Sly-Smo

Sly स्लाय् a.--- धोकेबाज, कावेबाज, मतलबी, धूर्त, लबाड. On the sly --- गुपचुप, गुप्तपणे.
Slyness स्लाय्नेस् n.--- कावेबाजपणा, लपंडाव, मतलब.
Slyly स्लाय्लि ad.--- धूर्तपणाने.
Small स्मॉल् a.--- लहान, हलका, थोडा .
Smallness स्मॉल्नेस् n.--- लहानपणा.
Smallpox स्मॉल्पॉक्स् n.--- देवी (अंगच्या).
Smack स्मॅक्
Smarmy स्मार्मी a.--- खुशामतप्रयण. ऐटबाज. (वरवर) मृदुभाव दाखविणारा. साळसूदपणाचा आव आणणारा.
Smart स्मार्ट् v.i.--- दुखणे, चुरचुरणे, शिक्षा पावणे. a.--- चपळ, चुणचुणीत, हुशार, चतुर, चलाख, सावध. नीटनेटका, सुडौल, सुरेख. (प्रहार, शब्द इ.) कडक, तिखट सणसणीत, आवेशपूर्ण, लागट, धारदार. n.--- तीव्र वेदना / दुःख. v.i.--- दुखणे, सलणे. दुःखित / पीडित होणे, पीडा / यातना / शिक्षा भोगणे. v.t.--- -ला दुःख देणे, छळणे.
Smarten (up) v.t.--- नीटनेटका / ठीकठाक करणे.
Smatter स्मॅटर् v.i.--- (of) -चे वरवरचे / कच्चे उथळ ज्ञान असणे / बाळगणे. (in) (उथळपणे) -मध्ये लुडबुडणे. v.t.--- (विशिष्ट भाषा इ.) अर्धवटपणे / अजाणतेपणे बोलणे.
Smattering स्मॅटरिंग् n.--- उथळ / अर्धकच्चे ज्ञान. अशा ज्ञानाचे प्रदर्शन / अभिव्यक्ति.
Smear स्मिअर् v.t.--- सारवणे, लिंपणे, माखणे, चोपडणे, डागाळणे; कलंकित करणे. (with) --- (घाण टाकून) मालिन करणे. कलंकित करणे; मालिनीकरण, बेअब्रू. वास घेणे; वास सोडणे, घणणे. सुगावा, चाहूल इ. द्वारा जाणणे. (past tense / past participle - Smelt / Smelled) n.--- डाग.
Smell स्मेल् v.t.--- वास घेणे / मारणे / येणे. n.--- वास, सुगावा, संशय, चाहूल.
Smelt स्मेल्ट् v.t.--- धातूचा रस करणे, गाळणे.
Smelter स्मेल्टर् n.--- धातू गाळण्याचा कारखाना.
Smile स्माइल् v.i.--- गालांत हासणे, सुप्रसन्न होणे. n.--- गालांतले हसू, कृपावलोकन, कृपा.
Smirk स्मर्क् n.--- (सहेतुक) स्मित(-युक्त-)-दृष्टि(-क्षेप) v.--- असे स्मित करणे / करीत बोलणे. a.--- नीटनेटका.
Smite स्माइट् v.t.--- स्माइट हणणे, तडाखा देणे, प्रहार करणे, - वर घाव घालणे. असे करून ठार करणे, जबर जखमी / घायाळ करणे. तीव्र आहत / प्रभावित करणे. - ला तीव्रपणे आकर्षित करणे. (past tense - Smote; past participle - Smitten / Smote)
Smith स्मिथ् n.--- लोहकाम करणारा, लोहार. v.t.-- घडणे.
Smithers स्मिदर्स् = Smithereens.
Smithereens स्मिदरीन्ज् n.--- चिंधड्या, तुकडे, चुराडा, बाजूस, चूर्ण. (Knock, Blow etc. to smithereens --- चिंधड्या उडविणे. Go etc to smithereens --- चुराडा होणे.
Smog स्मॉग् (formed by combining ‘smoke’ and ‘fog’) धूर व धुके यांनी दूषित / भरलेले वातावरण. धुरकट धुके, धुरके.
Smoke स्मोक् v.i.--- धूर निघणे, धुमसणे, संतापणे, विडी ओढणे, धुरी देणे. n.--- धूर, धुरी.
Smoking स्मोकिंग् n.--- धूम्रपान, हुक्का पिणे.
Smooch स्मूच् v.--- चुंबिणे, कुरवाळणे. n.--- मुका, चुंबन, कुरवाळण्याची क्रिया.
Smote = Smitten
Smooth स्मूथ् a.--- गुळगुळीत, तुळतुळीत, मऊ, संथ, साफ, सुरळीत, सपाट, गोडीगुलाबीचा. ad.--- सुरळीत, संथ. v.t.--- गुळगुळीत करणे, सपाट करणे. v.i.--- आर्जव करणे.
Smoothness स्मूथ्नेस् n.--- गुळगुळीतपणा, सफाई.
Smoothtongued स्मूथ्टंग्ड् n.--- गोडबोत्या.
Smother स्मदर् v.t.--- दम कोंडून मारणे, गुदमरणे.
Smoulder स्मोल्डर् v.i.--- धुमसणे. (असंतोष इ. चे) दडपणाखाली राहणे.