vil-vir

vile व्हाइल् a.--- वाईट, ओंगळ, द्वाड, नीच, अधर्म.
vilification व्हिलफिकेशन् n.--- निंदा, बेअब्रू, नालस्ती, शिवयागाळी.
vilify व्हिलिफाय् v.t.--- बट्टा लावणे, कुचाळी करणे. -ची नालस्ती / बेअब्रू करणे, निंदणे.
villa व्हिला n.--- शेत / मळा यातील बंगला.
village व्हिलेज् n.--- गांव, खेडे. a.--- खेडेगांवचा, गावठी.
villain व्हिलन् n.--- लबाड, सोदा, दुष्ट, चांडाळ.
villainous व्हिलनस् a.--- लबाडीचा, अति नीच, अधम, हलका, नादान.
villainy व्हिलनि n.--- पाजीपणा, नीचपणा.
vim व्हिम् n.--- जोर, उत्साह.
vindicate व्हिन्डिकेट् v.t.--- सूड उगवणे, स्थापणे, पटवून देणे, दावा सांगणे, पुरवणी करणे, एखाद्या व्यक्तीची निर्दोषता सिद्ध करणे, समर्थन करणे.
vindictive व्हिन्डिक्टिव्ह् a.--- सूड उगवण्याचा.
vine व्हाइन् n.--- (द्राक्षाचा) वेल / लता. Vine yard --- द्राक्षांचा मळा.
vint व्हिण्ट् n.--- पत्त्यांचा एक रशियन खेळ. (रशियन भाषेंत = ‘Screw’).
vintage व्हिंटिज् n.--- जुनी / मुरलेली उंची दारू. द्राक्षांचा / द्राक्षांची दारू करण्याचा धंदा /हंगाम. समकालीन समानधर्मीयांचा समूह. a.--- प्राचीन / मुरलेल्या उंची प्रतीचा, ज्येष्ठ दर्जाचा. इ. स. १९१७-१९३० या काळांत बनलेली (मोटरगाडी).
vintner व्हिण्ट्नर् n.--- दारूचा व्यापारी, मद्यविक्रेता.
violable व्हायोलेबल् a.--- मोडण्याजोगा.
violate व्हायोलेट् v.t.--- मोडणे, बळजबरी करणे.
violation व्हायोलेशन् n.--- बलात्कार, मोडणे, जुलूम.
violence व्हायोलेन्स् n.--- जोर, आवेश, बलात्कार.
violent व्हायोलेन्ट् a.--- जोराचा, आवेशाचा.
violin व्हायलिन् n.--- धनुकली (bow) ने व हाताच्या बोटांनी तारा छेडून वाजवावयाचे, सारंगी या भारतीय वाद्याशी अत्यंत साम्य असलेले, एक युरोपीय तंतुवाद्य.
virago व्हिरागो / व्हिरेगो n.--- कृत्या, कर्कशा, मर्दानी बायको. जहांबाज बाई.
vires व्हायरीज् n.--- वैधता, कायदेशीरपणा, संवैधानिकता. (eg.--- Certain Societies challenged the vires of the said rule and the operation of the same was stayed by the High Court.)
virgin व्हर्जिन् n.--- कुमारी, कुवांर. ब्रह्मचारी, ब्रह्मचारिणी.
virginity व्हर्जिनिटी n.--- कौमार्य.
Virgo व्हर्गो n.--- कन्या राशी.
virile व्हिराइल् a.--- पौरुषयुक्त, वीर्यशाली, पुरुषी (वागणूक / वेष). जोमदार, कणखर, भक्कम.
virility व्हिरिलिटी n.--- पुरुषत्व, चेतना, वीर्यशालिता.
virtual व्हर्च्युअल् a.--- खऱ्यासारखा पण वस्तुरूपाने न दिसणारा / जाणवणारा / असणारा. सत्यकल्प व्यावहारिक.
virtually व्हर्च्युअली ad.--- जवळजवळ पूर्णतया. व्यावहारिकतया.
virtue व्हर्चू n.--- सद्गुण, नेकी, गुण, तेज.
virtuous व्हर्चुअस् a.--- सद्गुणी, नेकीचा, सदाभिरुचिपूर्ण, पतिव्रता.
virtuosic व्ह(र्)च्युअॅसिक् = Virtuoso (a.)
virtuosity व्ह(र्)च्युआॅसिटी n.--- रसिकता, मर्मज्ञता, रसज्ञता, कलाविज्ञता, चोखंदळपणा. चातुर्य, कुशलता, प्रावीण्य.
virtuoso व्ह(र्)च्युओझो n.--- चोखंदळ / रसज्ञ / रसिक / मर्मज्ञ / अभिज्ञ (व्यक्ति).
virtuous
virulence व्हिरू(ऱ्यु)लन्स् n.--- (रोग इ. च्या) आघाताची तीव्रता / जोर / झपाटा. (शब्द, विचार, भाव, इ. मधील) जळजळीतपणा, तिडीक, कटुता, चीड.
virulency व्हिरू(ऱ्यु)लन्सी
virulent व्हिरू(ऱ्यु)लन्ट् a.--- कडक, जलाल, जालीम, तीव्र. विषारी, जळजळीत, कटुतापूर्ण, उग्र, द्वेषपूर्ण.