dol-dou

dolorous डोलरस् a.--- रडवा, भयान, दुःखी, खिन्न.
dolt डोल्ट् n.--- मूर्ख, टोणपा, गाढव, दगड, धोंडा.
doltish डोल्टिश् a.--- मूर्ख.
domain डोमेन् n.--- ताब्यांतला प्रदेश/राज्य.
dome डोम् n.--- घुमट, कळस, डेरा, घुमटी.
domestic डोमेस्टिक् a.--- पाळीव, घरगुती, कामकरी.
domesticate डोमेस्टिकेट् v.t.--- माणसाळविणे, पाळणे, संवय लावणे, संवई करणे.
domicil(e) डॉमिसिल् / डॉमिसाइल् n.--- वाडा, घर. अधिवास (कायदेशीर), वसतिस्थान. v.t.--- -ला स्थापिणे/वसविणे.
dominance डॉमिनन्स् n.--- प्रभाव, सामर्थ्याचा दबाव.
dominancy डॉमिनन्सि n.--- प्रभावीपणाचा गुण.
dominant डॉमिनन्ट् a.--- प्रभावशाली, उठून दिसणारा, डोळ्यांत भरणारा.
domination डॉमिनेशन् n.--- अंमल, अधिकार, राज्य.
domineer डॉमनिअर् v.t./v.i. --- ताठयाने वागणे, निर्दयपणे हुकूमत गाजवणे, हुकूमशाहीने राज्य करणे,करडा, अंमल चालविणे.
dominion डोमिनीअन n.--- राज्य, सत्ता, अंमल.
don डॉन् v.t.--- अंगावर वस्त्र चढविणे, आवरण चढविणे. n.--- स्पेनमधील सभ्य गृहस्थाच्या मागे लावली जाणारी उपाधी, विद्यापीठाचा अधिकारी.
donation डोनेशन् n.--- देणगी, दान, बक्षीस, देणे.
donkey डाँकी n.--- गाढव.
donor डोनर् n.--- देणारा, दाता.
doom डूम् v.t.--- शिक्षा ठरविणे, नशिबी लिहिणे. N.--- शिक्षेचा ठराव.
door डोअर् n.--- दार, दरवाजा, कवाड, द्वार.
doorsill डोअरसिल् n.--- उंबरा, उंबरठा.
dormitory डॉर्मिटरी n.--- निजण्याची खोली, (अनेक बिछान्यांची सोय असलेले) शयनगृह/वसति(गृह), निवासस्थान.
dorsal डोर्सल् a.--- पाठीचा, पृष्ठसंबंधी.
dose डोस् v.t.--- प्रमाणाने औषध देणे. N.--- घुटका.
dot डॉट् v.t.--- शून्य/पूज्य देणे. N.--- शून्य, पूज्य.
dotage डोटिज् n.--- म्हातारचळ, साठी बुद्धि. पहा: Senility.
dotal डोटल् n.--- स्त्रीधन म्हणून देणे.
dotard डोटर्ड् a.--- म्हातारचळ लागलेला.
dote डोट् v.i.--- म्हातारचेष्टा करणे. (of/on) बाबत प्रेमवेडे होणे. N.--- दुर्बळ मनुष्य.
dotingly डोटिंग्लि ad.--- अतिशय भुलून.
doubgrass डूब्ग्रास् n.--- हरळी, दूर्वा.
double डबल् v.t.--- दुप्पट करणे, दुमटणे, प्रदक्षिणा करणे, वळसा घेणे. a.--- जुळा, दुप्पट, दुहेरी, कपटी, दुभागलेला. N.--- प्रतिकृति, तोतया. V.i.--- द्वित्व/आवृत्ति/अभ्यास पावणे. युगलित होणे. दुहेरणे, दुप्पट होणे.
double-cross डबल्-क्रॉस् n.--- दोन्ही पक्षांच्या विश्वासघाटाचे कृत्य; निमकहरामी; दगाबाजी.
double-dealing डबल् डीलिंग् n.--- दुटप्पी व्यवहार.
double-edged डबल्-एज्ड् a.--- द्वयर्थी, दुधारी, द्वैधयुत.
double-entendre दूबल् आंतांद्र श्लेष, दोन अर्थांचा शब्द, द्वयर्थी शब्दप्रयोग.
double-ganger डबल्-गँगर् n.--- (जिवंत माणसाचे) भूत, अवतार, प्रतिरूप.
double-over डबल्-ओव्हर् शरीर दुमडणे/वाकविणे, मुरगळणे.
doubled डबल्ड् a.--- आवृत्त, द्वयाव्रुत्त, द्वित्व झालेला/दिला गेलेला. अभ्यस्त, युगलित, युग्मित, द्विगुण, द्विगुणित.
doubling डबलिंग् n.--- द्वित्व, आवृत्ति, द्वयाव्रुत्ति.
doublet डब्लेट् n.--- बंडी, आणतील बंडी.
doubt डाउट् n.--- v.t.--- शंका घेणे, संशय बाळगणे. N.--- शंका, संशय, संदेह, किंतु, भ्रांति.