Compl-Con

Complicity कम्प्लिसिटी n.--- (दुष्कृत्यांतील)भागीदारी/साथीदारी.
Compliment कॉम्प्लिमेंट् n.--- स्तुति, आदरवचन, औपचारिक प्रशंसा, अभिनंदन. v.t.--- प्रशंसा करणे.
Comply कम्प्लाय् v.i.--- मान्य करणे, कबूल करणे, पालन/अंमलबजावणी करणे, पाळणूक करणे.
Component कॉम्पोनंट् a.--- घटक.
Comport कॉम्पोर्ट् v.--- (oneself) वागणे, आचरणे. Comport with - -शी सुसंगत असणे, - ला शोभून दिसणे.
Compose कम्पोझ् v.t.--- जुळणे, रचणे, जोडणे, व्यवस्थित करने. शांतवन करणे, संगीतरचना करणे.
Composed कम्पोझ्ड् p.p.a.--- केलेला, बनविलेला, शांत, स्थिर.
Composing कम्पोसिंग् n.--- (छपाई-कामातील) (अक्षर-) खिळ्यांची जुळणी, अक्षरजुळणी.
Composite कॉम्पझिट् a.--- मिश्र, मिश्रित. n.--- मिश्रण.
Composition कॉम्पझिशन् n.--- रचना, जुळणी, ग्रंथ.
Compositor कम्पॉझिटर् n.--- टाइप जुळविणारा, जुळारी.
Composure कम्पोझर् n.--- मनाची शांती, स्वस्थता, शम, मनस्थैर्य.
Compound कॉम्पाउन्ड् n.--- मिसळ, रांधा, रसायन, पारस, आवार, कम्पौंड, समास. अनेक मूलद्रव्ये विशिष्ट प्रमाणात मिसळून बनणारे द्रव्य, ‘संयुग’. a.--- मिसळीचा, विविध, सामासिक. v.t.--- मिसळणे, मिळवणे, अधिक गुंतागुंतीचा/अवघड करणे.
Compounder कॉम्पॉउन्डर् n.--- औषधे एकत्र करणारा.
Comprehend कॉम्प्रिहेन्ड् v.t.--- समावेश करणे, धरणे, आंत घेणे, व्यापणे, समजणे, उमजणे.
Comprehension कॉम्प्रिहेन्शन् n.--- समावेश, आकलनशक्ति, अंतर्भाव, गणती, गणना, समाज, बोध.
Compress कॉम्प्रेस् v.t.--- दडपणे, चेपणे, थोडक्यात आणणे.
Compression कॉम्प्रेशन्
Compressor कॉम्प्रेसर n.--- दाबण्याचे यंत्र/साधन/उपकरण. (विशेषतः) एखाद्या स्थानाचे तापमान नियंत्रित करण्याच्या प्रक्रियेत आवश्यक विशिष्ट वायुद्रव्य दाबून ठेवणारे यंत्र/साधन/उपकरण.
Comprisal कॉम्प्रायझल् n.--- समावेश, अंतर्भाव.
Comprise कॉम्प्राइझ् v.t.--- (स्वतःत)धारण/समाविष्ट/अंतर्भूत करणे. -चे बनलेले असणे. See Comprehend.
Compromise कॉम्प्रमाइझ् n.--- तडजोड. v.t.--- तडजोड करणे. v.i.--- तडजोड करणे, समेत/सलोखा करणे. v.t.--- तडजोड/सौदेबाजी/सौदा करून/तत्वनिष्ठा सोडून (हितसंबंध इ.) ला धोक्यात आणणे, -चे अवमूलन व बेअदबी.
Comptroller कॉम्ट्रोलर् n.--- हिशेब तपासणारा.
Compulsion कम्पल्शन् n.--- जबरी, जुलूम, बलात्कार, जबरदस्ती, दडपण.
Compulsive कम्पल्सिव्ह् a.--- बळजबरीचा , जुलमाचा, जबरीचा.
Compulsory कम्पल्सरी a.--- जुलुमाचा, अवश्य, आवश्यक, अटळ, अविकल्प, बंधनकारक, अनिवार्य.
Compunction कम्पंक्शन् n.--- टोंचणी, हुरहूर, पस्तावा, अनुताप.
Compunctive कम्पंक्टिव्ह् a.--- मनस्तापकारक.
Compute काँप्यूट् v.t.--- गणणे, मोजणे.
Computer कम्प्यूटर् n.--- संगणक. नोंद, संकलन, वर्गीकरण, विश्लेषण, गणन, हव्या त्या रंगरूपात उपलब्धीकरण/सादरीकरण इत्यादि प्रक्रियाद्वारा, सर्वप्रकारच्या ज्ञानाची/माहितीची व्यवस्था लावून देणारे विद्युतशक्तीने वेगांत चालणारे यंत्र.
Comrade कॉम्रेड् n.--- सोबती, साठी, सलगी.
Con कॉन् v.t.---(past participle/past tense- conned. ad.-- conning) (जहाज इ.) चालविणे, -चे मार्गदर्शन करणे, संचालन करणे, मन वळविणे, मनधरणी करणे, चुचकारणे, बोटांनी टकटक करणे/वाजवणे/मारणे. घोकणे, शिकणे, संथा देणे, फसविणे, ठगविणे, लुबाडणे, चकवणे. n.--- दिग्दर्शन, सनचालन. फसवणूक, लबाडी, गुन्हेगार, अपराधी, विरोधी मताचा, विरोधक. विरोधाची भूमिका/मत.
Conation कोनेशन् n.--- इच्छा, संकल्प.
Conative कोनेटिव्ह् a.--- संकल्पविषयक, संकल्पनात्मक.