Ras-Rav

Rascal रॅस्कल् n.--- लुच्चा, हरामखोर, सोदा.
Rascality रॅस्कॅलिटि n.--- लुच्चेगिरी, हरामखोरी.
Rase रेस् v.t.--- रद्द करणे, जमीनदोस्त करणे, घसटणे, नाश करणे.
Rash रॅश् a.--- अविचारी, उतावळा, अदूरदर्शी, कच्च्या मसलतीचा. n.--- पुरळ.
Rashly रॅश्ली ad.--- उतावळेपणाने, अविचाराने, घाईने.
Rashness रॅश्नेस् n.--- घाई, उतावळी.
Rasp रॅस्प् v.t.--- किसणे, घासून साफ करणे. अपशब्द बोलणे, डिवचणे, खरखरणे, घर्षण करणे. n.--- किसणी.
Rat रॅट् n.--- उंदीर, घूस. v.i.--- उंदीर पकडणे.
Ratan रॅटन् n.--- वेताची छडी, वेत, वेत्र.
Rate रेट् v.t.--- मोजणे, भाव ठरवणे. n.--- दर, भाव, किंमत, प्रमाणात, धारण, निरख, पट्टी, नेमणूक, प्रत, प्रकार.
Rather रादर् ad.--- कांहींसा, अंमळ, जरासा, कांही.
Ratify रॅटिफाय् v.t.--- मंजूर करणे.
Ratio रेशिओ n.--- उपपत्ति. प्रमाण, मान, परिमाण, दर. दोन संख्यांमधील पटीचा संबंध. = Reason, Rationale.
Ratiocination रॅटिऑसिनेशन् n.--- तर्कशुद्ध -विचार- / -मांडणी -प्रक्रिया. (केवळ) तारकावर आधारलेले स्पष्टीकरण, उपपत्ति.
Ration रॅशन् / रेशन् n.--- शेर, आहार, रतीब,अन्न, कपडा इ. ची नियत / मोजका पुरवठा / निश्चित केलेला वाटा. v.t.--- अन्न वगैरे काटकसरीने वाटणे / वापरणे. शिधासामग्री देणे.
Rational रॅशनल् a.--- तर्कनिष्ठ, तर्काधिष्ठित, सुसंगत, संगतवार. तर्कज्ञ, शहाणा, विचारी, समंजस, संयुक्तिक.
Rational number रॅशनल् नंबर् n.--- दोन पूर्णांकांच्या भागाकाराच्या रूपाने व्यक्त होऊ शकणारी संख्या.
Rationale रॅशनाल् n.--- मूलाधार, तार्किक भूमिका, उपपत्ति.
Rationalism रॅशनलिझम् n.--- प्रत्यक्षप्रमाणाव्यतिरिक्त तर्क / अनुमान यांना ज्ञानप्राप्तीचे स्वतंत्र व सर्वश्रेष्ठ साधन मानणारी निष्ठा. ‘विवेकवाद’.
Rationality रॅशनॅलिटि n.--- तर्कशक्ति, युक्ति, संयुक्तिकता.
Rattle रॅटल् n.--- दणका, खळखळ, फडफडाट. खडखडाट, कोलाहल. खुळखुळा. घरघर. बडबड बडबड. v.i.--- खडखड वाजणे / करणे, खडखडाट उत्पन्न करणे. (घशातून) घरघर काढणे. तोंडाचा तोफखाना सोडणे. v.t.--- हादरविणे, घाबरवून सोडणे. खडखडणे, गोंधळविणे.
Raucity रॉसिटी n.--- कर्कशपणा, घोगरेपणा.
Raucous रॉकस् a.--- घोगरा, कर्कश; खडबडीत.
Raunchy
Ravage रॅव्हेज् v.t.--- उध्वस्त करणे, उच्छेद करणे. नासधूस करणे. n.--- विध्वंस, विनाश. नासधूस.
Rave रेव्ह् n./ a.--- अतिशयोक्तिपूर्ण स्तुति / भलावण करणे. (लेखन इ.ची) अतिशयोक्त प्रशंसेने भरलेली (समीक्षा). n.--- उन्माद, आवेग, क्षोभ, वायु, वेड, खूळ, आवेश, चेव. अशा भावनांच्या धिंगाण्याने व स्वैर खान-पान-संगीत यांनी भरलेले संमेलन / गोष्ठी. (‘Rave party’ असाही प्रयोग). v.i.--- अशा धिंगाण्यात / जल्लोषात रमणे / रंगणे. क्रोधावेशांत भडकून उठणे / अद्वातद्वा निंदणे, आगपाखड करणे. बरळणे, आरडाओरडा करणे.
Ravel रॅव्हल् v.i.--- गुंतणे, गुंतागुंत होणे, उलगडणे. n.--- गुंता.
Raven रेव्हन् n.--- डोमकावळा; काळाभोर / तुकतुकीत काळ्याकुट्ट रंगाचा, सामान्य कावळ्याहून मोठा, कावळ्याच्या जातीचा पक्षी (पहा: Crow) (संस्कृत : द्रोणकाक. कालकंठक). लुटालूट. v.i.--- खाखावणे. a.--- तुकतुकीत / चमकदार काळा.
Ravenous रॅव्हनस् a.--- खाखा मुटलेला.
Ravine रॅव्हिन् n.--- ओहोळ, नाला, दरी, खोरे.
Ravish रॅव्हिश् v.t.--- बलात्काराने स्त्रीसंभोग करणे, फार संतुष्ट करणे, हात मारणे. लुटणे, लुटून फस्त / उध्वस्त करणे. हर्ष / उल्लास / उन्माद यांनी वेढून टाकणे / विवश करणे.
Ravisher रॅव्हिशर् n.--- जुलूम / बळजोरी करणारा.
Ravishing रॅव्हिशिंग् a.--- नितांत सुंदर.