cam-can

camail कॅमेल् n.--- ख्रिश्चन भटजीने डोक्यावर पांघरायचे आवरण / टोपडे.
camaraderie कामारादरी / कॅमरॅदरी n.--- मित्रभाव, बंधुभाव, मैत्री, संघटनेवरील निष्ठा.
cambric कॅम्ब्रिक् n.--- तलम तागाचे कापड.
camel कॅमल् n.--- उंट, सांड.
camel-driver कॅमल् ड्रायव्हर् n.--- सारवान.
camelopard / Kamelopard कॅमेलोपर्ड् n.--- जिराफ (giraffe).
cameo कॅमियो n.--- कोर्रेव काम केलेली वस्तू/चित्र/मूर्ति.
camera कॅमेरा n.--- फोटोग्राफ काढण्याचे यंत्र, छायाचित्रक.
camouflage कॅम(मू)फ्लाज्n.--- आसमंदाशी बेमालूमपणे मिसळून जाणारे गुप्ततेसाठी घेतलेले/घातलेले आवरण. v.t.--- -ला अशा रीतीने झाकणे/लपविणे.
camp कॅम्प् n.--- छावणी, फौजेचा तळ, तात्पुरते घर/खोपट.
campaign कॅम्पेन् n.--- पटांगण, मोहीम, स्वारी.
camp follower कॅम्प फाॅलोअर् n.--- बाजारबुणगे.
camphor कॅम्फर् n.--- कापूर.
camphorate कॅम्फोरेट् a.--- कापुराचा, कर्पूरयुक्त.
can कॅन् n.--- (दारूचा) पेला. v.i.--- शकणे, समर्थ असणे.
canal कनॅल् n.--- कालवा, नदीचा पाट, नळ.
canard कनार् / कनार्ड् n.--- भुमका, अफवा, हूल.
cancel कॅन्सल् v.t.--- रद्द करणे, फांटा देणे, निरस्त/निरावृत्त करणे. -चे खंडन करणे.
cancellation कॅन्सलेशन् n.--- रद्द करण्याची/झाल्याची/होण्याची प्रक्रिया/स्थिति. निरसन, निराकरण, विलोपन, निवर्तन, खंडन.
cancer कॅन्सर् n.--- चाळणपुळी, खेंकडा, कर्क रास, कर्क रोग, दुष्टार्बुद. (विशिष्ट शरीरपेशींची व शरीरास प्राणघातक होऊ शकणारी वाढ -हे मुख्य लक्षण). (आधुनिक पाश्चात्य वैद्याकांत १८ व्या शतका अखेरीस प्रथम ग्रंथबद्ध/लेखबद्ध) (याचा एक विशिष्ट प्रकार - पहा: Leukemia)
candid कॅन्डिड् a.--- मोकळ्या मनाचा, निष्कपटी, प्रांजळ.
candied कॅन्डीड् past participle.--- पाकवलेला, साखरेत घोळलेला. candied sugar = खडीसाखर.
candidacy कॅन्डिडसी n.--- उमेदवारी, प्रत्याशिता.
candidate कॅन्डिडेट् n.--- उमेदवार, प्रार्थी, अभ्यार्ठी, परीक्षार्थी.
candidature कॅन्डिडचर् n.--- उमेदवारी, प्रत्याशिता.
candle कॅन्डल् n.--- मेणबत्ती, मेणवात.
candle-stick कॅन्डल् - स्टिक् n.--- मेणबत्तीची बैठक/घर.
candour कॅन्डर् n.--- मनाचा मोकळेपणा.
candy कॅन्डी n.--- खडीसाखर. v.i.--- पाकावीणे.
candyfloss कॅन्डीफ्लाॅस् n.--- फुलविलेल्या साखरेच्या तंतुमय पुञ्जक्याचा एक खाद्यपदार्थ, ‘बुढ्ढी के बाल’.
cane केन् n.--- वेताची छडी, चमकी. v.t.--- छडीने मारणे.
canine कॅनाइन् a.--- कुत्र्याचा, कुत्र्याच्या गुणांचा.
canine-teeth कॅनाइन् - टीथ् n.--- सुळे दात.
canister कॅनिस्टर् n.--- वेताची टोपली/करंडा/डबा.
canker कॅन्कर् n.--- झाडाची कीड, दातांची कीड, कीड.
cankerworm कॅन्कर्वर्म् n.--- झाडपाने खाणारा किडा.
cannabis कॅनबिस् n.--- एक वनस्पतिज धूम्रपान द्वारा सेविले जाणारे मादक द्रव्य.
cannibal कॅनिबल् n.--- नरमांस खाणारा, मनुष्यभक्षक, स्वजातिभक्षक.
cannibalean कॅनिबॅलियन् a.--- = Cannibalic.
cannibalic a.--- Cannibal संबंधी, cannibal च्या लक्षणाचा.
cannibalish a.--- Cannibalism कडे झुकणारा.
cannibalism n.--- स्वजातीयमांसभक्षणाची / नरभक्षणाची चाल/ रीत.
cannibalistic a.--- Cannibalism शी आसक्त/संबद्ध.
cannibally = Cannibal च्या रीतीने.
cannibaliz(s)e कॅनिबलाइझ् v.t.--- एखादी यंत्र रचना भंगून तिचे भाग अन्य यंत्रास लावणे.
cannon कॅनन् n.--- तोफ, उल्हाटयंत्र, नाळ.
cannonade कॅननेड् n.--- तोफांचा सतत माग/भडिमार. v.t.---तोफांचा मारा करणे.
canoniz(s)e कॅननाइझ् v.t.--- (प्रस्थापित धर्मपिठाच्या) अधिकृत नियमांवलीत/संतावलीत समाविष्ट करणे. (प्रस्थापित धर्मपिठाच्या अधिकाराने) मंजूर करणे.
cannon shot कॅनन् शाॅट् n.--- तोफेचा गोळा.
cannon ball कॅनन् बाॅल् n.--- तोफेचा गोळा.
cannoneer कॅननीर् n.--- गोलंदाज.
canny कॅनी a.--- सावध, हुशार, चाणाक्ष, चतुर, नीटनेटका, देखणा. (पहा: ‘uncanny’).
canoe कॅनू n.--- लहान नाव, होडके, डोणी. v.i.--- अशी नाव चालविणे. v.i.--- अशा नावेतून जाणे.
canon कॅनन् n.--- कायदा, शास्त्र, नियम, संतावळी.
canonical कॅनाॅनिकल् a.--- कायद्यास रुजू, धर्ममतानुसार.
canoodle कॅनूडल् v.t.--- -ला आलिंगिणे/कुरवाळणे. v.i.--- कुरवाळण्यात/आलिंगिण्यात रमणे.
canopy कॅनपि n.--- छत, चांदवा, छप्पर, पिंजरा.
cant कॅन्ट् n.--- मानभावी बोली, सांकेतिक भाषा, निरर्थक शब्दजाल.
cantankerous कॅन्टॅंकरस् a.--- भांडखोर, वाकडा, भांडकुदळ.
canteen कॅन्टीन् n.--- सोजिराचे दारू पिण्याचे भांडे.
canter कॅन्टर् n.--- चौकचाल, वाक्पंडीत.
canterbury-tale कॅन्टर्बरि टेल् n.--- कल्पित गोष्ट.
canthus कॅन्थस् n.--- नेत्रकोन.
cantilever कॅन्टिलिव्हर् n.--- भिंतइ. सारख्या, केवळ एका बाजूच्या आधाराने स्थिर असा बांधकामांतील क्षितीजसमांतर अवयव. वरील प्रकारचा, सज्जा (balcony), टोकावरील कंगोरा (cornice) इ. ना पेलणारा आधारपट्ट. चबुतरा, पार, ओटा. पुलाच्या दोन शेजारच्या खाम्बांतून निघून वर परस्परांशी जोडल्या जाणाऱ्या बांधकामाच्या दोन अवयवांतील एक.
cantillate कॅन्टिलेट् v.t.---गाण्याच्या सुरावर म्हणणे.
canto कॅन्टो n.--- काव्याचा भाग, सर्ग, अध्याय, महाकाव्याचा एक भाग.
canton कॅन्टन् n.--- जिल्हा, परगणा.
cantonment कॅन्टॉन्मंट् n.--- छावणी, सेनानगर.
canvass कॅन्व्हॅस् / कॅन्व्हस् v.t.--- अनुमत मागणे, छडा/तपास काढणे, घाटाने, घोळणे.
canyon कॅन्यन् n.--- दोहो बाजूंनी उत्तुंग कडे (व तळाशी नदी) असलेली अरुंद दरी/घळ. (पहा: Fiord/Fjord)