I-ill

I आय् pron.--- मी. n.--- मीपणा, अहंता. Iodine चे संक्षिप्त रूप.
I.M.F. ‘International Monetary Fund’ याचे संक्षिप्त रूप.
iatro आयेट्रो / आयॅट्रो (ग्रीक) ‘वैद्य’, ‘भिषक’, ‘चिकित्सक’ या अर्थी सामासिक-शब्दांत येणारे उपपद.
iatrochemist आयेट्रोकेमिस्ट् n.--- वैद्यकांत रसायन-शास्त्राचा विनियोगकर्ता.
iatrogenic आयेट्रोजेनिक् n.--- प्रामादिक वैद्यकीय उपचारानी उत्पन्न (रोग).
iatromathematician आयेट्रोमॅथेमॅटीशिअन् n.--- गणित / ज्योतिर्गणित / फलज्योतिष यांच्या सहाय्याने वैद्यकी करणारा.
ibid इबिड् ad.--- ‘Ibidem’ चे संक्षिप्त रूप.
ibidem इबिडेम् / इबाय्डेम् ad.--- त्याच ठिकाणी, तेथेच. पूर्वोक्त-(ग्रंथ इ.) -स्थानींच, तत्रैव, कित्ता.
Ibsen, Henrik (२०-३-१८२८ ते २३-५-१९०६) नॉर्वे-देशीय कवि व नाटककार. पाश्चात्य नाट्यलेखनावर प्रभाव पाडणारा. नाट्यकृति: Brand, Pillars of society, Hedda Gabler, Doll’s House, Ghosts, The wild duck, The Master Builder, John Gabriel Borkman.
ice आइस् n.--- थंडीने थिजलेले पाणी, गोठलेले / थिजलेले पाणी, बर्फ, हिम. हिमाचा स्तर. गोठून घट्ट झालेला पदार्थ. भोजनाअखेरचे थंडगार / गोठवलेले खाद्य. = Water-ice. v.t.--- बर्फ करणे, बर्फाने आच्छादणे.
ice-cream आइस्क्रीम् n.--- बर्फाने घट्ट केलेले दूध, गोठवून घट्ट केलेली दूध-मलाई, हिमक्षीर. To put ice (with) : (वर) प्रभाव पाडणे. To cut no ice व्यर्थ होणे.
iceberg आइस्बर्ग् n.--- बर्फाचा डोंगर.
icefall आइस्फॉल् n.--- बर्फाचा वर्षाव, हिमवृष्टि.
ichneumon इक्न्यूमन् n.--- मुंगूस, नकुल.
ichor आइकॉर् n.--- लस, फोड, मदोन्नत्त हत्तीच्या गंडस्थळातून होणारा स्त्राव. मदस्त्राव. दान(संस्कृत). देवांच्या नसांतून वाहणारा जीवनद्रव. रक्त.
icicle आयसिकल् n.--- पडणाऱ्या पाण्याचे गोठून बनलेले लोंबते हिमदंड.
icily आय्सिली ad.--- गोठविण्याच्या रीतीने गोठवून टाकीत.
icon आइकॉन् n.--- प्रतिमा, मूर्ति, चित्र.
iconoclasm आइकॉनक्लाझम् n.--- मूर्तिपूजेचा विरोध.
iconoclast आइकॉनक्लास्ट् n.--- मूर्तिपूजेचा विरोधक.
idea आयडिआ n.--- कलपना, प्रतिमा, तर्क, ग्रह.
ideal आयडिअल् n.--- विचार, साध्य, ध्येय, अंतिम हेतू.
idealism आय्डिअलिझम् n.--- जाणीव / बुद्धि हींतच सत्याचे खरे रूप असते हा विचार / सिद्धांत. साक्षात संवेदन / अनुभव / दर्शन हे सत्य असा सिद्धांत. आदर्श निष्ठानुसारिता. निसर्गाच्या नकलेपेक्षा कल्पनेच्या भारारीस महत्व देणारी कलादृष्टि / साहित्यशास्त्र.
idealist आय्डिअलिस्ट् n.--- ‘Idealism’ आचरणारा.
idealistic आय्डिअलिसटिक् a.--- ‘Idealism’ / ‘Idealist’ चा विषयक /- स्वरूपी.
ideate आय्डीएट् v.t.--- कल्पिणे. -ची कल्पना / उत्प्रेक्षा करणे. a.--- कल्पित. n.--- कल्पनाविषय (झालेली गोष्ट / वस्तु).
identikit n.--- गुन्हेगारांना पकडण्यासाठी, त्यांना पाहिलेल्या लोकांच्या सांगण्यावरून गुन्हेगारांचे चित्र तयार करण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारचे केस, डोळे, नाक, कान, आदींची चित्र असलेली सामग्री. अशा सामग्रीपासून तयार केलेले चित्र. a.--- अशा सामग्रीपासून तयार केलेल्या चित्रासारखे नीरस व कंटाळवाणे.
ideation आयडिएशन् n.--- पंचनेन्द्रियांवाचून कल्पना करण्याची कृति/प्रक्रिया.
ideational / Ideative आयडिएशनल् / आयडिअॅटिव्ह् a.--- केवळ कल्पनेने काढलेला, केवळ कल्पनेवर आधारित.
identical आयडेन्टिकल् a.--- तोच, एकच, एकरूप.
identify आयडेन्टिफाय् v.t.--- एकरूप करून दाखविणे.
identity आइडेंटिटी n.--- ऐक्य, तादात्म्य,
ideologist आयडिआॅलॉजिस्ट् n.--- तत्वज्ञ, दार्शनिक. तत्वचिंतक.
ideologue = Ideologist
ideology आयडिआॅलॉजी n.--- कल्पनांचे शास्त्र, तत्वप्रणाली, दर्शन.
identification आयडेण्टिफिकेशन् n.--- ओळख.
identity आइडेन्टिटी n.--- पूर्ण सारखेपणा, एकरूपता. व्यवच्छेदक वैशिष्ट्य / व्यक्तिमत्व, अस्मिता.
idiocy इडिओसी n.--- जन्माचा वेडेपणा, चळ, खूळ.
idiom इडिअम् n.--- वाक्प्रचार, संप्रदाय, म्हण, विशिष्ट लोकसमूहाची / प्रदेशाची भाषा / भाषाशैली / बोली. भाषेची / बोलण्याची विशिष्ट पद्धति/रीत. विशिष्ट भाषेची, वाक्यरचना, व्याकरण-आदिसंबंधीची धाटणी. विशिष्ट शब्दसंहतीचा (तद्वत शब्दांतून थेट व्यक्त न होणारा पण प्रचारात असलेला) विशेष अर्थ, वाक्प्रचार. (हिंदी: मुहावरा).
idiomatical इडिओमॅटिकल् a.--- भाषणसंप्रदायाचा.
idiopsychology इडिओसाय्कॉलजी n.--- प्रत्येकाची स्वतंत्र/विशिष्ट मनःप्रक्रिया/मनोदेवता.
idiosyncracy ईडिअसिंक्रसी n.--- (वैयक्तिक, वैचित्र्यपूर्ण) वैशिष्ट्य. चक्रमपणा, भंपकपणा. (वागण्याची / विचाराची) चमत्कारिक तऱ्हा. तऱ्हेवाईकपणा, तऱ्हेवाईक कल्पना / वर्तन
idiosyncratic ईडिअसिंक्रॅटिक् n.--- चक्रमपणाचा, भंपकपणाचा, खुळचटपणाचा.
idiot इडिअट् n.--- जन्माचा वेडा/खुळा.
idle आइडल् a.--- आळशी, रिकामा. व्यवहाराशी फारसा संबंध नसलेला. तर्कटीपणाचा. (केवळ) काल्पनिक.
idleness आइडल्नेस् n.--- सुस्ती, आळस, रिकामपण.
idler आइड्लर् n.--- गमणारा, रिकामटेकडा.
idol आय्डॉल् n.--- मूर्ति, देव.
idolater आयडॉलेटर् n.--- मूर्तिपूजक, निष्ठावान भक्त, अंधभक्त, भगत, एकनिष्ठ अनुयायी.
idolatrous आयडॉलेट्रस् a.--- मूर्तिपूजाविषयक, मूर्तिपूजात्मक. अतिभक्तिभावाचा, अंधभक्तिपूर्ण.
idolatry आयडॉलेट्री n.--- मूर्तीपूजा, अतिभक्ति.
idoneous आइडोनिअस् a.--- योग्य, युक्त.
idyll / Idyl आयडिल् / इडल् n.--- रम्य जीवनाच्या (विशे. ग्रामीण) वर्णनाचे कवन / कथाकथन. रम्य- कथा/-काव्य.
idyllic आय्डिलिक् / इडिलिक् a.--- ‘Idyll’ संबंधीचे / च्या स्वरूपाचा, काव्यात्मक, रोमांचक, रंगदार, चित्रमय.
if इफ् con.--- जर, जर करितां, जर कां, जर काय.
igneous इग्निअस् a.--- अग्नीचा, अग्निमय.
ignipotent इग्निपोटेंट् a.--- जहाल, कडक.
ignite इग्नाइट् v.t.--- पेटवणे, जाळ करणे.
ignoble इग्ननोबल् a.--- हीन कुळातला, नीच.
ignominy इग्नॉमिटी n.--- अपकीर्ति, अपयश, दुष्कीर्ती, अकीर्ति, अयश.
ignominious इग्नॉमिनिअस् a.--- अपयशाचा, लाजिरवाणा, लज्जास्पद, तिरस्करणीय.
ignorance इग्नरस् n.--- अज्ञान, गैरमाहिती, अजाणतेपणा.
ignorant इग्नरन्ट् a.--- मूढ, अज्ञानी.
ignorantly इग्नरन्टलि ad.--- अज्ञानाने, गैरमाहितीने.
ignore इग्नोर् v.t.--- माहीत / ठाऊक नसणे.
ikebana इकेबाना n.--- फुलापानांची आकर्षक रचना / मांडणी करण्याची जपानी पद्धति.
ikon = Icon
iliac इलिअक् a.--- ‘Ilium’ शी जोडलेला.
ilium इलियम् n.--- नितम्बास्थि.
ilk इल्क् n.--- तोच प्रकार/गट.
ill इल् a.--- वाईट, दुःखी, आजारी, रानटी. n.--- संकट, दुःख, रोग. ad.--- वाईट, खराब, जुलमाने.
ill-bred इल्ब्रेड् a.--- अनुचितपणे उपजलेला / वाढलेला. अविनीत. गावंढळ, रासवट. ओबडधोबड. असंस्कृत. दुष्प्रवृत्तीचा.
ill-looking इल्लुकिंग् a.--- कुरूप, विद्रूप.
ill-minded इल्माइंडेड् a.--- दुष्ट मनाचा.
ill-natured इल्नेचर्ड् a.--- वाईट स्वभावाचा.
ill-temper इल्टेम्पर् n.--- राग, तिरसटपणा.
ill-treat इल्ट्रीट् v.t.--- वाईट रीतीने वागविणे.
ill-wisher इल्विशर् n.--- अकल्याणचिंतक.
illation इलेशन् n.--- अनुमान, निगमन.
illblood इल्ब्लड् n.--- वैर, शत्रुत्व.
illegal इल्लीगल् a.--- गैरकायद्याचा, अशास्त्र.
illegally इल्लीगलि ad.--- गैरकायद्याने, कायदा मोडून.
illegible इल्लेजिबल् a.--- वाचण्यास अवघड, गिचमीट.
illegit
illegitimacy इल्लिजिटिमसि n.--- अविधिजन्म.
illegitimate इल्लिजिटिमेट् a.--- अनौरस जारज.
illiberal इल्लिबरल् a.--- चिक्कू, अनुदार, क्षुद्र मनाचा
illiterate इल्लिटरेट् a.--- लिहिता वाचता न येणारा, निरक्षर.
illiquid इलिक्विड् / इल्लिक्विड् a.--- (हक्क, ऋण, बंधन, इ.) अस्पष्ट, अव्यक्त, अप्रत्यक्ष, अनिश्चित. (संपत्ति, साधन, मालमत्ता, इ.) पैशांत रूपांतरित होण्यास / करण्यास अवघड. Illiquid asset n.--- अद्राव्य संपत्ति.
illness इल्नेस् n.--- दुखणे, रोग, आजार.
illude इल्यूड् v.t.--- फसवणे, भुलवणे, मोह घालणे.
illuminate इल्युमिनेट् / इलूमिनेट् v.t.--- रोशणाई करणे, दीपोत्सव करणे, सुशोभित / सुंदर करणे, अर्थ स्पष्ट करणे, -ला प्रकाशित / प्रकाशमय करणे, -चे प्रबोधन करणे.
illumination इल्युमिनेशन् n.--- रोशणाई, दीपोत्सव.
illumine इल्युमिन्/ इलूमिन् v.t.--- रोशणाई करणे, दीपोत्सव करणे. =Illuminate.
illusion इल्युजन् n.--- मोह, भ्रम, माया, वस्तुस्थितीचे चुकीचे ज्ञान. पहा: ‘hallucination’
illusionism इल्यूजनिझम् n.--- भौतिक विश्व / दृश्य सृष्टि हा भ्रम / भास आहे अशी विचारसरणी. मायावाद.
illusionist इल्यूजनिस्ट् n.--- ‘Illusionism’ चा पुरस्कर्ता.
illusive इल्युसिव् a.--- मायेचा, भ्रामक, दुःसाध्य.
illusory इल्यूझरी a.--- भ्रमज, मायाजन्य, खोटा, केवळ भासमान.
illustrate इलस्ट्रेट् v.t.--- प्रकाश पाडणे, सुशोभित करणे, चित्रॆ घालणे, उदाहरणांनी स्पष्ट करणे.
illustration इलस्ट्रेशन् n.--- प्रकाश, दाखला, चित्र.
illustrative इलस्ट्रेटिव्ह् a.--- दाखला / दृष्टांत देऊन स्पष्ट करणारा.
illustrious इलस्ट्रियस् a.--- तेजस्वी, तेजःपुंज, श्रीमान्, विशेष पराक्रमाने विख्यात, श्रुतकीर्ति.