S.I-Sad

S.I.M. = Subscriber Identity Module. (यंत्रोपकरणाच्या उपभोक्त्याची ओळख-/परिचय-/-दर्शक यंत्राघटक. (उदा. फिरत्या दूरध्वनियंत्रातील SIM-card).
S.L.V. --- = Satellite Launch Vehicle --- उपग्रह अवकाशांत सोडण्याचे (प्रक्षेपक-)वाहन / प्रक्षेपणास्त्र.
S.M.S. = Short Messaging Service चे संक्षिप्त रूप --- (फिरत्या दूरध्वनिषेटिकेतील) लघुसंदेश-(वहन-)सेवा. फिरत्या दूरध्वनी(यंत्रा-)-वरून टंकित रोपपत पाठविलेला लघुसंदेश.
SAARC सार्क् (proper noun) ‘South Asian Association for Regional Cooperation’ चे संक्षिप्त - रूप. इ. स. १९८५ मध्ये भारताच्या पुढाकाराने स्थापित एक राष्ट्र-संघटना : हिचे सदस्य - भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, अफगाणिस्तान.
Sabbath सेबल् a.--- विश्रांतीचा / सुट्टीचा दिवस. आठवड्यांतील सातवा दिवस जो विश्रांति व धार्मिक अनुष्ठानांत घालविण्याची ज्यू (इस्त्रायली) / ख्रिश्चन प्रथा आहे. (ज्यूमध्ये शुक्रवार संध्याकाळ ते शनिवार संध्याकाळ; ख्रिश्चनांत : रविवार).
Sabbatic / Sabatical सबॅटिक् / सबॅटिकल् a.--- ‘Sabbath’ -चा / -विषयक. n.--- (प्राध्यापक आदींना, विशेष अध्ययन इ. साठी, प्रति सातवर्षांनी दिली जाणारी) (पगारी) रजा / सुट्टी.
Saber = Sabre
Sable सेबल् a.--- काळा. n.--- सुतकी पोषाख.
Sabotage सॅबटाज् n.--- एखादे काम / योजना हाणून पाडण्यासाठी केलेली विध्वंसक / बाधक कृति. v.t.--- -ला ‘sabotage’ च्या साहाय्याने बाधा आणणे.
Saboteur सॅबटर् n.--- ‘sabotage’ योजणारी / घडविणारी व्यक्ति.
Sabre सेबर् n.--- वाकडी तलवार. v.t.--- तलवारने तोडणे.
Sabre-rattler सेबर्-रॅट्लर n.--- तलवार खणखणविणारा, युद्धाची खुमखुमी दाखविणारा, युद्धास आव्हान देणारा, रणातुर. संघर्षप्रिय.
Sabre-rattling सेबर्-रॅट्लिंग् n.--- तलवारीचा खणखणाट करणे, युद्धास / संघर्षास / लढ्यास आवाहान देणे.
Sabulous सॅब्युलस् a.--- वाळूचा, रतट , कचकचीत.
Sacredotal सॅक्रिडोटल् a.--- याज्ञिकाचा, याज्ञिक.
Sachet सॅशे n.--- जुगादान, छोटी पिशवी, चंची, पुडा. पहा: ‘Satchel’, ‘Pouch’.
Sack सॅक् n.--- लूट, डल्ला, पोते, थैली, पोतडी. एक प्रकारचा सैल झगा / कंचुक / कोट. v.t.--- लुटणे, बुचाडणे. पोत्यात इ. बंद करून टाकणे; कामावरून / नोकरीतून दार करणे, बडतर्फ / बरतरफ / पदच्युत करणे. To give (one) the sack : कामावरून काढून टाकणे. To get the sack : पदच्युत होणे / केले जाणे.
Sack cloth सॅक्क्लॉथ् n.--- गोणपाट, तरट.
Sackage सॅकेज् n.--- लुटण्याचे / लुबाडण्याचे कृत्य.
Sacral सेक्रल् a.--- शरीराच्या खालील भागासंबंधीचा. ‘Sacrum’ संबंधीचा.
Sacrament सॅक्रॅमन्ट् / सॅक्रमन्ट् n.--- संस्कार, धार्मिक विधि / क्रियाकर्म.
Sacrarium सक्रेरियम् n.--- चर्चमधील धार्मिक विधि चालविण्याची जागा.
Sacred सेक्रेड् a.--- पवित्र, धार्मिक, देवाचा.
Sacrifice सॅक्रिफाइस् v.t.--- यज्ञ करणे. n.--- यज्ञ, त्याग, बलिदान.
Sacrificer सॅक्रिफायसर् n.--- यजमान, यज्ञ करणारा.
Sacrilege सॅक्रिलिज् a.--- देवस्वापहार, पावित्र्यभंग, भ्रष्टाचार.
Sacrilegious सॅक्रिलिजस् a.--- ‘Sacrilege’ -विषयक / -स्वरूपाचा.
Sacristy सक्रिस्टी n.--- चर्चमधील पूजेची भांडी, वस्त्रे इ. ठेवण्याचे दालन.
Sacrosanct सॅक्रोसँक्ट्
Sacrum सेक्रम्
Sad सॅड् a.--- उदास, दुःखाचा, रडका, नादान, वाईट, दुष्ट.
Sadden सॅडन् v.i.--- उदास / खिन्न करणे.
Saddle सॅडल् v.t.--- जीन घालणे. n.--- जीन, खोगीर.
Sadism से(सा)डिझम् n.--- क्रूरतेची (विकृत) आवड (विशे. लैंगिक विषयांतील). पहा: ‘Masochism’.
Sadist सॅडिस्ट् n.--- ‘Sadist’ ने ग्रस्त.
Sadistic सॅडिस्टिक् ‘Sadism’ संबंधीचा / च्या स्वरूपाचा. (‘Marquis de sade (1740 - 1814 A.D.) या कुप्रसिद्ध गुन्हेगार - लेखकाच्या नांवावरुन).
Sadly सॅड्लि ad.--- दिलगिरीने.