रेट् v.t./v.i.--- निषेध व्यक्त करत बाजू मांडणे / गयावया करणे, आक्षेप दाखविणे, नापसंती दर्शविणे. कान उघडणे, झाडणे, विरोधिणे, आक्षेपिणे.
remorse रिमोर्स् n.--- पस्तावा, हुरहूर, अनुताप, रवंत.
remorseless रिमोर्स्लेस् a.--- निर्दय, कठोर.
remote रिमोट् a.--- अल्प, कमी, अस्पष्ट, वेगळा. लांबचा, दूरचा, जुना, पुराणा.
remote - control रिमोट् - कण्ट्रोल् n.--- एखाद्या प्रक्रियेचे दुरून केलेले नियंत्रण / नियमन / चालन. दूरनियंत्रण. असे नियंत्रण इ. करणारे यंत्र / साधन. दूरनियामक.
removable रिमुव्हेबल् a.--- काढण्यासारखा, नेण्यासारखा.
removal रिमूव्हल् n.--- स्थलांतर, निवारण, परिहार.
remove रिमूव्ह् v.t.--- स्थलांतर करणे, निवारण करणे, दार करणे, परिहार / निरसन करणे, नेणे. n.--- नेने, स्थलांतर.
remunerate रिम्यूनरेट् v.t.--- -ला (कामाचा) मोबदला देणे, -ला भरपाई देणे. बक्षीस / इनाम देणे.
remuneration रिम्यूनरेशन् n.--- कामाबद्दल दिलेला मोबदला. मेहनताना. मजुरी, भरपाई, पारिश्रमिक. देणगी, बक्षीस.
remunerative रिम्यूनरेटिव्ह् a.--- फायदेशीर, लाभदायी, पुरेसा / भरपूर मोबदला देणारा. बक्षीस देणारा.