Job-Jux

Job जॉब् n.--- स्वार्थाचे काम, किरकोळ काम.
Jockey जॉकी n.--- शर्यतीचा घोडेस्वार, लुच्चा. v.--- लबाड्या करणे, कारस्थाने करणे, शर्यतीच्या घोडेस्वाराचा व्यवसाय करणे.
Jocose जोकोस् a.--- विनोदी, गमतीदार, थट्टेखोर.
Jocular जॉक्युलर् a.--- विनोदी, विनोदात्मक.
Jocularity जॉक्युलॅरिटि n.--- विनोद, थट्टा, गम्मत.
Jocund जॉकन्ड् a.--- आनंदी, उल्हासी, खुशमौजा.
Jocundity जॉकन्डिटि n.--- आनंदी वृत्ति.
Jog जॉग् v.t.--- कोपराने हलवणे, खूण करणे, रपेट करणे, दौड मारणे, अंगमेहनती काम करणे, हलक्या गतीची दौड करणे, (खूण/आठवण म्हणून) कोपरखळी देणे. n.--- (खूण/आठवण म्हणून) कोपरखळी, हलक्या गतीची दौड.
Joie de vivre ज्वा द व्हीवर् n.--- (फ्रेंच वाक्प्रचार) (=joy of living) जगण्यातील आनंदाचा उपभोग / अनुभव.
Join जॉइन् v.t.--- जोडणे, सांधणे, मिळविणे, जडवणे.
Joint जॉइन्ट् n.--- सांधा, जोड. a.--- समाईक, सामाजिक, जुटीचा, संगतीचा. v.i.--- एक होणे, सांधणे.
Jointure जॉइन्टर् n.--- बायकोचा वाटा, रांडरोटा.
Joke जोक् v.t.--- थट्टा करणे. n.--- थट्टा, मस्करी, विनोद.
Joker जोकर् n.--- थट्टा करणारा, मस्कऱ्या.
Joliness जॉलिनेस् n.--- उत्सव, आनंद, आनंदवृत्ति.
Jolly जॉलि a.--- आनंदी, खुषी, रंगेली, उल्हासी.
Jolt जोल्ट् v.t.--- धक्का बसणे. n.--- धक्का, अचका, हिसका.
Jotting जॉटिंग् n.--- स्मरणार्थ टिपण.
Joule जूल् n.--- काम (work) / ऊर्जा (energy), उष्णता (heat) मोजण्याचे माप : १ जूल म्हणजे १ किलोग्राम वस्तुमानास १ मीटर ढकलू शकणारी ऊर्जा.
Journal जर्नल् n.--- रोजनामा, पट्टी, वही, वर्तमानपत्र, नियतकालिक, खतावणी, दैनंदिनी, नोंदवही, अहवाल.
Journalism जSSर्नलिझम् n.--- नियतकालिकाचे काम/लेखन. याचा व्यवसाय.
Journalist जर्नॅलिस्ट् n.--- वर्तमानपत्रचालक.
Journalistic जSSर्नलिस्टिक् a.--- ‘Journalism’ संबंधीचा / स्वरूपाचा.
Journey जर्नि n.--- प्रवास, सफर. v.t.--- फिरणे.
Journey-man जर्निमन् n.--- रोजंदारी, रोजमजूर.
Journo जर्नो n.--- (वृत्त-)पत्रकार = Journalist.
Joust जाउस्ट् = Just
Jovial जोव्हिअल् a.--- चैनी, आनंदी, उल्हासी. गुरु (ग्रह) विषयक.
Joviality जोव्हिअॅलिटी n.--- मौज, गम्मत, खेळकरपणा, मनमिळाऊपणा.
Joy जॉय् n.--- आनंद, उत्साह, विनोद.
Joyful जॉय्फुल् a.--- आनंदयुक्त, हर्षयुक्त.
Joyless जॉय्लेस् a.--- उदास, निरुत्साह.
Joyous जॉयस् a.--- आनंदी, उल्हासी.
Jubilant ज्युबिलन्ट् a.--- जयशब्दोच्चारी, आनंदित, उल्लासपूर्ण.
Jubilee ज्युबिली/ज्यूबिली n.--- सण, महोत्सव, महोत्साह, उत्सव, वाढदिवस, वाढदिवस-समारंभ.
Judge जज्ज v.t.--- न्यायनिवाडा करणे. n.--- न्यायाधीश, पारखी.
Judgeship जज्शिप् n.--- न्यायाधिशी, मुनसफी.
Judgement जज्मेंट् n.--- विचार, मत, समज.
Judgement Hall जज्मेंट् हॉल् n.--- न्यायसभा.
Judicature ज्युडिकेचर् n.--- न्यायाधिकार.
Judicial ज्यूडिशल् a.--- न्यायप्रकरणाचा, न्यायिक, न्यायालयीन.
Judiciary ज्यूडिशरी n.--- राज्यसंस्थेच्या (state च्या) तीन प्रमुख अंगांपैकी न्यायदानाचे काम करणारे अंग (अन्य दोन: Legislative, Executive), न्यायपालिका (हिंदी), न्यायाधीशवर्ग.
Judicious ज्युडिशस् a.--- समतोल (पणाचा-) तारतम्यपूर्ण, विवेकपूर्ण, न्याय्य, शहाणपणाचा.
Jug जग् n.--- चंबू, सुरई.
Juggle जगल् v.t.--- हातचलाखी करणे, गारुड खेळणे, हातचलाखीने फिरविणे / बदलणे, पाठोपाठ/झटपट फेरबदल करणे/करीत राहणे.
Juggler जग्लर् n.--- गारुडी, अनेक वस्तु एकाच वेळी हातांनी फिरवीत ठेवणारा. अनेक अवधाने एकाच वेळी ठेवू शकणारा, शतावधानी. गमती-जमती सांगणारा/करणारा; विदूषक.
Jugglery जग्लरी n.--- हस्तलाघव, हात-चलाखी. जादुगिरी, बनवाबनवी.
Juggling जग्लिंग् n.--- गारुड, नजरबंदी.
Jugular ज्युग्युलर् a.--- मान/गळा यासंबंधी, कंठगत. n.--- कंठगत/मानेतील रक्तवाहिनी.
Juice जूस् n.--- रस, द्रव.
Juicy जूसी a.--- रसाळ.
Jujube जुजुब् n.--- बोर, बोरी.
Jukebox जूक्-बॉक्स् n.--- अनेक ध्वनितबकड्या सामावणारे व त्या हव्या तशा निवडीने आपोआप वाजविणारे यंत्र.
Julian calendar ज्यूलियन् कॅलेंडर् n.--- रोम मध्ये इ.स. पूर्व ४६ पासून प्रचारात आणलेले १२ महिन्यांच्या वर्षाचे, ३६५ दिवसांच्या वर्षाचे (४ वर्षातून एकदा ३६६ दिवसांच्या वर्षाचे) पंचांग. पहा : ‘Gregorian calendar’.
July जुलाय् n.--- इंग्रजी सातवा महिना, जुलई.
Jumble जम्बल् v.t.--- घालमेळ करणे, गुंता(गुंत) करणे. n.--- गोंधळ, घोळ, गुंता(गुंत).
Jump जम्प् v.t.--- उडी मारणे. n.--- उडी, उड्डाण.
Jumper जम्पर् n.--- सदरा, पोलके, झबले.
Junction जन्कशन् n.--- जोड, सांधा, संयोग, जूट.
June जून् n.--- इंग्रजी सहावा महिना.
Junior ज्यूनिअर् a.--- खालचे पायरीचा, धाकटा.
Junk जंक् n.--- (निरुपयोगी, जीर्ण, त्याज्य) तुकडा / तुकड्यांचा पसारा. कचरा / रद्दी झालेल्या वस्तु. v.t.--- (junk म्हणून) फेकून देणे, निकालात काढणे.
Junket जंकेट् n.--- एक दुधापासून बनवलेला गोड खाद्यपदार्थ. सार्वजनिक / सामूहिक समारंभ, उत्सव सोहळा. v.--- मेजवानी झोडणे.
Junkie जंकी n.--- व्यसनी मनुष्य, छांदिष्ट, नादिष्ट.
Junky जंकी = Junkie
Junta / Junto जण्टो / हुण्टो n.--- (राजकीय) गट, सत्ता हाती घेतलेला (क्रान्तिकारी) राजकारण्यांचा गट. (हिंदी : जुंटा).
Jupiter ज्युपिटर् n.--- बृहस्पति, देवांचा गुरु.
Juridic / Juridical ज्युअरिडिक् / ज्युअरिडिकल् a.--- अदालती, न्यायसभेचा, न्यायदानविषयक. = Judicial.
Jurisconsult ज्यूरिस्कन्सल्ट् n.--- धर्मशास्त्र सांगणारा.
Jurisdiction ज्यूअरिस्डिक्शन् n.--- अधिकार, हुकूम, अधिकारांतील प्रदेश.
Jurisprudence ज्यूअरिस्प्रूडन्स् n.--- व्यवहारज्ञान.
Jurisprudent ज्यूरिस्प्रूडन्ट् a.--- व्यवहारज्ञ.
Jurist ज्यूरिस्ट् n.--- धर्मशास्त्री, व्यवहारज्ञ.
Jury ज्यूरि n.--- पंच. Juryman ज्युरीमन् n.--- पंचाइतदार.
Just जस्ट् a.--- न्यायी, प्रामाणिक, यथार्थ, नीट, सरळ. ad.--- बरोबर, थेट, इतक्यात, केवळ, मात्र. n.--- कुस्ती, सामना.
Justice जस्टिस् n.--- न्यायाधीश, न्याय, इन्साफ.
Justiciable जस्टिशिएबल् a.--- न्यायालयीन परीक्षेस पात्र, न्यायिकचिकित्सापात्र, न्यायिक दृष्ट्या विचारणीय, कायदेशीर निर्णयास पात्र.
Justifiable जस्टिफाएबल् a.--- समर्थनीय, योग्य, वाजवी.
Justification जस्टिफिकेशन् n.--- समर्थन, उज्वल तोंड.
Justify जस्टिफाय् v.t.--- निर्दोष / निष्कलंक ठरवणे.
Jut जट् v.i.--- बाहेर येणे / पडणे.
Juvenile ज्यूव्हनाइल् n./a.--- तरुण, तारुण्याचा, तारुण्यसुलभ. शरीराने पूर्ण परिपक्वतेस / विकसित अवस्थेस ना पोचलेला, अल्पवयीन (नवतरुण / नवतरुणी).
Juvenility ज्युव्हिनिलिटी n.--- तारुण्य, यौवनभार.
Juxtaposition जक्स्टापोझिशन् n.--- लगता, नैकट्य, (परस्पर-)सह-अस्तित्व, जोडीने / बरोबरीने असण्याची स्थिति.