Old-One

Old ओल्ड् a.--- म्हातारा, जुना, पुराणा, जीर्ण. Too old अतिवयस्कर.
Oldage ओल्डेज् n.--- वृद्धापकाळ.
Olfaction आॅल्फॅक्शन् n.--- वास घेण्याची क्रिया. अवघ्राण, गंधसंवेदना.
Olfactory आॅल्फॅक्टरि a.--- गंधसंवेदनाविषयक. n.--- घाणेंद्रिय.
Oligarch आॅलिगार्क् n.--- ‘Oligarchy’ चा घटक(-व्यक्ति). सत्ताधारी अल्पसंख्यगटांतील एक.
Oligarchal / Oligarchic आॅलिगार्कल् / आॅलिगार्किक् a.--- ‘Oligarchy’ विषयक, ‘Oligarchy’ -नुसार चाल(वि)लेले, ‘Oligarchy’ चे समर्थन / पुरस्कार करणारा.
Oligarchize आॅलिगार्काइज् v.t.--- ‘Oligarchy’ मध्ये रूपांतरित करणे.
Oligarchy आॅलिगार्कि n.--- गटाधिकारशाही, अल्पसंख्यगटाची सत्ता, टोळीसत्ता, अल्प लोकराज्यसत्ताप्रकार.
Oligo- आॅलिगो ‘अल्प’ या अर्थाचा उपसर्ग.
Oligopolistic आॅलिगॉपलिस्टिक् a.--- ‘Oligopoly’ च्या संबंधीचा / स्वरूपाचा.
Oligopoly आॅलिगॉपली n.--- अल्प संख्यांचा एकाधिकार व्यापारधंद्यातील अल्प लोकांची मत्तेदारी.
Olitory आॅलिटरि a.--- शाकभाजीचा, भाजीपाल्याचा.
Olympia अलिम्पिआ (proper noun) प्राचीन ग्रीस देशाच्या दक्षिण भागांतील एक स्थान.
Olympic अलिंपिअॅड् a.--- ‘Olympia’-(संबंधे-)चा, ‘Olympic Games’-(संबंधी-)चा.
Olympic Games अलिम्पिक् गेम्स् n.--- इ.स. १८९६ पासून चार वर्षांतून एकदा जागतिक स्तरावर आयोजित केला जाणारा विविध खेळ-स्पर्धानचा मेळावा / सत्र.
Olympiad अलिम्पिअॅड् n.--- (विशिष्ट ठिकाणाचे / समयाचे) ‘Olympic Games’ (पहा). दार चार वर्षांनी एकदा होणाऱ्या अलिंपिक क्रीडा-स्पर्धातील पाठोपाठच्या दोन स्पर्धांमधील (विशिष्ट)चार वर्षांचा अवधि. अलिंपिक स्पर्धेसमान अन्य क्षेत्रांतील नेमाने होणारी आंतरराष्ट्रीय स्पर्धा.
Olympian अलिम्पिअन् a.--- Olympus-संबंधीचा, स्वर्गीय, भव्य-दिव्य. n.--- अतिमानुष, भव्यदिव्य व्यक्ति, पुरुषोत्तम. ‘Olympic Games’ मधील स्पर्धक.
Olympus अलिम्पस् n.--- प्राचीन ग्रीस देशामधील दव-निवास (स्वर्ग) गणला गेलेला एक पर्वत.
Ombudsman आॅम्बड्झ्मन् n.--- (Swedish भाषेंतील ‘कायद्यासंबंधीचा प्रतिनिधि (legal representative)’ या अर्थीच्या शब्दापासून) सरकार आणि सरकारी / सार्वजनिक संस्था यांविरुद्धच्या लोकांच्या गाऱ्हाण्याची / तक्रारींची चौकशी व निवाडा करण्याचे अधिकार असलेला सरकारनियुक्त वरिष्ठ असलेला असरकारनियुक्त वरिष्ठ अधिकारी, ‘लोक-आयुक्त’, ‘लोक-पाल’ इ. स्थापित / संकल्पित अधिकारपद / अधिकारी. Banking ombudsman n.--- भारतातील बँकांविरुद्ध बँक-ग्राहकांच्या गाऱ्हाण्यांवर चौकशी करून, निवाडा देणारा भारतीय-रिझर्व-बँक-नियुक्त अधिकारी. (पहा: www.bankingombudsman.rbi.org.in)
Omen ओमेन् n.--- शकुन, प्रश्न, शुभाशुभलक्षण.
Omentum ओमेन्टम् n.--- पोटाचा पडदा, अंत्रावरण.
Ominous ओमिनस् a.--- शकुनासंबंधी, शुभसूचक, अशुभ सूचक, अमंगळसूचक.
Omission ओमिशन् n.--- वगळणे, टाळाटाळ, अंतर.
Omit ओमिट् v.t.--- सोडणे, वगळणे, हयगय करणे.
Omniferous आॅम्निफेरस् a.--- सर्वाविध, सर्व प्रकारचे.
Omnipotence आॅम्निपटन्स् n.--- सर्वशक्तिमत्व.
Omnipotency आॅम्निपोटेन्सि n.--- अपारशक्ति.
Omnipotent आॅम्निपटन्ट् a.--- सर्वशक्तिमान.
Omnipresence आॅम्निप्रेझेन्स् n.--- सर्वव्यापकता.
Omniscience आॅम्निसिएन्स् n.--- अपारज्ञान.
Omniscient आॅम्निसिएन्ट् a.--- सर्वज्ञ, सर्ववेत्ता.
Omnivorous आॅम्निव्होरस् a.--- सर्वभक्षक, स्वेच्छाहारी.
On आॅन् ad.--- पुढे. prep.--- वर, वरती, विषयी.
Once वन्स् ad.--- एकवेळ. एकदा मागे. At once - लागलीच, तेंव्हाच. All at once - एकठोक.
Oncology आँकोलॉजि n.--- शरीररामध्ये / शरीरावर उद्भवणाऱ्या गळवा / गांठी /-संबंधीचे शास्त्र. अर्बुदाशास्त्र
One वन् a.--- एक, कोणी एक. n.--- एक, एक व्यक्ती. pron.--- काही एक, कोणी, एखादा.
One-eyed वन्-आइड् a.--- एक डोळ्याचा, कटाक्ष.
One-up वनप् a.--- वरचढ. To be one-up on च्या बाबतींत कुरघोडी करणे.
One-up manship वनप्मन्शिप् n.--- आपल्या वरिष्ठतेच्या आधारे दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचा / वचक ठेवण्याचा व तोरा राखण्याचा प्रकार.
Oneness वन्नेस् n.--- एकपणा.
Onerous आॅनरस् a.--- जड, भारी, कठीण, दुःसह.
Onesided वनसाइडेड् a.--- एकतर्फी, एकपक्षी.