par पार् n.--- बरोबरी, समता. बरोबरीची स्थिति / योग्यता / किंमत. On / Upon par (with) --- शी बरोबरी असलेला, -च्या किंमतीचा / योग्यतेचा. एका देशाच्या चलनाची अन्य देशाच्या चलनांत (अधिकृत) किंमत. At par --- मूळ किमतीला. मूळ (लिखित) किमतीबरोबर सर्वसाधारण / सरासरी किंमत / स्थिति/ दर्जा. On a par --- सरासरी-अनुसार. (तद्वत् : above / below / under etc.). = paragraph (abbreviated). Par excellence पार एक्सलॉन्स्--- स्पष्ट / उघड वरचढ, पणास्तव. उत्कृष्टपणाने. सर्वोत्तम-/सर्वोत्कृष्ट-/ पणाने. (विशेषण : विशेष्यामागून येणारे) --- सर्वश्रेष्ठ, अद्वितीय.
parable पॅराबल् n.--- दृष्टांतरूप कथा, दृष्टांत, उपमा.
parabolic पॅराबॉलिक् a.--- दृष्टांतरूप, दृष्टांताचा, तिरकस आकृति.
parade परेड् v.t.--- कवाईत करणे, डौल मिरविणे. -ला (दिमाखाने) मिरविणे; चा देखावा करणे; -चे प्रदर्शन करणे. n.--- (सैनिक इ. चा) (तपासणी, समारंभ इ. साठी वरिष्ठांपुढे जमविलेला) समुदाय, जमाव. अशा समुदाय इ. चे संचलन / मिरवणूक, दुकाने इ. ची रांग. कवाईत, डौल, भपका, थाटमाट. v.t. /v.i.--- रस्ते इ. वरून मिरविणे, मिरवत जाणे, मिरवणूक काढणे, मिरवणुकीने फिरणे, फेरफटका मारणे. On parade --- मिरवणारा, प्रदर्शनार्थ ठेवलेला / मांडलेला.
paradigm पॅराडिम् n.--- उदाहरण, नमुना, आदर्श / अनुकरणीय, आदर्शाचा नमुना.
paradise पॅराडाइझ् n.--- आनंदभुवन, सुखलोक.
paradox पॅरडॉक्स् n.--- असत्याभास, अयुक्ताभास. विरोधाभास; आत्मविसंगतिमय विधान / व्यक्ति / स्थिति. विरोध, विसंगति.
paragon पॅरागॉन् n.--- आदर्श नमुना, माहेरघर, राजमोहरा. निर्दोष हिरा. ad.--- गुणाढ्य.
paragram पॅराग्रॅम् n.--- श्लेष.
paragraph पॅराग्रॅाफ् n.--- लेखभाग, लेखखंड.
parka
parallel पॅरलल् a.--- समांतर, बरोबर. n.--- समांतररेषा, बरोबरी, तुलना. v.t.--- उपमा देणे, बरोबरी करणे, समांतर करणे / राखणे. Parallel of latitude --- परस्परांस समांतर अक्षांश.
parallelogram पॅरलेलोग्रॅम् n.--- आमोरासमोरच्या बाजू समांतर असलेला चौकोन. सामंतरचतुर्भुज.
paralysis पॅरॅलिसिस् / परॅलिसिस् n.--- अर्धांगवायु. पक्षाघात / पक्षघात.
paralytic पॅरॅलिटिक् a.--- अर्धांगवायूचा. n.--- अर्धांगरुग्ण.
paramnesia पॅरॅम्नीझिअ n.--- चुकीचे / भ्रामक स्मरण, स्मरणभ्रम.
paramount पॅरामाउन्ट् a.--- श्रेष्ठ, प्रधान, वरचा.
paramour पॅरामूर् n.--- यार, दोस्त, राख, जारिणी.
paranoia पॅरनोइअ / पॅरनॉइअ n.--- वेड, भ्रम.
paranoiac पॅरनोइअॅक् a./n.--- वेडेपणाचा, भ्रमिष्टपणाचा, वेडा, भ्रमिष्ट, संशयाच्या / अविश्वासाच्या वेडाने / अतिरेकाने त्रस्त.
paranoid पॅरनॉइड् a./n.--- = Paranoiac
parapet पॅरापेट् n.--- वरंड, पाळ, धक्का, तटबंदी.
paraphrase पॅराफ्रेज् n.--- अनुवाद, व्याख्या, विवरण. v.t.--- टीका / व्याख्या / अनुवाद करणे.
parasite पॅरासाइट् n.--- खुशामत करून पोट भरणारा.
parasitic पॅरासिटिक् a.--- खुशामती, आर्जवी.
parasol पॅरसोल् n.--- छोटी (उन्हाची) छत्री.
parboil पार्बॉइल् v.t.--- अर्धकच्चे शिजविणे, रांधणे.
parcel पार्सल् v.t.--- वाटणी करणे, वाटणे. n.--- पुडा, पुडके, ढीग, गठ्ठा, अंश, रास, जुडगा.
parceling पार्सलिंग् n.--- वाटणी, विभागणी.
parch पार्च् v.t.--- भाजणे, होरपळने, खडखडीत करणे, कोरडा करणे.
parchment पार्च्मेंट् n.--- चर्मपत्र, चर्मपट.
pard पार्ड् n.--- चित्ता, दिवट्या वाघ.
pardon पार्डन् v.t.--- माफी./क्षमा करणे. n.--- क्षमा, माफी.
pardonable पार्डनेबल् a.--- माफी करण्यायोग्य, क्षम्य.
pare पेअर् v.t.--- -ला तासणे / सोलणे / छाटणे / साळणे, -ची साल काढणे. Pare down --- -ला तासून सुटसुटीत करणे. Pare down to : -ला…-पर्यंत लहान करणे. (eg. The list containing 300-odd names would be pared down to about 50.) (See : ‘Prune’)
parent पेरेन्ट् n.--- आई अथवा बाप.
parentage पेरेन्टेज् n.--- जात, कुळ, जन्म, कुळी.
parental पेरेन्टल् a.--- आईबापांचा, मातृपितृवत्.
parenthesis परेन्थिसिस् n.--- लेखनात / भाषणांत, शब्दरचनेच्या ओघांत ना बसणारे पण कंस किंवा विरामचिंहांनी वेगळे दाखविलेले, मधेच घातलेले शब्द, कंसचिन्ह. (pl. Parentheses परेन्थिसीज्)
parer पेरर् n.--- तासणारा, सोलणारा.
pariah परैअ n.--- (तमिळ परैयन ज्याचे अनेकवचन : परैयर) --- ही जातीचा / जातिबाह्य / बहिष्कृत व्यक्ति / गट. हीनवंश.
parietal पॅरिएटल् a.--- बंद भागाच्या बाह्य पृष्ठा-(संबंधी-)चा.
parity पॅरिटि n.--- बरोबरी, समानत्व, साम्य, समता.
park पार्क् n.--- शिकारीची जागा, रमणा, तोफखाना.
parka पार्का n.--- कुंची असलेला गरम अंगरखा, कुंचीदार गरम बंडी.
parkinson’s disease पार्किन्सन्स् डिझीझ् n.--- स्नायूंचे आपोआप थरथरणे; चालणे, गिळणे, इ. क्रियांचे चांगले नियंत्रण ना राहणे इ. लक्षणांचा मेंदूतील डोपॅमाइन (Dopamine) नामक अमिनो ऍसिडच्या उणीवेत परिणीती होऊन वाढणारा एक उतारवयातील वातव्याधि.
parlance पार्लन्स् n.--- संभाषण, भाषा, भाषणसंप्रदाय.
parley पार्ली v.i.--- सल्ल्याचे बोलणे. n.--- बोलचाल, संभाषण.
parliament पार्लमेंट् n.--- इंग्लंडातील राज्यकारभार पाहणारी प्रतिनिधीसभा.
parlour पार्लर् n.---बसण्याची खोली, खासगी बैठकीची खोली, अतिथींशी गप्पागोष्टी / खानपान इ. करण्याचे (घरातील इ.) दालन. विशिष्ट व्यवसायार्थ सजवून सिद्ध केलेले दालन / दुकान / कक्ष / खोली. a.--- एकांतात स्फुरलेला / कल्पिलेला, सुखाकल्पित; अव्यावहारिक.
parlous पार्लस् a.--- भयंकर, घातक, धोकादायक, अडचणीचा, कठिण, अवघड. = Perilous
parochial परोकियल् a.--- ‘Parish’ संबंधी; मर्यादित क्षेत्रासंबंधी, संकुचित आवाक्याचा, अल्पविषय, प्रांतीय / क्षेत्रीय, कूपमंडूकवृत्तीचा, प्रांतीय / क्षेत्रीय / संकुचित वृत्तीचा / दृष्टीचा.
parodical / Parodic पॅरोडिकल् a.--- ‘Parody’ च्या स्वरूपाचा; हास्यरसपूर्ण.
parodist पॅरोडिस्ट् n.--- विडंबनाकार.
parodize पॅरोडाइझ् v.t.--- विडंबन करणे. = To parody
parody पॅरडी n.--- विडंबन, विडंबनात्मक (साहित्य-/संगीत-) रचना. v.t.--- ची नक्कल करून टवाळी करणे. v.i.--- विडंबनात्मक रचना करणे.
parole परोल् n.--- शपथ. अंगीकृत अटी पाळण्याचे वचन / प्रतिज्ञा. (पुनः तुरुंगात परतण्याच्या इ.) अटींवर केलेली कैद्याची (तात्पुरती) सुटका. v.t.--- -ला ‘parol’-वर ठेवणे.
paroxysm परॉक्सिझम् n.--- आवेग, सुवेग, भर, झपाटा, झटका, ताव.
paroxysmal परॉक्सिझ्मल् a.--- ‘Paroxysm’ संबंधीचा / स्वरूपाचा.
parricide पॅरिसाइड् n.--- पितृहत्या / मातृवध करणारा.
parrot पॅरट् n.--- पोपट, राघू, कीर, शुक, धोक्या.
parry पॅरि v.t.--- चुकवणे, टाळणे, वारणे. n.--- चुकविण्याची इ. क्रिया
parse पार्स् v.t.--- शब्दाचे व्याकरण लावणे.
parsimony पार्सिमनि n.--- कृपणपणा, कृपणत्व.
parson पार्सन् n.--- पाद्री, धर्मोपदेशक.
part पार्ट् v.i.--- वाटणे, वेगळा करणे, तुकडे करणे, सोडणे. n.--- भाग, हिस्सा, अंश, अवयव, प्रकरण, पक्ष. For my part --- माझ्याविषयी म्हणाल तर.
partake पार्टेक् v.t.--- वाटा / भाग घेणे / पोचणे.
partaking पार्टेकिंग् n.--- सहभोग, वाटा घेणे.
parterre पार्टेर् n.--- फुलबाग.
partiality पार्शिअॅलिटि n.--- पक्षपात.
partially पार्शलि ad.--- पक्षपात करून, पक्षपाताने.
partible पार्टिबल् a.--- विभाज्य. वाटणी करण्यास पात्र / शक्य.
participate पार्टिसिपेट् v.t.--- वाटा / भाग घेणे / पोचणे.
participle पार्टिसिपल् a.--- कृदन्त, धातुसाधित विशेषण.
particle पार्टिकल् n.--- मूलकण ( electron इत्यादि), कण, अंश, अव्यय (व्याकरणात).
particular पर्टिक्युलर् a.--- विशेष, अमुक, विलक्षण, साद्यन्त. n.--- गोष्ट, प्रकरण, बाबत, कलम.
particularize पर्टिक्युलराइझ् v.t.--- साद्यन्त सांगणे.
particularly पर्टिक्युलर्लि ad.--- असाधारणपणाने, सविस्तर, तपशीलवार.
parting पार्टिंग् n.--- वाटप, वाटणे, विभागणी, सुटणे, वियोग. a.--- जातेवेळचा, प्रास्थानिक, वियोग करणारा, जाणारा.
partisan पार्टिझॅन् n./a.--- पक्षपाती, तरफदार, तरफेचा.
partition पार्टिशन् n.--- विभाग, वाटप, वाटणी, पडदी, पूड, खण, खिसा. v.t.--- विभाग करणे, वियोग करणे, खण पाडणे, आड भिंत घालणे.
partly पार्ट्लि ad.--- अंशतः, काहीसा, थोडासा.
partner पार्ट्नर् n.--- भागीदार, जन्माचा सोबती.
partnership पार्ट्नर्शिप् n.--- सरकत, भागी, पाती.
partridge पार्ट्रिज् n.--- तित्तिरपक्षी, कवडा.
parturition पार्ट्युरिशन् n.--- प्रसूति, प्रसव(-प्रक्रिया).
party पार्टि n.--- टोळी, तुकडी, असामी, पक्ष, पक्षकार, भागीदार.
parvenu पार्व्हन्यू n./a.--- (स्त्री. Parvenue) एकाएकी संपत्ति / प्रतिष्ठा पावलेला पण अज्ञात / सामान्य कुलातील (व्यक्ति).
pas पा n.--- प्राधान्य, अग्रहक्क, श्रेष्ठत्व; नृत्यनाट्यातील एक चरण किंवा चरणमालिका.
pas de deux पा द द n.--- दोघांचे नृत्य, द्वंद्वनृत्य.
pasch पॅस्क् n.--- ईस्टर (Easter) चा दिवस.
paschal पॅस्कल् a.--- ‘Pasch’ संबंधीचा. (eg.--- The paschal mystery, Jesus’ death and resurrection will for ever remain the core of the comprehensive missionary christology.)
pass पास् n.--- खिंड, रस्ता, परवाना, हूल, स्थिति, अवस्था, दशा. v.i.--- जाणे, पसंत पडणे, नाहीसा होणे, मरणे. Pass away--- टळणे, मारणे. Pass by--- जखडून जाणे. Pass of--- नाहीसा होणे.
passable पासेबल् a.--- जाण्याजोगा, कामचलाऊ.
passage पॅसेज् n.--- रस्ता, बोळ, पुस्तकातील स्थळ, वाहनांचे भाडे, जाण्याचा परवाना.
passe पासे / पॅसे a.--- गत, अतीत, उतारास लागलेला, जुनी (गोष्ट), मागे पडलेला, कालबाह्य, जुनाट.
passenger पॅसेन्जर् n.--- उतारू, वाटसरू, येताजाता.
passion पॅशन् n.--- मनोविकार, राग, क्षोभ, प्रेम, वेड, अनावर भावना / भक्ति.
passionate पॅशनेट् a.--- रागीट, छांदिष्ट.
passive पॅसिव्ह् a.--- सोशिक, अचल, निश्चेष्ट. Passive resistance --- अप्रत्यक्ष / अहिंसक प्रतिकार / विरोध. सत्याग्रह.
passport पास्पो(र्)ट् / पॅस्पॉ(र्)ट् n.--- परवाना, दाखला, दस्तक, अनुज्ञा- -पत्र/-मुद्रा, पारपत्र. एखाद्या देशाच्या सरकारने आपल्या नागरिकास दिलेली, छायाचित्रासह त्याची ओळख व नागरिकत्व प्रमाणित करणारी, त्यास परदेशगमनास अनुज्ञा देणारी, त्याच्या सुरक्षित प्रवासाची विनंती / अपेक्षा परदेशसरकारास कालविणारी व त्याच्या परदेशप्रवासाच्या नोंदी ठेवणारी पुस्तिका. पारपत्र.
past पास्ट् a.--- गेलेला, झालेला. n.--- झालेले गोष्ट. prep.--- पुढे, पलीकडे, बाहेर, जवळून, वरून, पुढून. ad.--- जवळून, पलिकडे.
pasta पॅस्ट / पॅस्टा n.--- कालवलेल्या धान्यपिठाचा (शेवया इ. सारखा) खाद्यपदार्थ.
paste पेस्ट् v.t.--- चिकटविणे, चोपणे, ठोकणे, बडविणे. n.--- खळ, चिकटा, चीक, (पाण्यात / द्रवात) मळलेले पीठ / चूर्ण, काळा, रबडा, रेंदा, लगदा. (पहा: ‘Pulp’) (संस्कृत : उद-/जल-/ पेष:)
pastern पॅस्टर्न् n.--- तंगडी, टांग, नेवर, नेऊर.
pasteurise / Pasteurize पाश्चराइझ् v.t.--- -ला उष्णता-संस्काराने निर्जंतुक करणे.
pasteurisation / Pasteurization पाश्चराइझेशन् n.--- उष्णतेने केलेले निर्जंतुकरण.
pastil / Pastille पॅस्टील् n.--- उदबत्ती, उदाचा / धूपाचा शंकु (शंकु-आकाराची वडी) v.t.--- उदबत्तीचा धूर देणे.
pastime पास्टाइम् n.--- करमणूक, खेळ, क्रीडा, कौतुक.
pastor पास्टर् n.--- मेंढपाळ, धर्मोपदेशक, पाद्री, लोकनायक, नेता.
pastoral पास्टरल् a.--- गावठी, धनगरी, मेंढपाळीचा, ग्रामीण, ‘Pastor’ संबंधीचा, आध्यात्मिक / धार्मिक -सेवा-/मार्गदर्शन - विषयक. पौरोहित्यविषयक, शिक्षकाच्या छत्रविकासविषयक, कर्तव्याबद्दलचा.
pasturage पास्चरिज् n.--- कुरण, चारा, गवत. = Pasture.
pasture पाश्चर् n.---गुरचरण ,चारा, गवत, गुरे चारण्याची सरळसोट जागा.