D-Dar

D.C. डी.सी. n.--- ‘Direct Current’ चे संक्षिप्त रूप.
D-Day डी-डे n.--- महत्वाच्या नियोजित कामाचा/कार्यारंभाचा दिवस, मुहूर्तदिन.
Da capo द कापो (इटॅलियन भाषेंतील) = ‘from the beginning’, प्रारंभापासून.
Dab डॅब् v.t.--- थोपटणे. n.--- थाप, लगदा, हलका स्पर्श.
Dabble डॅबल् v.t. and v.i.---पाण्यात डुबकणे, राड खेळणे, डुंबणे, वरवर काम करणे, लुडबुडणे, डुंबणे, पाण्यांत खेळणे, पाणी इ. मध्ये फडफडणे, -ला शिंपिणे / मार्जन करणे, कोणत्याही गोष्टीत हात घालणे. ‘Dabble in/at’ v.--- -मध्ये लुडबूड करणे, मध्ये जरा लक्ष घालणे, थोडा रस घेणे.
Dabster डॅब्स्टर् n.--- फरडा, वस्ताद, पटाईत.
Dacoit डकॉइट् n.--- दरोडेखोर.
Dado डेडो n.--- वेगळ्या प्रकारचा गिलावा/रंगकाम वगैरे केलेला भिंतीचा खालचा भाग.
Dagger डॅगर् n.--- जंबिया, कट्यार, खंजीर, बिचवा.
Daily डेलि a.--- रोजचा, नेहमीचा. ad.--- दररोज.
Dainty डेन्टि a.--- गोड, रुचकर, स्वादिष्ट, सुकुमार, चोखंदळ, (खाद्य) उंची, उत्कृष्ट मृदु प्रकृति, मृदुस्वभाव. n.--- सुग्रास मिष्टान्न, रुचकर खाद्यपदार्थ. Daintily : हलकेच, हळुवारपणे.
Dairy डेरि n.--- दुभत्याची खोली, दुभते, ताकपाणी.
Dale डेल् n.--- दरी, खोरे, लवण.
Dalliance डॅलिअन्स् n.--- विषयक्रीडा, विलास, अळम् टळम्, खेळ.
Dally डॅलि v.t.--- and v.i.--- रमणे, विलास करणे, विलंब लावणे, गमणे,अळम् टळम् करणे.
Dam डॅम् n.--- जनावराची आई, बांध, धरण, पूल.
Damage डॅमेज् n.--- नुकसान, नाश, खराबी, नुकसानीचा पैसा. v.t.--- नासणे, खराब करणे.
Damaged डॅमेज्ड् p.p.a.--- नासलेला, खराब केलेला.
Damask डॅमॅस्क् n.--- एक प्रकारचे (रेशमी) कापड, धुमाश.
Dame डेम् n.--- घरधनीण, बाईसाहेब/ताईसाहेब, वयस्क बाई.
Damn डॅम् v.t.--- नरकांत घालणे, दोष ठेवणे, नापसंत करणे, धिक्कार करणे.
Damnable डॅम्नेबल् a.--- तिरस्करणीय, द्वेष्य, अप्रिय.
Damp डॅम्प् a.--- ओलसर, सर्द, दमट. n.--- सर्द हवा, सर्दी, खिन्नता. v.t.--- ओलसर करणे, धैर्य खचवणे.
Dampness डॅम्प्नेस् n.--- ओलावा, सरदी, ओल.
Damsel डॅम्सेल् n.--- तरुणी, मुलगी, युवती.
Dance डॅन्स् v.t. and v.i.--- नाचणे, नृत्य करणे. n.--- नाच.
Dancing-girl डॅन्सिंग् गर्ल् n.---
Dandle डॅन्डल् v.t.--- जोजविणे; (लहान मुलांना) डोलाविणे, खालीवर करणे, कौतुक करणे.
Dandruff डँड्रफ् n.--- डोक्याच्या पृष्ठभागावर उठणारा कोंडा/खवला/पापुद्रा.
Dandy डँडी n.--- पोषाख/वागणूक यात अति नखरा करणारा, चंगीभंगी, नखरेल, नखरेबाज.
Danger डेन्जर् n.--- भय, धोका, जोखीम, अपकार.
Dangerous डेन्जरस् a.--- धोक्याचा, प्राणसंकटाचा.
Dangle डँगल् v.t.--- and v.i.--- लतकणे, झोले खाणे, पाठ पुरविणे, कासोटा धरणे, लटकत राहणे, लोंबणे.
Dank डँक् a.--- ओला, ओलसर.
Danseuse डांसोज् n.--- नृत्यांगना.
Dapper डॅपर् a.--- नीटनेटका.
Dapple डॅपल् a.--- पंचरंगी, बांडा, अबलक, चित्रवर्णी, ठिपकेदार.
Dare डेअर् v.t. and v.i.--- धजणे, धैर्य असणे, ईर्षेस घालणे, -ला (एखादी गोष्ट करण्यास)आव्हान देणे, -ला तोंड देणे, -ला न जुमानणे.