suicide सुइसाइड् n.--- आत्मघात, आत्महत्या.
suit सूट् n.--- फिर्याद, मुकदमा, परिवार, खटला, रंग. v.t.--- साजणे, साजेसे असणे.
suitable सूटबल् a.--- लायक, जमणारा, योग्य.
suite स्वीट् n.--- परिवार, इतमाम, जोड. मोठ्या वाड्यातील खोली / दालन.
suitor सूटर् n.--- फिर्यादी, मुलीला मागणी घालणारा.
sulk सल्क् v.i.--- रुसणे.
sulks / Sulk सलक्स् / सल्क् n.--- रुसवा.
sulky सल्की a.--- रुसलेला. = Sullen.
sullen सलन् a.--- दुर्मुखलेला, कुरता, घुम्या, उदास. = Sulky.
sully सलि v.t.--- मळवणे, -ला बट्टा लावणे. अशुद्ध करणे. n.--- काळिमा, कलंक, डाग.
sulphur सल्फर् n.--- गंधक.
sulphurous सल्फरस् a.--- जळजळीत.
sultana सल्टॅना n.--- छोटा बीज-रहित मनुका / बेदाणा. सुलतानची पत्नी, बहीण, मुलगी, किंवा रखेल.
sultry सल्ट्रि a.--- उकाड्याचा, गुदमरणारा, कोंदट, उष्मा करणारा.
sum सम् v.t.--- बेरीज करणे, उपसंहार करणे, थोडक्यांत आणणे. n.--- बेरीज, रक्कम, सारांश, तात्पर्य. In sum ad.--- थोडक्यांत (सांगायचे तर), सारांश, तात्पर्य (की).
summarise समराइझ् v.t.--- तात्पर्य / सारांश सांगणे / देणे.
summary समरी a.--- संक्षेपाचा. संक्षिप्त स्वरूपाचा, त्राटक. n.--- संक्षेप, सारांश.
summer समर् n.--- उन्हाळा. a.--- उन्हाळ्याचा.
summit समिट् n.--- कळस, शिखर, सीमा. अनेक देश इ. च्या सर्वोच्च शास्त्यांची बैठक.
summiteer समिटिअर् n.--- ‘Summit’ (सर्वोच्च संमेलन) चा कर्ता / पुरस्कर्ता.
summitry समिट्री ‘Summit’ (ज्येष्ठसंमेलन) चा समारंभ / प्रसंग / प्रकार.
summon समन् v.t.--- सत्तेने बोलावणे, चेतविणे.
summons समन्झ् n.--- सरकारी बोलावणे. (pl. summonses)
summum bonum समम् बोनम् n.--- प्रमुख / सर्वोच्च ध्येयभूत हित / कल्याण.
sumo सूमो n.--- शरीरपुष्टिदायक आहार घेऊन गलेलठ्ठ, अगडबंब शरीर कमावलेल्या दोघांनी मिळून खेळावयाचा, जपानमध्ये प्रचलित, कुस्तीसारखा द्वंद्वयुद्धखेळ, ज्यांत विरोधकास निर्धारित क्षेत्राबाहेर ढकलून अथवा त्याचे पदतलाव्यतिरिक्त अंग भूमीस टेकवून पराभूत करता येते.
sumpter सम्प्टर् n.--- कंठाळ्या घोडा.
sumptuous सम्पच्युअस् a.--- मौल्यवान, भव्य, उमदा, चमचमीत.
sun सन् n.--- सूर्य, उन्हं. Sunbeam --- सूर्यकिरण. Sundial --- शंकुयंत्र. Sunrise --- सूर्योदय. Sunset --- सूर्यास्त. Sunshine --- ऊन, उन्हाचा ताप. (‘शंसः’ या वैदिक शब्दापासून - विनोबा).
sunday सन्डे n.--- रविवार.
sundown = Sunset
sundry सन्ड्रि a.--- अनेक प्रकारचे, नानाविध.
sunny सनी a.--- सूर्याने प्रकाशित. उत्साही, तरतरीत, उल्हासी, उल्हासित, उल्लसित.
sunstroke सन्स्ट्रोक् n.--- उन्हाचा चटका, झळ.
suo motu सुओ मोटू ad.--- (केवळ) स्वतःच्या इच्छेने. a.--- स्वेच्छा-(मात्र-)-प्रेरित /-कृत.
sup सप् v.i.--- रात्रीचे जेवण करणे, घोट घेणे. n.--- घोट, भुरका.
superable सपरेबल् a.--- परिहार्य, निवार्य.
superabundant सपर्अॅबन्डन्ट् a.--- अत्यंत, विपुल.
superannuated सुपर्अॅन्युएशन् a.--- वयातीत.
superannuation सुपर्अॅन्युएशन् n.--- वयातीतपणा, वार्धक्यामुळे पेन्शनीत जाणे.
superb सुपर्ब् a.--- झळकफळक, छानदार.
supercargo सुपर्कार्गो n.--- व्यापारी, गलबताचा तपासनीस.
supercilious सुपर्सिलिअस् a.--- रंगदार, मस्तवाल, गर्वोद्धत, गर्विष्ठ, उन्मत्त.
supercomputer सुपर्कम्प्यूटर् n.--- महाप्रचंड संगणक.
superficial सुपर्फिशल् a.--- वरकरणी, उथळ, वरपांगी.
superficies सुपर्फीसीस् n.--- वरचे / बाहेरचे अंग.
superfine सुपर्फाइन् a.--- छानदार, फार बारीक.
superfluity सुपर्फ्लुइटि n.--- अतिरेक, चैनीची गोष्ट.
superfluous सुपर्फ्लुअस् a.--- अतिशय, अधिक, फाजील.
superhuman सुपर्ह्यूमन् a.--- अमानुष, ईश्वरी.
superintendent सुपरिन्टेन्डन्ट् n.--- पाहणारा, देखरेख करणारा.
superior सुपीरिअर् a.--- श्रेष्ठ प्रतीचे, वरच्या दर्जाचे.
superiority सुपीरिआॅरिटि n.--- श्रेष्ठपणा, वर्चस्व.
superlative सुपर्लेटिव्ह् a.--- परमावधीचे, पराकाष्ठेचा.
supernatural सुपर्नॅचरल् a.--- अलौकिक, अद्भुत.
supersede सुपर्सीड् v.t.--- -ला रद्द करणे, -च्या डोक्यावर बसणे.
superstition सुपर्स्टिशन् n.--- अति भक्ति, भक्तिवेड, धर्मभोळेपणा.
superstitious सुपर्स्टिशस् a.--- फाजील श्रद्धाळू.
supervise सुपर्वाइझ् v.t.--- पाहणे, देखरेख करणे.
supervision सुपर्व्हिजन् n.--- नजर, पाहणी.
supervisor सुपर्वायझर् n.--- देखरेख करणारा.
supine सूपाइन् / स्यूपाइन् a.--- पाठीवर पडलेला, तोंडावर / मुखावर / पुढील भागावर असलेला. उताणा.
supper सपर् n.--- रात्रीचे जेवण. दिनश्चर्येतील शेवटचे (हलके) भोजन.
supple सपल् a.--- लवचिक.
supplement सप्लिमंट् / सप्लमंट् n.--- पुरवणी, परिशिष्ट. v.t.--- -मध्ये भर टाकणे, -ची पूर्ति करणे, -ला पुस्ती देणे / जोडणे. n.--- पूरक भाग. पुस्ती.
suppliant सप्लिअंट् a.--- विनंति करणारा, दीनवाणा. n.--- दिन, अर्जदार. याचक.
supplicate सप्लिकेट् v.t.--- विनंति करणे. याचना करणे, (कृपेची) भीक मागणे.
supplication सप्लिकेशन् n.--- विनंति.
supply सप्लाय् v.t.--- पुरविणे, बेगमी करणे, भागवणे, काम करणे. n.--- पुरवठा, बेगमी, सांठा.
support सपोर्ट् v.t.--- हात / आधार देणे, पोसणे, पाठबळ देणे, सांभाळणे, द्रव्यसाहाय्य करणे. n.--- आधार, सांभाळ, द्रव्यसाहाय्य.
Superb सूप(र्)ब् / स्यूप(र्)ब् a.--- भव्योदात्त, देदीप्यमान. उत्कृष्ट प्रतीचा / दर्जाचा, अत्युत्तम.
Supportable सपोर्टेबल् a.--- सह्य, सहनीय.
Suppose सपोझ् v.t.--- कल्पना करणे.
Supposition सपोझिशन् n.--- कल्पना, तर्क, भावना, ग्रह.
Suppress सप्रेस् v.t.--- दडपणे.
Suppression सप्रेशन् n.--- विध्वंस, मोड, दडपणे.
Suppurate सप्युरेट् v.i.--- पिकणे, पुवळणे. पुवाने भरणे.
Suppuration सप्युरेशन् n.--- पिकणे, पुवळणी.
Suppurative सप्युरेटिव्ह् a.--- पुवाने पिकलेल्या अवस्थेतील / पुवाने पिकलेल्या स्वरूपाचा.
Supra स्यूप्रा ad.--- वर, आधी, मागे. ut supra (संक्षिप्त रूप : sup.) = as above.
Supremacy सुप्रीमसी n.--- मुख्य अधिकार, श्रेष्ठत्व.
Supreme सुप्रीम् a.--- सर्वोत्कृष्ट, मुख्य, प्रधान, पराकाष्ठेचा.