Coma-Comm

Coma कोमा n.--- झोप, झापड, बेशुद्धपणा, मूर्च्छा, गुंगी.
Comatose कोमटोस् a.--- सुस्त, गुंगलेला, गुंग, अचेतन.
Comb कोम् n.--- कंगवा, फणी. v.t.--- विंचरणे, पिंजणे.
Combat कॉम्बट् n.--- लढाई, कुस्ती, द्वन्द्व. v.t.--- झुंझणे.
Combatant कॉम्बटन्ट् n.--- लढाई/कुस्ती करणारा.
Combination कॉम्बिनेशन् n.--- कट, जूट, संमेलन, संयोग, जोडणे.
Combine कम्बाइन् v.t.--- एकत्र करणे, मिळविणे.
Combo कॉम्बो n.--- छोटा वाद्य-/वादक-वृंद; मिश्रण, मेळ. (Ex. How about a nimbu-paani and idli-meal combo?)
Combustible कॉम्बस्टिबल् a.--- जळण्यासारखा, पेट घेणारा.
Combustion कॉम्बश्चन् n.---जळणे, दहन.
Come कम् v.i.--- येणे, उपजणे, पावणे, पोचणे, दिसणे, जवळ येणे, उत्पन्न होणे. ‘come into’ --- -चा मालक होणे, प्राप्त करणे. ‘come apart’--- मोडणे, मोडून जाणे, (उद्)ध्वस्त होणे.
Come-uppance कमपन्स् n.--- (अपराधाबद्दल आवश्यक) कानउघाडणी/निर्भत्सना, शिक्षा, थप्पड.
Comedy कॉमेडी n.--- हास्यस्सप्रधान नाटक.
Comeliness कम्लिनेस् n.--- लावण्य, सुरेखपणा.
Comely कम्लि a.--- सुरेख, सुबक, लायक, अनुकूल.
Comet कॉमॆट् n.--- शेंडे नक्षत्र, धूमकेतु.
Comfit कॉम्फिट् n.--- कोरडा मुरंबा, कोरडी बर्फी.
Comfort कम्फर्ट् n.--- आनंद, आराम, सुख. v.t.--- आराम देणे, धीर देणे, शांतवन करणे.
Comfortable कम्फर्टेबल् a.--- सोयीचा, स्वस्थ, सुखी, सुखद, आरामाचा, आरामशीर.
Comfortless कम्फर्टलेस् a.--- असमाधानी, गैरसोईचे, अस्वस्थ, असुखी.
Comic(al) कॉमिक् a.--- हास्यस्सप्रधान, हास्यस्सप्रवण, हास्यजनक.
Comintern कॉमिन्टर्न् n.--- ‘U.S.S.R.’ मधील आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट पक्ष. (Communist International
Comity कॉमिटी n.---परस्परादर, सभ्यता, पारार्थदक्ष सहजीवन. ‘Comity of nations’ : प्रत्येकाच्या स्वतन्त्रतेस / सार्वभौमतेस बाधा न आणता राष्ट्रांनी ठेवलेले परस्पर सहकार्याचे/आदराचे संबंध. अशा राष्ट्रांचा समूह, राष्ट्रसंघ.
Comma कॉमा n.--- स्वल्पविरामचिन्ह (,).
Command कमान्ड् n.--- आज्ञा, हुकूम, तैनात, तसलमात, वजन, अधिकार, अधिकार चालविण्याचे सामर्थ्य. v.t.--- आज्ञा/हुकूम करणे, अधिकार चालविणे, आटोक्यात ठेवणे.
Commandant कमान्डन्ट् n.--- आज्ञा करणारा.
Commandeer कॉमण्डीअर् v.t.--- -ला बळजबरीने हुकमतीत आणणे/ताब्यात घेणे.
Commander कमॉन्डर् n.--- सैन्याचा अधिपति.
Commandment कमान्ड्मेन्ट् n.--- आज्ञा, हुकूम.
Commando कमाण्डो n.--- गुपचुप/अचानक छापे मारणारी सैनिकांची तुकडी. अशा तुकडीतील सैनिक.
Commemorable कॉमेमरेबल् a.----चा उत्सव करणे, साजरा करणे, सन्मानित करणे.
Commemorate कमेमरेट् v.t.--- -चे (औपचारिकपणे/विधीपूर्वक) स्मरण करणे.
Commemoration कॉमेमोरेशन् n.--- उत्सव, स्मारकोत्सव.
Commence कमेन्स् v.t.--- आरंभ/सुरवात करणे. v.t.--- आरंभ/सुरवात होणे, उत्पन्न होणे.
Commencement n.--- आरंभ, सुरवात.
Commend कॉमेन्ड् v.t.--- प्रशंसा/तारीफ/शिफारस करणे, सोपविणे.
Commensurable कमेन्शुरेबल् a.--- सारख्या परिणामाचा/मापाचा, भाज्या, समतोल.
Commonality कॉमनॅलिटी n.--- परस्परहितसंबंधसाम्य. गुण, स्थिति, मत, इ. मधील साधारणत्व/समानता/ऐक्य. ऐकमत्य, एकरूपता.
Comment कॉमेन्ट् v.i.--- टीका/भाष्य करणे.
Commentariate कॉमेण्टेरिएट् n.--- (वृत्तपत्रिया) टीकाकार-लोक/भाष्यकार, टीकाजगत्.
Commentary कॉमेन्टरी n.--- टीका, व्याख्या.
Commenter कॉमेन्टर् n.--- टीका करणारा, भाष्यकर्ता.
Commerce कॉमर्स् n.--- देणे घेणे, व्यापार, व्यवहार, दळणवळण.
Commercial कॉमर्शिअल् a.--- व्यापारासंबंधी, व्यवहाराचा, उदीमाचा.
Commination कॉमिनेशन् n.--- धमकी, दपटशा.
Commiserate (with) कॉमिझरेट् / कमिझरेट् v.t.--- दया करणे, कीव करणे.
Commissariat कॉमिसेरिअॅट् v.t.--- मोदीखाना.
Commissary कॉमिसरि n.--- कोठीवाला, मोदी.
Commission कमिशन् n.--- दलाली, सनद, एखादे काम करण्यासाठी नेमलेली मंडळी, दस्तुरी, अडत, कृत्य (वाईट अर्थी).
Commissioner कमिशनर् n.--- भागाचा अधिकारी, पंच, मुनीम.
Commit कमिट् v.t.--- करणे, हवालणे, वरच्या कोर्टात पाठविणे.
Commitment कमिट्मेन्ट् n.--- बंदीत टाकणे.
Committee कमिटी n.--- पंच, पंचायत, पंचमंडळी.
Commodius कॉमोडिअस् a.--- सोयीचा, सुखाचा.
Commodity कमॉडिटी n.--- सौदा, जिन्नस, माल.
Commodity exchange कमॉडिटी एक्श्चेन्ज् n.--- वायदेबाजार (पहा: forward market/trading).
Commodore कॉमडोअ(र्) n.--- नौसेनेतील एक (अधिकार-पद (‘captain’ च्या वरचे व ‘Rear Admiral’ च्या खालचे). व्यापारी-नौका-व्यवसायांतील अशाच प्रकारचे जलमार्ग-वाहतूक-पद(-नाम).
Common कॉमन् a.--- साधारण, सामान्य, सार्वजनिक, रूढीतील, ओंगळ, नित्याचा, सामाईक. n.--- जमीन, गायरान.
Commonalty कॉमनॅल्टि n.--- साधारण-सामान्य लोक.
Commonly कॉमन्लि ad.--- प्रायः, बहुतकरून.
Commonplace कॉमन्प्लेस् a.--- साधारण, सामान्य, गचाळ, गबाळ.
Commons कॉमन्स् n.--- साधारण-सामान्य लोक.
Commonsense कॉमन्सेन्स् n.--- सर्वसामान्य बुद्धि, साधी अक्कल, व्यावहारिक शाहाणपणा.
Commonwealth कॉमन्वेल्थ् n.--- लोकसत्ताक राज्य.
Commotion कॉमोशन् n.--- खळबळ, बडाळी, संताप.
Communicable कम्यूनिकबल् a.--- (रोग इ.) पसरणारा/होणारा.
Communicate कॉम्युनिकेट् v.t.---अर्पण करणे, कळवणे, बातमी देणे. v.i.--- रस्ता असणे.
Communication कॉम्युनिकेशन् n.--- दळणवळण, बातमी, संभाषण, खुला रस्ता.
Communicative कॉम्युनिकेटिव्ह् a.--- बोलका, मोकळ्या मनाचा.
Communion कम्यूनियन् / कॉम्यूनियन् n.--- दळणवळण, संसर्ग, घनिष्ठ संबंध, दात जवळीक; क्राइस्ट (येशुख्रिस्त) चा देह व रक्त यांचे प्रतीक म्हणून पाव व मद्य यांच्या नैवेद्याचे ग्रहण/सेवन करण्याचा प्रॉटेस्टंट ख्रिश्चन पंथातील एक धार्मिक विधि. (ख्रिश्चन धर्मियांतील) एखादा विशिष्ट पंथ/संप्रदाय.
Communism कॉम्यूनिझम् n.--- समाजाच्या सर्व साधनसंपत्तीवर समाजाची (म्हणजे शासनाची) मालकी आणि शासन-यंत्रणेवर कामगारांचे पूर्ण नियंत्रण मुख्यत्वे प्रतिपादणारे समाजव्यवस्थेचे तत्वज्ञान, समाज(सत्ता)वाद.
Communist कॉम्यूनिस्ट् n… ‘Communism’ चा पुरस्कर्ता. a.--- ‘ Communism’ चा विषयक/-स्वरूपाचा.
Communistic कॉम्यूनिस्टिक् a.--- = Communist.
Community कॉम्युनिटि n.--- सामाईक सत्ता, समाज.
Commutation कॉम्युटेशन् n.--- बदलाने, मोबदला.
Commute कॉम्यूट् v.t.--- अदलाबदल करणे.