Moujik मूजिक्
Mould मोल्ड् v.t.--- बुरा आणणे, घडणे, बनविणे. n.--- बुरा, बुरशी, नरम माती, सांचा, सांगाडा, आराखडा, आकार, नमुना.
Moulder मोल्डर् v.i.--- मातीस मिळणे, तुकडे होणे.
Mouldy मोल्डि a.--- कुबट, बुरशी चढलेला.
Moult मोल्ट् v.t. and v.i.--- पंख झडणे, कांत टाकणे.
Mound माउन्ड् n.--- वनधारा, टेकाड, ढीग, रास, राशि.
Mount माउन्ट् v.t.--- उंच करणे, आरोहण करणे, जाणे. n.--- डोंगर, टेकडी, पर्वत. असं, बैठकीची जागा, वाहन.
Mountain माउन्टन् n.--- पर्वत, डोंगर, पहाड, गिरि, डोंगराळ प्रदेश.
Mountainous माउन्टेनस् a.--- पहाडी, डोंगरी.
Mountebank माउंटिबँक् / माउंटबँक् n.--- नकली / बनावट / तोतया वैद्य / अन्य तज्ज्ञ (रस्तोरस्ती फिरून धंदा करणारा). लंब्याचवड्या गप्पागोष्टी करणारा, तोतया / सोंगाड्या / बढाईखोर. v.i.--- ‘Mountebank’ चा धंदा करणे.
Mourn मोर्न् v.t.--- बद्दल दुःख करणे, दुःख व्यक्तविणे, रडणे, सुतक धरणे.
Mourner मोर्नर् n.--- दुःख करणारा, सुतकी.
Mournful मोर्न्फुल् a.--- खिन्न, दिलगीर, रडावा, दुःखी.
Mourning मोर्निंग् n.--- दुःख, शोक, रोदन, खेद, सुतक (अवस्था / अवधी).
Mouse माउस् n.--- उंदीर. v.i.--- उंदीर पकडणे.
Mouser माउस(झ)र् n.--- उंदीर पकडणारा प्राणी (मांजर, घुबड,इ.).
Moustache मुस्टाश् n.--- मिशी. = Mustache.
Mouth माउथ् n.--- तोंड. v.i.--- तोंडाने बोलणे.
Mouthfriend माउथ्फ्रेंड् n.--- तोंडदेखला मित्र.
Mouthpiece माउथ्पीस् n.--- तोंडाशी असलेली / धरलेली / धरावयाची वस्तु. तोंडासारखी वस्तु / आकृति. तोंडाने फुंकून वाजविण्याच्या वाद्याचा तोंडात / तोंडाशी धारावयाचा भाग, मुखांग. दूरध्वनियंत्राचा बोलण्यासाठी मुखाशी धरण्याचा भाग. विशिष्ट व्यक्तीची / संस्थेची विचारसरणी प्रचारित करणारी व्यक्ति / माध्यम.
Movable मूव्हेबल् a.--- हलण्याजोगा, जंगम, चल.
Movables मूव्हेबल्स् n.--- जंगम, मालमत्ता, सामान.
Move मूव्ह् v.t. and v.i.--- हालणे, सरणे, स्थलांतर करणे. कळवळा आणणे, पाझर फोडणे.
Moveless मूव्ह्लेस् a.--- अचळ, अढळ, स्थिर.
Movement मूव्ह्मेंट् n.--- हाताळणे, फिरणे, गति.
Mow मो v.t.--- कापणे, गावात कापणे, कत्तल करणे.
Mow माऊ n.--- वाकुली, वाकडे तोंड.
Mr. मिस्टर् - अन्य विशिष्ट उपाधि नसेल तर पुरुषांच्या (आड-)नावाचे आधीं लावावयाची आदरवाचक उपाधि. पुरुष अधिकाऱ्यास उद्देशून बोलतांना त्याच्या पदनामापुर्वी लावायची उपाधि.
Mrs. मिसे(सि)स् - अन्य विशिष्ट उपाधीच्या अभावी विवाहित स्त्रीच्या (आड-)नावाआधी लावायची आदरावाचक उपाधि.
Ms. मिज्/ मज् - Mrs. किंवा Mrs. यांऐवजी लावायची (वैकल्पिक) उपाधि (विशे. लग्नाबाबत माहिती नसताना किंवा तीबद्दल विवक्षा नसताना.
Much मच् n.--- पुष्कळपणा. a.--- पुष्कळ, बहुत, फार. ad.--- बहुत, फार, बहुतेक. How much - किती, केवढा. So much - इतका.
Mucid म्युसिड् a.--- आंबलेला, बुरसलेला.
Mucilage म्युसिलेज् n.--- ओला, डिंक, चीक.
Muck मक् n.--- खत, घाण, राड, चिखल, कचरा. Mucky = घाण इ. नी भरलेला.
Mucous म्यूकस् a.--- ‘Mucus’ च्या संबंधी / स्वरूपाचा. Mucous membrane - बाह्य वातावरणाशी जोडल्या गेलेल्या शरीरकुहरांतील श्लेमस्त्रावक अस्तर. n.---
Mucus म्यूकस् n.--- शेम्बवूड वगैरे शारीरिक मळ, कफ, श्लोम, शरीरांतील वाट्या / पोकळ्या यात असणारा / स्रवणारा चिकट द्राव.
Mud मड् n.--- चिखल, राड, रेंदा, गारा.
Muddle मडल् v.t.--- गढूळ करणे, गुंगी आणणे, गोंधळयुक्त असणे / करणे, बट्ट्याबोळ करणे.
Muddle about = टिवल्याबावल्या करणे.
Muddle along = Muddle on
Muddle away = (वेळ, पैसा, इ.) घालवून बसणे.
Muddlehead मड्ल्हेड् n.--- गोंधळलेला / गडबडलेला मनुष्य.
Muddle-headed मड्ल्हेडेड् a.--- गोंधळून गेलेला, गडबडून गेलेला.
Muddle through = निभावून जाणे / नेणे.
Muddle on = रखडत / कडमडत / धडपडत जाणे.
Muddlehead मड्ल्हेड् n.---
Muddleheaded मड्ल्हेडेड् a.---
Muddy मडि v.t.--- गढूळ करणे. a.--- चिखलाचा, गढूळ.
Mudwall मड्वॉल् n.--- कच्ची भिंत, मातीची भिंत.
Muff मफ् n.--- v.--- (संधि, नेम, झेल, इ.) हुकणे, चुकणे.
Muffle मफल् v.i.--- झाकून घेणे, तापाशी बांधणे, छपवणे, बुरखा घालणे, गुरफटणे, गुरगुरणे.
Mug मग् n.--- पेला, पानपात्र, मुख, चेहरा. v.t.--- -वर हल्ला करणे, कसून अभ्यास करणे.
Muga म्यूगा n.--- रेशमाची एक जात (आसामांत विशेष प्रचलित).
Muggish मगिश् a.--- दमट, कोंबट.
Mulatto म्यूलॅटो n.--- a.---
Mulberry मल्बेरि n.---तुते, तुटीचे झाड, तुती / तूट (झाड /फळ), रेशमाची एक जात.
Mulct मल्क्ट् v.t.--- दंड घेणे, खंडणी घेणे. n.--- दंड.
Mule म्यूल् n.--- खेचर.
Muleteer म्यूल्टीअर् n.--- खेचरवाला.
Mulish म्यूलिश् a.--- हटवादी, आडमुठा, अडेलतट्टू. हटवादीपणाचा, आग्रहीपणाचा.
Mull मल् v.t.--- मसाला घालून ऊन करणे, कढवणे.
Muller मूलर् n.--- वरवंटा, बत्ता, घोटा.
Multifarious मल्टिफेरिअस् a.--- बहुत प्रकारचा.
Multilingual मल्टिलिंग्वल् a.--- बहुभाषिक, अनेक भाषांत व्यवहार करणारा.
Multiped मल्टिपेड् a.--- पुष्कळ पायांचा, बाहुपाद.
Multiple मल्टिपल् n.--- गुणाकार, पट. a.--- एकाहून अधिक, अनेकसंख्या, अनेक, बहुविध. n.--- विशिष्ट संख्येची विशिष्ट पुरणांकाने गुणून केलेली /होणारी पट.
Multiplex a.--- = Multiple (a.)
Multiplicand मल्टिप्लिकन्ड् n.--- गुण्यांक, गुण्य.
Multiplication मल्टिप्लकेशन् n.--- गुणाकार.
Multiplier मल्टिप्लायर् n.--- गुणक, गुणणारा.
Multiply मल्टिप्लाय् v.t.--- गुणणे, वाढविणे.
Multitude मल्टिट्यूड् n.--- बहुपणा, जमाव, गट.