Affect अॅफेक्ट् v.t.--- फेर पाडणे, गुण काढणे, गहिंवर आणणे, डोळा ठेवणे, स्तोम माजवणे.
Affectation अॅफेक्टेशन् n.--- तोरा, नखरा, स्तोम, ढोंग.
Affected अॅफेक्टेड् a.--- खोत, कुर्रेबाज.
Affectedly अॅफॆक्टेडलि ad.--- कुर्ऱ्याने, डौलाने, कृत्रिमपणे.
Affecting अॅफेक्टिंग् a.--- हृदयास लागणारे, कळवळा आणणारे, करुणापर, रसिक.
Affection अफेक्शन् n.--- रोमांचक भाव (ना), मनोविकार, शोक, प्रेम, स्नेह, रोग, विकार.
Affectionate अॅफेक्शनेट a.--- मायाळू, ममतेचा.
Afferent अॅफरण्ट् a.--- (मज्जातंतु इ.) आंत नेणारा, अंतर्वाही. ; पहा: efferent
Affiance अफायंस् n.--- लग्नाचा ठराव, वाङ्निश्चय.
Affidavit अॅफिडेव्हिट n.--- शपथेवर/ प्रतिज्ञेवर जबानी.
Affiliate अॅफिलिएट् v.t.--- दत्तक घेणे, मंडळीत घेणे.
Affinity अॅफिनिटी n. --- सोयरीक, शरीर संबंध, आकर्षण.
Affirm अॅफर्म् v. t.--- कायम करणे, निश्चयाने सांगणे.
Affirmation अॅफर्मेशन् n. --- खचितपणे सांगणे, प्रतिज्ञा.
Affirmative अॅफर्मेटिव्ह् a. --- पक्षानुकूल, निर्णायक.
Affix अॅफिक्स् v.t. --- जोडणे, जुळणे. n. प्रत्यय.
Afflict अॅफ्लिक्ट् v. t. --- त्रास/दुःख देणे.
Afflicted अॅफ्लिक्टेड् a. --- दुखावलेला, खिन्न.
Affliction अॅफ्लिक्शन् n. --- क्लेश, दुःख, त्रास.
Affluence अॅफ्ल्युअन्स् n. --- संपत्ति, धनसंपदा, समृद्धी, भरभराट.
Affluent अॅफ्ल्युअन्ट् a. --- पैकेवाला, संपन्न, समृद्ध. n. दुसऱ्या नदीला मिळणारी नदी/ओढा.
Afford अॅफोर्ड् v.t. --- पुरविता येणे, सामर्थ्य असणे.
Affray अॅफ्रे n. --- कलागत, तंटा, दंगा.
Affright अॅफ्राइट् v.t. --- भय दाखविणे. n. दहशत.
Affront अॅफ्रंट् v.t. तोंडावर अपमान करणे, चिडविणे.
Afield अॅफील्ड् ad. --- शेतांत, मार्ग सोडून।
Aflame अॅफ्लेम् ad. --- जळत,
Afloat अफ्लोट् ad.--- तरंगत, फांकत, उडत.
Afoot अफूट् ad.--- पायी, चालू.
Afore अॅफोर् ad.--- पुढे, आधी, समोर, पूर्वीं.
Afoul अफाउल् ad.--- च्या विरुद्ध कृती करणे/वागणे/आचरणे, ला अडथळा करणे, इजा करण्याची कृती करणे.
Afraid अॅफ्रेड् a. भ्यालेला, भयभीत, भययुक्त.
Afresh अॅफ्रेश ad. फिरून, दुसऱ्याने, पुनः.
Afront अॅफ्रंट ad. समोर, पुढे, तोंडापुढे.
After आफ्टर् a.मागचा, उत्तर, prep. पाठीमागे, मांगून, नंतर,लागोपाठ, सारखा, प्रमाणे.
After-all आफ्टर- आॅल ad. शेवटी.
After-birth आफ्टर-बर्थ n. गर्भाचे वेष्टन, गर्भाशय.
After-crop आफ्टर क्रॉप n. एकाच वर्षातील दुसरे पीक.
Afterdays आफ्टरडेझ n. उत्तरकाळ
Afterlife आफ्टरलाइफ़ n. उत्तरवय, उतारवय.
Afterhours आफ्टर-आवर्स n. अवेळ
Aftermath आफ्टरमाथ n. एकाच ऋतूतील दुसरी फूट, कापणी नंतर आलेली फूट, (एखाद्या लक्षणीय घटनेतून उद्भवलेले) परिणाम.
Aftermost आफ्टरमोस्ट a. सर्वांच्या पाठीमागचा.
Afternoon आफ्टरनून a. तिसरा प्रहर.
Afterpains आफ्टरपेन्स n. बाळंतीण झाल्यानंतरच्या वेणा.
Afterthought आफ्टरथॉट n. मागून सुचलेली बुद्धि.
Afterwards आफ्टरवर्डस ad. नंतर, मागून, मग.
Afterwise आफ्टरवाइझ a. मागून शहाणपण सुचलेला.
Afterwit आफ्टरवुइट n. मागून सुचलेले शहाणपण.
Again अगेन ad. फिरून, आणखी, पुनः, माघारी.
Against अगेन्स्ट prep. प्रतिकूल, विरुद्ध, वर.
Agency एजन्सी n.--- गुमास्तेगिरी, आडंत, कर्तृत्व, वकिली.
Agenda अजेण्डा n. --- (सभा इत्यादि च्या) कामकाजाची कार्यसूची/विषयसूची.
Agent एजंट n.--- गुमास्ता, मुनीम, अडत्या, कर्ता.
Agentship एजंट्शिप n.--- गुमास्तेगिरी, अडत.
Agglomerate अॅग्लाॅमरेट v.t.--- गोलाकृती करणे, गोळा होणे/करणे, साठणे/साठविणे. a.--- गोळा झालेला/साठलेला. n. ---साठा,ढीग,गोळा, संघात.
Aggrandize अॅग्रेॅन्डाइझ् v.t. --- भरभराट करणे, महत्व वाढविणे,थोरपणा देणे, वाढविणे, (विशेषतः अतिरेकी बढाई मारून/स्तोम माजवून).
Aggravate अॅग्रव्हेट v.t. --- अधिक कठीण किंव्हा दुःसह करणे, विकोपास नेणे.
Aggravation अॅग्रेव्हेशन् n. --- खोड काढणे, वृद्धी करणे.
Aggregate अॅग्रिगेट v.t. --- एकत्र होणे, एकावाताने. n. --- एकूणजमा, समुदाय. a. --- सामाजिक.
Aggregately अॅग्रिगेट्लि ad. --- एकंदर, एकवट.
Aggregation अॅग्रिगेशन् n. --- समुदाय, गोळा.
Aggress अॅग्रेस् v.i. --- कुरापत काढणे, आगळीक करणे.
Aggression अॅग्रेशन् n. --- कुरापत, आगळीक.
Aggressor अॅग्रेसर n. --- कुरापत काढणारा, खट्याळ.
Aggrieve अॅग्रीव्ह v.t. --- दुःख/यातना देणे.
Aghast अॅघास्ट a. --- घाबरलेला, भेदरलेला.
Agile अॅजाइल् a. --- चपळ अंगाचा, सुटसुटीत.
Agility, Agileness अॅजिलिटी, अॅजाइलनेस n. --- अङ्गचापल्य, सुटसुटीतपणा.
Agist अॅजिस्ट v.t. --- चरणीला घेणे.
Agitate अॅजिटेट v.t. --- खळबळविणे, घुसळणे, वाटाघाट करणे, घाबरविणे, हालविणे, क्षोभविणे, घोळणे.
Agitation अॅजिटेशन् n. --- चळवळ, वाटाघाट, ओढाताण.
Agitprop अॅजिट्प्राॅप n. --- (विशेषतः कम्युनिस्टांकडून) साहित्य, नाट्य, कला, इत्यादि द्वारा केला जाणारा फूस देणारा राजकीय प्रचार. उदा. While the issue (deporting illegal migrants in Assam) had been misused to lend credibility to very questionable forms of political action, it is no mere agitprop.
Agnail अॅग्नेल n. --- नखुरडे, नखरूड.
Agnate अॅग्नेट n. --- गोत्रांतला, गोत्रज, एकजातीचे.
Agnation अॅग्नेशन् n. --- गोत्रसंबंध, संबंध.
Agnomen अॅग्नोमेन् n. --- (रोमन नागरिकांचे) चौथे (‘cognomen’ च्या पुढचे) नाव. दुसरे ‘cognomen’.
Agnostic अॅग्नाॅस्टिक n. --- अंतिम सत्य हे अज्ञात/ अज्ञेय असते असे मानणारा, अज्ञेयवादी. adj. --- ‘agnostic’ - विषयक.
Agnosticism अॅग्नाॅस्टिसिझम् n. --- अंतिम सत्य मानवास कळत नाही किंव्हा कळणारही नाही, असे मानणारा पंथ. अज्ञेयवाद.