wipe वाइप् v.t.--- साफ करणे. Wipe away --- पुसून टाकणे.
wire वायर् v.t.--- तारेवर बांधणे. n.--- तार. Wire-puller --- सूत्रधार.
wiry वायरी a.--- तारेचा, बळकट.
wisdom विझ्डम् n.--- शहाणपणा.
wise वाइझ् a.--- शहाणा, शहाणपणाचा. n.--- प्रकार, रीत, पद्धति.
wisecrack वाइझ्क्रॅक् n.--- अर्थपूर्ण वचन / म्हण. v.--- अशी वचने सांगणे / उद्धृत करणे / उच्चारणे. काव्यशास्त्रविनोद (करणे), चुटके (करणे).
wisely वाइझ्ली ad.--- शहाणपणाने.
wiseacre वाइझेकर् n.--- अकलेचा खंदक, गाजरपारखी. n.--- (सामान्यतः कुचेष्टा-/उपरोध -व्यंजक वापर) अकलेचा कांदा, उंटावरचा शहाणा. सूत्रबद्ध वाचणे / म्हणी सांगून शहाणपणाचा आव आणणारा मूर्ख. डौलाने / ऐटीने नीति-उपदेश करण्याची सवय / आवड असणारी व्यक्ति.
wish विश् n.-- इच्छा, वासना. v.t.--- इच्छा करणे.
wishful विश्फुल् a.--- भुकेला, उत्कंठित.
wishywashy विशिवॉशी a.--- दुबळा, मिळमिळीत, अळणी. सत्व- /-हीन/-शून्य.
wistful विस्ट्फल् a.--- भुकेला, साभिलाषी, आर्त, सस्पृह, व्याकुल.
wit विट् n.--- चातुर्य, मर्म, खुबी, हुशारी, समज, चातुर्य, विनोदबुद्धी, चतुराई. चातुर्य व विनोदबुद्धी असलेली व्यक्ती, मनोरंजक व हुशारीने केलेले लिखाण किंवा वक्तृत्व.
witch विच् n.--- चेटकीण. जादूटोणा करणारी (दुष्ट-प्रवृत्तीची) स्त्री. वृद्ध व कुरूप स्त्री. Witch craft --- चेटूक, मोह, जादूटोणा. Witch-hunt / Witch-hunting विच्-हण्टिंग् n.--- सर्वसाधारण लोकमताविरुद्ध मतें धारण करणाऱ्यास शोधून काढून त्यांचा पद्धतशीरपणे छळ करण्याची (प्र-)क्रिया. विरोधी अल्पसंख्यांचा छळवाद. असामान्याचा छळवाद.
with विथ् prep.--- ने, शी, सह, पाशी, योगाने.
withdraw विथ्ड्रॉ v.t.--- काढून घेणे, परत घेणे.
wither विदर् v.t.--- झुकवणे, कोमेजविणे, सुकविणे.
withhold विथ्होल्ड् v.t.--- राखणे, आटोपता धरणे.
within विदिन् prep.--- आंत. From within --- आंतून.
without विदाउट् prep.--- बाहेर, शिवाय. ad.--- बाह्यतः, बाहेरून.
withstand विथ्स्टॅण्ड् v.t.--- आडवे येणे, विरोध करणे. v.i.--- तोंड देणे.
witness विट्नेस् v.t.--- स्वतः पाहणे, साक्ष देणे, माहीत असणे. n.--- साक्षीदार, साक्षी पाहणारा, साक्ष, साक्ष्य, पुरावा. (पहा: ‘Eye-witness’) Hostile witness --- उलटलेला साक्षीदार.
witticism विटसिझम् n.--- विनोदी विधान, चुटका.
witty विटि a.--- रसिक, रंगेल, थट्टेखोर, मार्मिक, गमत्या.
wive वाइव्ह् v.t.--- बायको करून देणे.
wizard विझर्ड् n.--- जादुगार, चेटक्या. (विशिष्ट क्षेत्रांतील) अद्वितीय / अद्भुत कामगिरी केलेला पुरुष. a.--- उत्तम, उत्कृष्ट, थोर.
wizardry विझर्डरी n.--- जादुगिरी, जादू. गारूड. चेटूक.
wobble वॉबल् v.i.--- हेलकावे / झुकांड्या खात / लटपटत / तोल सुटलेल्या स्थितींत जाणे / चालणे / फिरणे. वेडेवाकडे झोके खाणे. झुकांड्या खाणे / घेणे. निश्चय / निर्णय करू न शकणे. n.--- हेलकावा, झुकांडी, लटपट.
woe वो n.--- दुःख, अनर्थ, भेद.
woeful वोफुल् a.--- दुःखी, अनर्थाचा, कवडीमोल, भिकार.
wolf वुल्फ् n.--- लांडगा.
woman वुमन् n.--- बायको.
womanish वुमनिश् a.--- बायकी, बायक्या, जनानी.
womanize वूमनाइझ् v.t.--- (पुरुषास) स्त्री(समान) करणे, बायकी बनविणे; स्त्रियांशी अनैतिक संबंध ठेवणे.
womanizer वूमनाइझर् n.--- स्त्रियांशी अनैतिक संबंध ठेवणारा, स्त्रीलंपट.
womb वूम्ब् n.--- गर्भाशय, कूस.
wonder वण्डर् v.i.--- अचंबा करणे, वाटणे. n.--- अचंबा, आश्चर्य.
wonderful वण्डर्फुल् a.--- आश्चर्याचा.
wonderfully वण्डर्फुली ad.--- आश्चर्य वाटेलसा.
woo वू v.t.--- लग्नाकरिता स्त्रीची आराधना करणे.
wood वुड् n.--- लाकूड, रान, अरण्य. Wood cutter --- लाकूडतोड्या. Wooden --- लाकडी. Woodman --- जंगल्या. Woodpecker --- सुतारपक्षी. woodwork --- लाकडी काम.
wood-bill वुड्-बिल् n.--- लाकूड इ. कापण्याचे / तोडण्याचे हत्यार, कोयता, कोयती.
wood wind (instrument) वुड्-विण्ड् n.--- बासरी, वेणु, पावा, अलगुज.
woody वुडन् a.--- लाकडाचा, वृक्षमय, रानटी.
wool वुल् n.--- लोकर, लव. Wool comber --- पिंजरणारा.
woolen वुलन् a.--- लोकरीचे.
wooly वूली a.--- लोकरी-चा /-सारखा गोंधळाचा, गोंधळलेला, संमूढ, लटपटीत, गुळमुळीत, निश्चयहीन.
wooly-headed वूली-हेडेड् a.--- लोकरीसारख्या केसांचे डोके असलेला, निर्बुद्ध.
word वर्ड् v.i.--- शब्द घालणे, शब्दरचना करणे. n.--- सूचना, बातमी, वाक्य. (pl. --- भांडण). In a word --- सारांश, थोडक्यात.
word-processing वर्ड्-प्रोसेसिंग् n.--- विचार / माहिती लेखबद्ध करताना / कळविताना करण्याची शब्दांकन-प्रक्रिया, जीमध्ये शब्द-योजना, लेखाची मांडणी, लेखन/टंकन अक्षराकार इ. चा नि त्यातील सुधारणा / दुरुस्त्या यांचा समावेश होतो.
word-processor वर्ड्-प्रोसेसर् n.--- संगणकांतील शब्दांकनप्रक्रिया करणारा विशिष्ट प्रक्रिया-विभाग किंवा प्रक्रिया-पद्धति (programme).
work वर्क् n.--- (साहित्य, कला, रचना, उपाचार इ. विषयांतील) कृति, उत्पादन, निर्मिती. काम, धंदा. कारखाना, वहिवाट, बांधकाम. v.i.--- काम करणे, खपणे, चालणे, उपयोगी पडणे, उमळणे, बनविणे, कमाविणे.
workaday वर्कडे a.--- कार्यदिनासंबंधीचा, सर्वसाधारण, सामान्य, रटाळ.
workaholic वर्कोहोलिक् / वर्कोहॉलिक् n.--- कामांत रमणारा / कष्टाळू/ कार्यरत / कार्यमग्न मनुष्य. कामाचे व्यसन / नाद / आसक्ति असलेली व्यक्ति. कर्मठ (व्यक्ति).
working वर्किंग् a.--- कष्टाळू, मेहनती.
workman वर्क्मन् n.--- कारागीर.
workout वर्काउट् n.--- व्यायाम-विधि, नेमून दिलेला / घेतलेला व्यायामाचा कार्यक्रम.
works वर्क्स् n.--- यंत्रणा, यंत्रमांडणी, यंत्र इ. चालविण्याच्या कळांची मांडणी. The works --- सर्व आवश्यक / उपलब्ध गोष्टी. (He drove me in his red Toyota, complete with heating system, FM tuner, beeper phone, the works.)
worm वर्म् n.--- किडा, जंतु, अळी. Worm eaten --- किड्याने खाल्लेला. Earthworm --- गांडूळ.
wornout वोर्न्आउट् a.--- जुने, जीर्ण, थकलेला.
worry वरि v.t.--- छळणे, फाडफाडून खाणे. n.--- चिंता, काळजी, त्रास.
worse वर्स् a.--- अधिक वाईट, जास्त आजारी. ad.--- वाईटपणाने. v.t.--- कमीपणा आणणे, अधिक वाईट करणे. n.--- अपयश, वाईट, हानि.
worship वर्शिप् v.t.--- पूजा करणे, मान देणे. n.--- पूजा.
worshipful वर्शिप्फुल् a.--- पूज्य, मान्य.
worshiper वर्शिपर् n.--- भक्त, उपासक.
worst वर्स्ट् a.--- सर्वांहून वाईट. v.t.--- -ला पराभूत करणे.
worsted वर्स्टेड् a.--- लोकरीच्या सुताचा. n.--- लोकरीचा.
worth वर्थ् n.--- मोल, किंमत, गूण, मान्यता.
worthless वर्थ्लेस् a.--- कवडी किमतीचा, भिकार.
worthwhile वSर्थ्व्हाइल् a.--- करण्यासारखा, करण्यायोग्य. पुरेसा महत्वाचा / उपयुक्त, लक्ष देण्यायोग्य, लक्षणीय, विचारार्ह.
worthy वर्दी a.--- (विशेषण) योग्य, गुणी, मान्यवर, थोर, प्रशंसा / आदर-पात्र, आदरणीय, चांगला, मान्य. मोठेपणाचा, थोरपणाचा. n.--- गुणी / प्रतिष्ठित, धेंड, प्रस्थ, प्रकरण. Worthy (of) --- -ला /-स /-करिता पात्र /योग्य. (सामासांती) -उदा. Praiseworth (स्तुत्य), blameworthy (दूषणास्पद), road-worthy (रस्त्यावर फिरण्यास योग्य - गाडी इ.).