G-8 ‘Group of eight’ चे संक्षिप्त रूप : विशेषतः अमेरिचा, इंग्लंड, कॅनडा, फ्रांस, जर्मनी, रशिया, इटली, व जपान या विकसित देशांच्या दबावगटास उद्देशून प्रयुक्त.
G. N. P. ‘Gross National Product’ चे संक्षिप्त रूप.
G. R. जी.आर्. n.--- ‘Government Resolution’ चे संक्षिप्त रूप. (विशिष्ट विषयावरील रीतसर लिखित रूपातील) शासन-निर्णय, सरकारी परिपत्रक.
Gab गॅब् n.--- बडबड, वटवट, वल्गना. v.--- ‘gab’ करणे. The gift of the gab = बडबड करण्याची / घमेंड मारण्याची खोड / आवड / सवय.
Gabble गॅबल् n.--- बडबड, वटवट, गलबल. v.--- गलबलाट/ कलकलाट करणे.
Gable गॅबल् n.--- चांदई. छपराच्या दोन उतरत्या बांजूमधील भिंतीचा त्रिकोणी भाग.
Gaby गॅबी n.--- रेम्याडोक्या, मेषपात्र, मूर्ख.
Gad गॅड् v.i.--- हिंडणे, भटकणे. n.--- टोक, अंकुश.
Gadfly गॅड्फ्लाय् n.--- गोमाशी, गांधीलमाशी. त्रासदायक/सतावणारी/खोडसाळ व्यक्ति.
Gadget गॅजेट् n.--- नवे, छोटे यंत्र / यांत्रांग / उपकरण. (हिंदी: जुगाड).
Gaffe गॅफ् n.--- घोडचूक, प्रमाद.
Gag गॅग् v.t.--- तोंडात बोळा घालणे, बोलण्याची बंदी करणे. n.--- तोंडात घालण्याचा बोळा, विनोद, चुटका.
Gage गेज् n.--- पैजेची खूण/विडा, तारण, गहाण.
Gager गेजर् n.--- मोजणारा.
Gaggle गॅगल् n.--- थवा, कळप. v.--- = Gabble.
Gaiety गेइटि n.--- आनंदोल्लास, छानछोकी.
Gain गेन् v.t.--- मिळविणे, नफा मिळवणे, जय मिळवणे, पावणे. n.--- नफा, लाभ, मिळकत, कमाई.
Gainsay गेन्से v.t.--- वाद घेणे, उलट बोलणे.
Gairish गेरिश् a.--- भडक, झळक.
Gait गेट् n.--- चाल, चालण्याची ढब, गति.
Gala गाला/ गेला n.--- थाटमाट, डामडौल, सण, आनंदोत्सव, सोहळा.
Galactagogue गलॅक्टगोग् a./n.--- दुग्धस्त्रावक (द्रव्य).
Galaxy गॅलक्सी n.--- विश्वाच्या पसाऱ्यातील, असंख्य तारा, धूर, व वायु यांनी बनलेल्या, वेगवेगळ्या (एकमेकापासून अतिदूर), प्रचंड आकारांच्या आणि अगणित द्रव्यसमूहापैकी एक. या अगणित द्रव्यसमूहांपैकी ‘आकाशगंगा’ (इंग्लिश : Milky Way) नावाचा द्रव्यसमूह. पहा: ‘Nebula’.
Gale गेल् n.--- वावटळ, तुफान, जोराचा वारा.
Gall गॉल् n.--- पित्त, मायफळ. v.t.--- चोळवटणे, छळणे, त्रास देणे, सोलणे, घांसणे.
Gall-bladder गॉल्ब्लॅडर् n.--- यकृता(liver)स जोडलेली पित्तरसाची पिशवी, जीमधून, अन्नमार्गात अन्न आले असता, पित्तरस सोडला जाऊन तो नळीने जठरांती पोचतो. (हिंदी: पित्ताशय).
Gallant गॅलन्ट् n.--- पाणीदार माणूस, स्त्रियांचा कैवारा घेणारा माणूस. a.--- प्रतापशाली, छानदार, रंगेल, ‘धीरोदात्तः प्रतापवान’.
Gallantly गॅलन्ट्लि ad.--- दिलदारीने, मोठ्या छातीने.
Gallantry गॅलन्ट्री n.--- छानदारी, मर्दपणा, शौर्य.
Gallery गॅलरि n.--- रंगायन, प्रदर्शनगृह, इ. मधील सज्जा (हिंदी: दीर्घा). नाट्यगृह इ. मधील प्रेक्षकांना बसण्याचा सज्जा, प्रेक्षकसज्जा. अशा सज्जातील प्रेक्षक(-वर्ग), सज्जा, अजबखाना, प्रदर्शन कक्ष, प्रदर्शन गृह.
Galley गॅलि n.--- छापाचे खिले जुळविण्याचा सांचा, शिडीने हाकारण्याचे गलबत, लधाऊ गलबताचा ओवरा.
Gallic गॅलिक् a.--- फ्रेंच शैलीचा.
Galling गॅलिंग् n.--- जाचणारा, दुःखद, झोंबणारा, असह्य, दुःसह.
Gallipot गॅलिपॉट् n.--- औषध ठेवण्याचे भांडे.