dou-dra

doubtful डाउटफुल् a.--- संशयी, संशयखोर.
doubtless डाउटलेस् ad.--- निःसंशय, निश्चयपूर्वक.
douceur डुसोर् (फ्रेंच)n.--- इनाम, बक्षीस; लाच.
douche डूश् n.--- शरीरेन्द्रियास (विशेषतः विवरस्वरूपाच्या) फवारण्याची प्रक्रिया. अशा प्रक्रियेचे उपकरण.
dough डो n.--- मळलेली कणीक, पीठ.
doughty डाउटी a.--- मर्द, समशेरबहाद्दर, शूर.
dour डूर् a.--- कठोर, कडक, उग्र.
douse डाउस् v.t.--- (पाण्यांत इ.) बुचकळने. (पाण्याने इ.) ओतणे. विझविणे, शांत करणे, शमविणे. (It is tartrom certain that P.M.’s statement will douse the political storm set off by WikiLeak’s cable disclosures) v.i.--- (पाण्यात इ.)बुडणे, भिजून जाणे.
dove डव्ह् n.--- खबूतर. मवाळ मताचा (माणूस). पहा: ‘Hawk’
dovecote डव्हकोट् n.--- खबूतरखाना, खुराडे.
dovetail डव्हटेल् n.--- कळासी, चाळा.
dowdy डाउडी n.--- खराब पोशाख केलेली स्त्री.
dover, Dowry डॉवर्, डॉवरि n.--- अंदण, स्त्रीधन.
dowager डाउएजर् n.--- (संपत्तीचा/अधिकाराचा) वारसा भोगणारी विधवा, श्रीमंत विधवा वारस.
down डाउन् prep.--- खाली, पालथा. a.--- मोठ्या शहरापासून दूर जाणारा. N.--- उंचावरील वृक्षहीन कुरण-प्रदेश
downcast डाउनकास्ट् a.--- अधोवदन, खिन्न.
downfall डाउनफॉल् n.--- स्थानभ्रष्ट, अधःपात.
downpour डाउन्पोअर् n.--- मुसळधार.
downright डाउन्राइट a.---धोपट, नीट. Ad.--- स्पष्ट.
downstairs डाउन्स्टेअ(र्)झ् ad.--- खालील मजल्या-वर/-कडे a.--- खालच्या/तळच्या मजल्यावरील. n.--- खालचा मजला, तळमजला.
downtrodden डाउन्ट्रॉडन् a.--- लाथाडलेला, पददलित, दलित, सत्तेत असलेल्या लोकांकडून दडपला गेलेला, उत्पीडित.
downward डाउन्बर्ड् ad.--- खाली. A.--- खालचा.
downy डाउनि a.--- मऊ, लंवेचा, लोकरीचा.
dowry डाउरी n.--- स्त्रीधन.
dowse डाउझ् v.--- विशिष्ट दंडाच्या सहाय्याने भूमिगत पाणी/खनिजांचे अनुमान करणे.
dowser डाउझर् n.--- जमिनीखालील पाणी वगैरे वरूनच जाणण्याची शक्ति असणारा.
doyen डॉयन् n.--- (स्त्री. doyenne) ज्येष्ठ व्यक्ति, मान्यवर, मातबर मनुष्य.
doze डोझ् v.i.--- डुलकी घेणे. n.--- डुलकी.
dozen डझन् n.--- बारा.
drab ड्रॅब् a.--- फिका, मंद (रंग); बेरंग, रटाळ, कंटाळवाणा, अनाकर्षक.
draconic ड्रेकॉनिक् a.--- = Draconian ; कडक, जबर, क्रूर, कठोर.
draff ड्राफ् n.--- गाळ, मळी, गदळ.
draft ड्रॅफ्ट् n.--- हुंडी, चिठ्ठी, मसुदा, कच्चे टिपण.
drag ड्रॅग् n.--- ओढणे, गळ, जाळे, मागे ओढणारी बाधा/अडथळा/ओझे. (ओढणारी / रोखणारी) बाधा, अडथळा, ओझे. (उदा: पहा ‘grind’ (n)). v.t.--- जमिनीवरून ओढणे / रडतखडत जाणे, रखडणे.
draggle ड्रॅगल् v.t. and v.i.---लोळणे, लोळून मळवणे.
dragon ड्रॅगन् n.--- (पुराणकथांतील) सरपटत चालणारा, पंख, नखांचे पंजे, लांब जबडा, इ. असलेला, आग ओकणारा राक्षसी प्राणी.
dragonade = dragonnade=dragoonade ड्रॅगनेड् n.--- (अनेकवाचनात) (फेंच राजा १४ वा लुई याने प्रॉटेस्टंट् पंथीयांवर केलेले) सशस्त्र अत्याचार.