elixir इलिक्सर् n.--- आयुष्यवर्धक औषध, मधुरपेय, अमृत.
elk एल्क् n.--- सांबर, आकाराने मोठी हरणाची एक जात (पहा: stag).
ell एल्ल् n.--- इंग्रजी माप, सवावार.
ellipse एलिप्स् n.--- दीर्घ वर्तुळ.
ellipsis एलिप्सिस् n.--- पद-न्यूनता, पदशब्दाकांक्षा.
elliptical एलिप्टिकल् a.--- कमी शब्दांचे, पदन्यूनतेचे, अंडाकार, अंडाकृति.
elliptically एलिप्टिकलि ad.--- कांही शब्द सोडून.
elocution एलोक्युशन् n.--- वक्तृत्व, सभापांडित्य.
elongate एलॉन्गेट् v.t.--- लांब करणे, वाढविणे.
elongation एलाँगेशन् n.--- वृद्धि-लांब करणे.
elope इलोप् v.i.--- (स्त्री व पुरुष याचे पतीपत्नी (सदृश) पळून जाणे, पळ काढणे, हात धरून जाणे (स्त्री पुरुषाचा).
elopement इलोप्मेंट् n.--- पलायन, हात धरून जाणे.
eloquence एलक्वन्स् n.--- वक्तृत्व.
eloquent एलक्वंट् a.--- वाक्पटू, बोलका, प्रभावी, वक्तृत्वपूर्ण.
else एल्स् ad.--- नाहींतर, एरवी.
elsewhere एल्सव्हेअर् ad.--- अन्यत्र, दुसऱ्या ठिकाणी.
elucidate इल्युसिडेट् v.t.--- स्पष्ट/उघड करणे.
elucidation इल्युसिडेशन् n.--- स्पष्टीकरण.
elude इल्यूड् v.t.--- डोळा चुकवणे, झुकांडी देणे.
elusive इल्युझिव्ह् a.--- चुकवणुकीचा, भ्रामक.
elysian इलिझिअन् a.--- स्वर्गसुखाचा.
elysium इलिझिअन् n.--- स्वर्गलोक, इंद्रभुवन, सुखस्थान, पितृलोक.
emaciate इमॅशिएट् v.t. and v.i.--- रोडावणे, वाळणे, कृश होणे.
emaciated इमेशिएटेड् a.--- कृश, क्षीण, रोड, अशक्त, दुबळा, रोडका.
emanant इमानंट् a.--- निघणारा.
emanate इमॅनेट् v.i.--- निघणे, वाहणे, सुटणे.
emancipate इमॅन्सिपेट् v.t.--- बंधमुक्त करणे, मुक्त करणे, सुटका करणे.
emancipation इमॅन्सिपेशन् n.--- मोकळीक, सुटका, मुक्ति, मोक्ष.
emasculate इमॅस्क्युलेट् v.t.--- नपुंसक/गतवीर्य/नष्टवीर्य करणे. a.--- शेळपट, नष्टवीर्य, बुळा.
embalm एम्बाम् v.t.--- प्रेतांत मसाला भरणे.
embank एम्बॅन्क् v.t.--- बांध/बंधारा घालणे.
embankment एम्बॅन्कमेंट् n.--- बांध, धरण, बंधारा, डगर, दरड.
embargo एम्बार्गो n.--- मनाई, प्रतिबंध. v.t.--- प्रतिबंध/मनाई/अटकाव करणे.
embark एम्बार्क v.t.--- गलबतावर चढवणे.
embarkation एम्बार्केशन् n.--- गलबतावर चढणे.
embarrass एम्बॅरस् v.t.--- घोटाल्यांत घालणे, कानकोडे करणे. -ला अवघडविणे, कसनुसे करणे, -ला लाजिरवाणे करणे, ओशाळविणे.
embarrassment एम्बॅरॅस्मेंट् n.--- घोटाळा, लचांड, फांस, पेंच, कानकोंडेपणा, लाजिरवाणेपणा, फजीती, यामुळे येणारी मानसिक अवस्था.
embassador एम्बॅसडर् n.--- राजाचा वकील.
embassy एम्बॅसि n.--- वकील/मंडळी, दुसऱ्या दरबारात वकिली.
embattle एम्बॅटल् v.t.--- फौज रांगेने उभी करणे.
embed or Imbed एम्बेड् or इम्बेड् v.t.--- (कोंदणात किंव्हा अन्य माध्यमांत व परिसरांत) (पक्का) बसविणे, खोबून ठेवणे.